काळाच्या ओघात आज जे नवीन आहे ते नंतर जुने होते. परंतु काही आठवणी मात्र अगदी आजही ताज्या असतात.
काळाच्या ओघात आज जे नवीन आहे ते नंतर जुने होते. परंतु काही आठवणी मात्र अगदी आजही ताज्या असतात.
गावाकडच्या आठवणी
पूर्वीच्या काळी लहान बाळ सतत रडत असेल, हे ओळखून त्याला काय झाले आहे हे लगेच तज्ञ असलेल्या फक्त आजीबाईंना कळत असे. शक्यतो बाळाला मुडशी झाली असेल किंवा त्याचे पोट दुखत असेल तर त्यावेळी प्रत्येकाच्या घरात मुरुड शेंग असायची. ही मुरुड शेंग सहानेवर उगाळून बाळाला छोटा चमचा पाजत असे. मुरुड शेंग हे त्यावेळी एक उत्तम आयुर्वेदिक रामबाण औषध होते. ओव्याने पोट शेकवण्याची सुद्धा एक पद्धत होती.
बाळ कधी कधी सतत रडत राही. त्यावेळी काही स्त्रियांना बाळाला झोपवून घरातील आणि शेतातील सर्व प्रकारची कामे करावी लागत.त्यासाठी अगदी सकाळी सकाळी बाळाला आंघोळ घालून दूध पाजून तज्ञ आजीबाई त्याला अगदी थोडीशी अफू देत असत.अफूच्या मात्रेमुळे बाळाला गुंगी येऊन बाळू लवकरच झोपी जात असे.आणि पाच ते सात तास झोपेतून उठत नसे. त्यामुळे बाळाच्या आईला सर्व प्रकारची घरातील किंवा शेतातील कामे करता येत असत.
त्या काळात अगदी उघड उघड किराणा मालाच्या दुकानात सर्रासपणे अफू विकली जायची.त्यानंतर मात्र सरकारने अफू हा अमली पदार्थ असल्यामुळे अफूवर बंदी आणली.आणि ग्राईप वॉटरचा जन्म झाला.
जीपला ग्राईप वॉटर
जीपला ग्राईप वॉटर आणि बॉन बॉन ग्राईप वॉटर त्यावेळी फार प्रसिद्ध झाले.200 मिलीच्या काचेच्या बाटलीत साध्या कागदाच्या वेस्टनात जिपला ग्राईप वॉटर मिळत असे. त्याची किंमतही अगदी कमी होती. बॉन बॉन ग्राईप वॉटर हा ब्रँड थोडा महाग होता. बॉन बॉन ग्राईप वॉटर हे 500 मिली काचेच्या बॉटलमध्ये रंगीत बॉक्समध्ये येत असे.
हे ग्राईप वॉटर बाळाला सकाळी सकाळी चमच्या भर पाजत असत. ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण असल्यामुळे लवकरच गुंगी येऊन बाळ झोपी जात असे. अशाप्रकारे आफू जाऊन ग्राईप वॉटर आले एवढाच काय तो बदल. परंतु जाहिरात करताना "बाळाला द्या बॉन बॉन,बाळ होईल गुटगुटीत छान", अशा प्रकारच्या जाहिराती करायचे. वास्तविक त्याचा बाळाच्या तब्येतीशी काहीही संबंध नसायचा.
त्यावेळी एस टी महामंडळाच्या अनेक एसटीवर,एसटीच्या दरवाज्यावर बॉन बॉन ग्राईप वॉटर ची जाहिरात असायची.पुढे जीपला ग्राईप वॉटरला बॉन बॉन ने जाहिरातीच्या आणि आधुनिकतेच्या जोरावर मागे टाकले.आणि लवकर जिपला ग्राईप वॉटर बंद होण्याच्या मार्गावर आले.
त्याचप्रमाणे ग्राईप वॉटर मध्ये अल्कोहोल असते व त्याचा भविष्यात मुलावर विपरीत परिणाम होतो. याचे महत्त्व कळल्यावर बॉन बॉन ग्राईप वॉटर चे महत्व पारच कमी झाले.
