अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कारभार अलिबाग मधून चालतो.अलिबागला सुंदर आणि रमणीय समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे विविध रमणीय बीच तयार झालेले आहेत.
भरतीच्या वेळी समुद्रकिनारा बंद असतो, त्यामुळे भरती-ओहोटीची वेळ पाहूनच किनाऱ्यावर जावे लागते.
अलिबाग बीच: Alibag beach:
अलिबाग हा मुख्य समुद्रकिनारा आहे. तेथील समुद्रकिनारा हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यां पैकी एक आहे. तेथून जवळच कुलाबा किल्ला आहे. हा किल्ला जलदुर्ग या श्रेणीमध्ये येतो. या बीचवरून कुलाबा किल्ल्याचे अतिशय रमणीय दृश्य दिसते. तेथे पर्यटकांसाठी विविध जलक्रीडा आणि मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत.कुलाबा जलदुर्ग :
अलिबाग या बीचवरून बोटीने कुलाबा किल्ल्यावर जाण्याची सुविधा आहे. ही एक उत्तम सागरी सफरच म्हणावी लागेल.समुद्रकिनाऱ्यावरून बोटीने एक छोटीशी सफर तुम्हाला या लोकप्रिय किल्ल्यावर घेऊन जाईल जिथे इतिहासात अनेक लढाया झाल्या आहेत.
किहीम बीच: Kihim beach:
किहीम गावात वसलेला हा बीच उत्कृष्ट सौंदर्यासाठी ओळखला जातो. इथे शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी, हिरव्या पानांनी आणि रानफुलांनी व्यापलेला आहे.अतिशय सुरक्षित असा हा बीच आहे. किहीम बीच हा महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. हा बीच अद्वितीय आणि रंगीबेरंगी सीशेलने भरलेल्या पांढऱ्या वाळूच्या स्वच्छ चादरीने व्यापलेला आहे.
अलिबाग पासून किहिम हे अंतर बारा किलोमीटर इतके आहे.
नागाव बीच: Nagav beach:
नागाव बीच हे ठिकाण अलिबाग पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. नागाव बीचचा समुद्रकिनारा हा साधारण तीन किलोमीटर इतका विस्तीर्ण आहे. येथील समुद्रकिनारा हा सुरूच्या झाडांनी व्यापलेला आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.पर्यटक येथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, बंपर राईड, बनाना बोट राईड, बोटिंग आणि पोहणे यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
या ठिकाणावरून सूर्यास्ताचे अतिशय विहंगम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
नागाव बीच येथून मुरुड बीच, अक्षी बीच, किहिम बीच, मांडवा बीच, अलिबाग बीच आणि काशीद बीच सारख्या आसपासच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून वेगवेगळे बीचवर जाता येते.
नागावातील भिमेश्वर व श्री विष्णू मंदिर हे पाहण्यासारखे आहे. शिवाय उंच उंच दीपमाळा देखील आहेत.
येथे पर्यटकांसाठी विविध जलक्रीडा आणि मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. तिथे अनेक छोटे छोटे हॉटेल्स आहेत.
अलिबाग पासून नागाव हे 30 किलोमीटर इतके दूर आहे.
आक्षी बीच: Akshi beach:
अलिबागच्या जवळच अक्षय बीच आहे तेथे शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे. विस्तीर्ण असा समुद्रकिनारा असून हा समुद्रकिनारा सुरूच्या झाडांनी व्यापलेला आहे. सुरुची आकर्षक वनसंपदा तिथे आहे.
अतिशय पुरातन अशा चालुक्य राजाच्या काळातील दीपमाळा येथे आहेत.अक्षी हे शिलाहार राजा केशी देव यांचा एक मराठीतील शिलालेख सापडला आहे. या शिल्पाला गधेगळ असे म्हणतात.हा शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील शिलालेखा पेक्षाही 100 वर्ष जुना आहे.
नारळाची झाडे:
येथील समुद्रकिनारा हा नारळाच्या झाडांनी व्यापलेला आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथील समुद्राची वाळू ही सोनेरी रंगाची आहे. समुद्रकिनाऱ्या भोवती असलेले नारळाची झाडे आणि विस्तीर्ण सागर किनारा, सोनेरी वाळू आणि अथांग लाटा यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात.
पक्ष्यांचे नंदनवन:
हा बीच पक्षी निरीक्षकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी आढळतात.
पक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे ठिकाण अतिशय उपयुक्त आहे. पक्षी निरीक्षण करण्याचा छंद असलेले पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात.
वरसोली बीच: Varsoli beach:
स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.
मांडवा बीच: Mandava beach:
हा एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे, जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
मांडवा बीचवर मराठी आणि हिंदी चित्रपटांची नेहमी शूटिंग होत असते.
अलिबाग पासून मांडव हे अंतर सुमारे 12 किलोमीटर इतके दूर आहे.
चौल बीच: Chaul beach:
हा एक शांत आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. चौल ही शिलाहार राजांची राजधानी होती.
कुलाबा किल्ला: Kulaba Fort:
हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात येतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रामध्ये आहे. हा किल्ला समुद्र सपाटीस समतोल आहे.
परंतु ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस जलदुर्गच्या बुरजापर्यंत पाण्याच्या लाटा उसळतात. परंतु समुद्राचे पाणी मात्र आत येत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यात घेतला. परंतु त्यांच्या मृत्यूमुळे किल्ला अर्धवट राहिला.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी सन १६८१ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण केला.प्रसिद्ध असे कान्होजी आंग्रे यांचे आरमार याच किल्ल्यावर होते. त्यांचे समाधी स्थान याच किल्ल्यावर आहे.
किल्ल्यामधील विहिरीचे पाणी मात्र अगदीच गोड आणि चवदार आहे.
खांदेरी किल्ला: Khanderi Fort:
हा एक ऐतिहासिक भव्य जलदुर्ग आहे, जो समुद्रात बांधलेला आहे. थळ पासून या किल्ल्यावर बोटीने जावे लागते.
कनकेश्वर मंदिर:
विक्रम विनायक मंदिर (बिर्ला मंदिर):
अलिबाग पासून हे मंदिर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक सुंदर मंदिर आहे, जे पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर रेवदंड्या जवळील बिर्ला समूहाने संगमरवर दगडामध्ये बांधले आहे.
दत्त मंदिर:
हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.
चुंबकीय वेधशाळा:
अलिबाग येथील ही एक प्रसिद्ध वेधशाळा आहे.कोणत्याही प्रकारचे चुंबकीय गुणधर्म नसलेल्या पोरबंदर स्टोन या दगडातून या इमारतींची निर्मिती करण्यात आली आहे.
ही वेधशाळा आता इंटरमॅग्नेट या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा एक भाग आहे. येथे घेतली गेलेली मोजमापे या प्रणालीशी सामायिक करण्यात येतात.
भारतीय नौदल आणि वायुदलाच्यासाठीही इथल्या चुंबकीय मापनांचा उपयोग केला जातो.
डीआय फ्लक्स मॅग्नेटोमीटर, ओव्हर हाउसर इफेक्ट प्रोटॉन स्केलर मॅग्ने टोमीटर, जेम सिस्टीम, टाईप जीएसएम ९०, प्रोटॉन प्रिसिशन मॅग्नेटोमीटर अशा विविध मोजणी यंत्रांनी ही वेधशाळा सुसज्ज आहे.
या वेधशाळेजवळ एक छोटे संग्रहालय देखील आहे. हे संग्रहालय पर्यटकांसाठी पाहण्यास उपलब्ध आहे.
परंतु आतील वेधशाळेत जाण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते.
रायगड बाजार:
अलिबाग येथे स्थानिक वस्तू आणि खाद्यपदार्थ मिळतात.
अलिबागला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यानचा काळ चांगला असतो, कारण हवामान आल्हाददायक असते. स्थळ ओवायशेत प्रकल्पामुळे या शहराची प्रचंड गतीने वाढ झालेली आहे.
श्री.शशांक काठे यांचे खडूपासून निर्माण केलेले शिल्पाचे अनोखे संग्रहालय या ठिकाणी आहे.
सासवने:
अलिबागच्या जवळच सासवणे गाव आहे. या सासवने गावात शिल्पकार करमरकरांच्या शिल्पाकृतींचे संग्रहालय आहे. करमरकरांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये आणि पहिल्या मजल्यावर ही शिल्पकला साकारली आहे. दीडशे ते दोनशे शिल्पे येथे पाहायला मिळतात.
यामध्ये पशुपक्षी, प्राणी, माणसांची शिल्पे इतकी अप्रतिम आहेत की ती पाहून आपण होतो. त्यामधील प्लेमेंट्स, शेफर्ड बॉय, मोर,आई आणि मूल व म्हैस ही शिल्पे अगदीच जिवंत भासतात.
सी फुड :
अलिबाग हे सी फूड प्रेमींसाठी स्वर्ग आहे. पोम्फ्रेट, सुरमई, कोळंबी, लॉबस्टर इत्यादी येथील मासे खुप चविष्ट आहेत.
रस्त्याच्या कडेला असलेल्या खाण्याच्या ठिकाणांनाही भेट द्या. कारण तिथेही उत्कृष्ट पद्धतीने माशांचे विविध प्रकार बनवले जातात.
लेखक :- रामदास तळपे.