विविध उपक्रमांचा लोकार्पण व वितरण सोहळा"
शनिवार दिनांक 14 जून 2025
स्थळ :- आनंद कपूर प्रशिक्षण केंद्र जुना आंबेगाव (बोरघर) तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.
दत्ता तिटकारे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुहास ढमाले सर अध्यक्ष रोटरी क्लब निगडी, अश्विन कुलकर्णी सर्विस डायरेक्टर रोटरी क्लब निगडी, सुश्री सोनाली जयंत अध्यक्ष इनरव्हील क्लब निगडी प्राइड, सुश्री धनश्री कुलकर्णी रोटरियन, श्री जयंत येवले सर, श्री सुमंत सिंग, शाश्वत संस्थेच्या विश्वस्त सुश्री प्रतिभाताई तांबे, सुश्री सुलाताई गवारी, कार्यकर्ते, शेतकरी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
रोटरी क्लब निगडी यांनी अर्थसहाय्य दिलेल्या सौर ऊर्जा युनिटचे उद्घाटन श्री सुहास ढमाले सर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत 26 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्टेशनरी, स्पोर्ट ड्रेस चे वाटप करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थेचे समन्वयक तुषार भाऊ पवार यांनी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब निगडी व इनरव्हील क्लब मार्फत मिळालेले 100 रोलिंग ड्रम चे वाटप खरोशी, वाळद, आव्हाट या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आले* या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष श्री सुहास ढमाले सर यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करून यासारखे विविध प्रकल्प पुढील काळात राबवू असे सांगितले.
सुमंत सिंग यांनी आणलेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या युनिट चे प्रात्यक्षिक सर्व मान्यवर पाहुण्यांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केले कुठल्याही प्रकारची वीज न वापरता पाणी उचलण्याची क्षमता असणाऱ्या युनिट चे काम वाखण्याजोगे सर्वांना दिसून आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यकर्त्या ताई लोहकरे, तेजश्री कसबे, कार्यकर्ते कृष्णा वडेकर, देवराम आसवले, शांताराम गुंजाळ, अरुण पारधी, शंकर लांघी, कोंडीबा आसवले, दत्ता तिटकारे यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम भाऊ चपटे यांनी केले, संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रतिभाताई तांबे यांनी दिली, आभार प्रदर्शन सुलाताई गवारी यांनी केले.
मंदोशी गावचे श्री दत्तात्रेय गणपत तिटकारे यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी मंदोशी आणि आसपासच्या गावांना शाश्वत संस्थेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.माझे मित्र श्री दत्ता तिटकारे हे आदिवासी जनतेचे करीत असलेली सेवा हे खरंच उल्लेखनीय बाब आहे.