राजबिंदू
त्या काळात प्रत्येकाच्या घरी आयुर्वेदिक असलेले राजबिंदू हे औषध असायचे.राजबिंदू हे पोट दुखीवर व दाढ दुखीवर रामबाण औषध होते.कपभर कोमट पाण्यात राजबिंदूचे दोन थेंब टाकून प्यायले असता पोट दुखायचे थांबायचे.दाढ दुखायची थांबायची.अजूनही राजबिंदू अस्तित्व टिकवून आहे. आता थोडे काही दुखले की लोक लगेच दवाखान्यात जातात. डॉक्टर त्यांना ऍलोपॅथिक व होमिओपॅथिक अशा वेगवेगळ्या औषधे व गोळ्या देतात. त्यामुळे राजबिंदू जरा दुर्लक्षित झाले आहे.
डोके दुखत असेल किंवा अर्धशिशी मुळे डोके व भुवईच्या वर दुखत असेल तर लोक कळीचा चुना दोन्ही डोळ्यांच्या कानाच्या वर चुण्याचा जाडसर ठिपका देत असत. त्यामुळे तात्काळ डोके दुखायचे बंद होत असे.
Anasin
त्यावेळी Anasin गोळी फारच लोकप्रिय होती. सर्दी, पडसे, अंगदुखी वर ही गोळी फारच रामबाण होती. लोक त्या गोळीचा सर्रास वापर करत असत. त्या खालो खाल Pawar 999 ही गोळी सुद्धा याच आजारावर नामी होती. या गोळ्यांच्या जाहिराती भिंतीवर, एसटी वर रंगवाल्या जात असत. पुढे या गोळ्या वापरणे कमी झाले.
Barnol
बोट कापल्यावर किंवा भाजल्यावर barnol मात्र अजूनही आपले अस्तित्व टिकउन आहे.
पावसाळा सुरु झाल्यावर अनेकांच्या घरात ढेकूण व पिसवा होत असत. लोक बाजारातून ढेकूण व पिसवांची पावडर आणून अंथरुणावर टाकून झोपत असत. त्यावेळी सरकारी माणसे दवा शिंपायला येत असत.लोखंडी बादलीत पाणी टाकून ही B S C पावडर मिसळून छोट्या पंपाच्या साहाय्याने फवारली जात असे. एक माणूस पंप मारायला व एक फवरायला असे. सर्व घर फवारून टाकत असत.खुप उग्र असा वास दरवळत राही. अगदी जेवण जात नसे.
काम करताना हात मोडला किंवा फ्रॅक्चर झाला तर भागात असा एखादा माणूस असायचा तो व्यवस्थित हात जोडून द्यायचा.त्याच्या नुसत्या स्पर्शाने बरे वाटायचे.हाताचा भाग व्यवस्थित बसऊन आंबी हळदीचा मलम करून त्यावर मेसाच्या लाकडी पट्ट्या बांधून देत असे. व पंधरा दिवसांनी तो सोडत असे. अगदी परफेक्ट हात जोडला जाई. ही त्या माणसाला दिलेली एक दैवी देणगी होती.
त्या काळात मोडलेला हात बसवणारा, चमक किंवा उसण काढणारा,विंचू उतरवणारा,जनावरांचे आजार बरे करणारा, बैलाच्या पायात रुतलेला काटा काढणारा, दाढ दुखी, मुतखडा, मुळव्याध, कावीळ अशा अनेक आजारावर औषध देणारे लोक भागात उपलब्ध असत. ते समाजाची निस्वार्थ सेवा करत असत. त्यांना निसर्गाने दिलेली ती देणगीच म्हणावी लागेल.
बिब्बा
बिब्बा हे सुद्धा एक उत्तम आयुर्वेदिक औषध होते. पायात मोडलेला काटा काढला की त्या ठिकाणी सुई तापऊन ती बिबव्यात खुपसून त्यामधील तेल जखमेच्या ठिकाणी लावली जाई. मुका मार लागला असेल तर हे बिबव्याचे तेल सुईच्या सहाय्याने मुका मार लागलेल्या ठिकाणी उभे आडवे पट्टे मारले जात. त्यामुळे दुखायचे थांबत असे.
शिकेकाई
पूर्वी लोक जंगलातून शिकेकाईच्या शेंगा आणत असत. त्या वाळवून उकळत कुठून त्याची पावडर करत असत. श्रीया पावडर आंघोळ करताना डोक्याला चोळत असे. त्यामुळे केस अगदी स्वच्छ होत असत. व अधिकच काळेभोर व चमकदार दिसत असत.
रामदास तळपे
शिवराज्याभिषेक सोहळा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा