भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि ट्रोलर

शरदराव जठार एक समाजसेवक
शरद जठार एक समाजसेवक
समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पाठिंबा देऊन त्याच्या मागे उभे राहून त्याला सतत प्रेरणा देणे हे प्रत्येकाचे काम आहे.यामुळे निश्चितच चांगले कार्यकर्ते घडुन भागाचा विकास,लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत असते.असेच आपल्या भागात श्री शरद जठार यांचे सामाजिक काम पाहून प्रत्येकाला एक नविन उर्जा प्राप्त होत असते.आज २९ श्री.शरद जठार यांचा वाढदिवस हेच औचित्य साधून त्यांच्याविषयी त्यांच्या कर्तुत्वाची माहीती वाचकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने दोन शब्द त्यांच्याविषयी लिहितो.
श्री.शरद जठार यांचा तसा माझा फारसा परिचय नव्हता..फक्त ते धुओली गावचे उपसरपंच आहेत.व भोसरी येथे राहतात.एवढेच माहीती होते.एकदा आँफिसमध्ये काम करत असताना एक शिक्षक काही कामानिमित्त आँफिसमध्ये आले व बोलता बोलता त्यांनी
साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील का? असे विचारले.
मी म्हणालो मी खेड तालुक्यातील मंदोशी गावचा आहे.वाडा गावच्या पश्चिम भागात माझे गाव आहे.
ते म्हणाले धुओली गाव पण तिकडे आहे का?
मी - हो.
तर ते म्हणाले तुम्हाला ते शरद जठार माहीत असतील ?
मी - हो.माहित आहेत.
ते - अहो त्यांच्यामुळे आमचा पेशंट वाचला आमच्या पेशंटला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला (वाय.सी.एम.) अँडमीट करून घेत नव्हते.सर्व प्रयत्न करून पाहिले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.कुणीतरी श्री. शरद जठार यांचा फोन नंबर दिला.शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला.आणि पुढच्या दहाच मिनीटात आमचा पेशंट अँडमिट करून घेतला.
पुढे तो सुखरूप बरा झाला.इथेच आमची चर्चा संपली.पुढे एकदा काहीतरी कामानिमित्त शरद जठार यांना फोन केला होता.त्यांनी मला त्यांच्या नायफड पंचायत समिती गण या ग्रूपमध्ये सामाविष्ट केले.व पुढे त्या ग्रूपच्या माध्यमातून श्री शरद यांचे सामाजीक कामाचे एकेक पैलू उलगडत गेले.व त्यांच्या विषयी आदर वाटू लागला.
ते करीत असलेले काम पश्चिम भागाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे.सामाजिक काम करत असताना अनेकांचे स्वार्थ त्यात आडवे येतात.त्यामुळे सामाजिक कामाला गती मिळत नाही.त्यासाठी सर्व लोकांनी सामाजीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सशर्त पाठिंबा दिला पाहिजे व प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारीही ठेवली पाहिजे.
मझ्या मते पश्चिम भागात जर सामाजिक कार्यकर्त्यांची फौज असेल तर सर्व शासकिय योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर कामे चांगल्या प्रकारे राबल्या जातील. श्री शरद जठार यांच्कडे ग्रामपंचायतचे नेतृत्व आहे.
मानव अधिकार तालुका अध्यक्ष पद आहे जिल्हास्तरावर अनेक राजकिय व सामाजीक प्रमुख व्यक्तीबरोबर चांगले सबंध आहेत व या माध्यमातून ते चांगले काम करत आहेत ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
आपल्या भागातील कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला रक्तातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे. तर रात्री आपल्या भागातील मयत झालेल्या कोरोणा पेशंटला रात्री दोन वाजता स्मशानभुमीत P.P.P किट घालूनअग्नीडाग दिला आहे.
आपआपसातील वादविवाद, मतभेद विसरून चांगले काम करणा-या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे.पश्चिम भागाला आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे.छोटे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व मेळावे.व्यसनाधिन लोकांसाठी प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजीत करणे.
सर्व भागातील सरंपंच,ग्रामसेवक,कृषिसेवक,तलाठी,आरोग्य सेविका,शिक्षक प्रतिनीधी ,पशुधन पर्यवेक्षक यांचा मेळावा आयोजीत करून सर्वसामान्यां पर्यत सरकारी योजना कशा राबवता येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आजही पैशाने न होणारी कामे
शरद जठार यांच्या शब्दाने होतात.हे ही महत्त्वाचे आहे.त्यांनी केलेल्या कामाची माहीती समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहीजे व त्या कामाची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी मी त्यांच्या काही सहका-यांकडून त्यांच्या विषयी माहीती मिळवली.त्या माहीतीवर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो.
*केलेली सुरवात*
भोसरीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सकाळी काॅलेज व दुपार नंतर STD बुथवर 500 रूपये महिना पगारावर काम केले.
नंतर प्रायव्हेट कंपनीत करत असताना भरपुर असा मित्र परिवार जमवला.व त्यांचेशी चांगले सबंध ठेवले.नंतर माॅ साहेब ग्रुपची स्थापना केली व तिथुन पुढे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली.
ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना भोसरी सारख्या ठिकाणी असलेले विविध भागातील मा.नगरसेवक, मा.आमदार मा.लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्याला मिळत असलेला मित्र परिवार व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याच्या जोरावर धुओली गावात व पश्चिम भागात काम करण्यास सुरुवात केली.
पश्चिम भागातील तरुण सहकारी, मा.पंचायत समिती सदस्य, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.आमदार या लोक प्रतिनिधींच्या सहकार्याच्या जोरावर पश्चिम भागात चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत आहे.
*उपसरपंच म्हणून बिनविरोध* *निवडून आल्यानंतर पहिला* *ध्वजारोहण गावातील जेष्ठ* *नागरिकाच्या हस्ते केला.*
*गावातील असणारा वादविवाद* *मिटवले.*.
*गावातील विविध चांगल्या कामांची प्रशासनाने दखल घेत, गावाला जिल्हा परिषद गटात *संत गाडगे बाबा*ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळाला*गावात विविध विकास कामे मार्गी लावली.*
*वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील*गरजू महिलांना साड्या* *वाटप केल्या.*
*गावातील एका गरीब कुटुंबाला* *दरवर्षी दिवाळीला मिठाई व कपडे करण्यात येतात.*
*नायफड पंचायत समिती गण* *ग्रुपच्या माध्यमातून मित्र* *परिवाराच्या*सहकार्याने कोरोना* *काळात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले*
मा.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् च्या माध्यमातून पश्चिम* भागात जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या*माध्यमातून अपघात ग्रस्त तरुण राजु लांघी या तरुणाला पैसे व धान्य वाटप करण्यास मदत..
*पुणे या ठिकाणी असलेले* *यशवंतराव*चव्हाण हाॅस्पिटल* *(YCM) या ठिकाणी आपल्या पश्चिम*भागातील नागरिकांचा* *कुठल्या ना कुठल्या कामासाठी* *संपर्क येतो तेव्हा त्यांना अॅडमिट* *करण्यापासून तर ते डब्याची व्यवस्था*करणे, वेळ प्रसंगी घरून* *डब्बा देणे, त्यांच बिल कमी करणे गाडीची व्यवस्था करून देणे* *काही नागरिकांचा वेळ व पैशाची* *बचत व्हावी, या वेळी त्या* *नागरिकांच्या नातेवाईक यांचे जन्म व*मृत्यू दाखले अगदी घर* *पोहच करणे, अगदी अॅडमिट* *असलेल्या पेशंटला वेळो वेळी फोन*करून चौकशी करणे, त्यांना* *धीर देणे. रात्री अपरात्री फोन*आला तर त्या ठिकाणी जाऊन*मदत करणे, कोरोना* *काळात मयत झालेल्या आपल्या* *भागातील पाॅझिटीव पेशंटच्या* *नातेवाईक यांना रात्री दोन- तीन* *वाजता स्वता: त्या ठिकाणी* *उपस्थित*राहुन अंत्यविधी* *करण्यास*मदत करणे.आगदी* *कोरोना काळात वैयक्तिक लक्ष* *घालुन गावातील लोकांना अर्सेनिक*गोळ्यांचे वाटप केले* *कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या* *महापुरात पुरग्रस्त भागाला खेड* *तालुका पश्चिम भागातुन 500 किलो*तांदुळ जमा करून* *पुरगरस्तांना पश्चिम भागाच्या वतीने मदत पोहचवली*
धुवोली/ वांजाळे संयुक्त ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या वतीने कोरोना विषयी नियोजन करण्यात येऊन गावात सॅनिटाईजर, मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात गावात कोणी रुग्ण पाॅझिटीव आला, तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा असलेला हाॅल रिकामा करुन त्या ठिकाणी विलगीकरण (Corantine) करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावात लोक सुरक्षित राहातील आणि प्रशासनाचा ताण देखील कमी होईल. असेच नियोजन ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे.. जेणेकरून प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होईल. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवाधिकार मीडीया फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शरद जठार करत असलेले हे सामाजिक काम खरोखरच उल्लेखनीय आहे.हे नाकारून चालनार नाही.त्यांच्या या सामाजीक कामाची सर्वांनी दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

सच्चा मित्र काशिनाथ जढर
गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस
-
पूर्वी गावाकडे सर्वात जास्त आनंद कशाचा असायचा तर पोहणे. पोहणे म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. पोहण्यासारखा आनंद दुसरा कोणताच नसे. मी यावेळी स...
-
गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...
-
पूर्वीपासून सुतार हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे. शेती, शेतकरी आणि सुतार हे समीकरणच म्हणावे लागेल. आमच्या मंदोशी गावात बारवेक...