श्री संजय सोळशे (वांजळे ता.खेड ) यांचे हॉटेल सह्याद्री
अप्रतिम चव, प्रशस्त जागा, गाड्या पार्किंगची सोय असलेले पश्चिम भागातील एकमेव हॉटेल. ( हॉटेल सह्याद्री )
परवा गावी जाण्याचा योग आला.जाताना वांजळे तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एक नवीनच हॉटेल दिसले. गाड्या पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा असल्यामुळे सहजच मनात विचार आला चला चहा घेऊया.
हॉटेलमध्ये गेल्यावर कळले की हे हॉटेल श्री संजय सोळशे यांचे आहे. तिथे गेल्यावर संजय किचनमध्ये आचारी काम करीत होता. नुकताच कढईमध्ये भज्यांचा घाणा टाकला होता.आणि त्याचा दरवळ नाकातोंडात घमघमात होता. कांदा भजी खाण्याची तीव्र इच्छा होत होती.परंतु आम्ही आधीच डेहणे येथे श्री राजू शेठ उबाळे यांचे हॉटेलात नाश्ता केला असल्यामुळे केवळ चहाच मागवला.
अरे! संजय हे तुझे हॉटेल आहे ? हो.. संजय म्हणाला.
तेथे भीमाशंकरला जाण्यासाठी आलेले अनेक भाविक आणि पर्यटक नाश्ता करण्यासाठी बसले होते. मोठ्या आवडीने लोक नाश्ता करत होते.
थोड्याच वेळात चहा आला. चहा घेतल्यावर चहाची अप्रतिम चव जाणवली. अतिशय फक्कड असा चहा होता. चहा पिताना खूपच समाधान वाटले. आणि त्याहीपेक्षा संजयचे हॉटेल पाहून अतिशय आनंद वाटला.
संजय हा माझा वर्गबंधू.अभ्यासात तसा जेमतेमच होता. नववी पर्यंत शाळा शिकला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि शिक्षण जेमतेम असल्यामुळे राजगुरुनगर येथे हॉटेल लक्ष्मी येथे वेटरचे काम करू लागला.
वेटरचे काम करीत असताना प्रचंड कष्ट घेऊन आचारी काम सुद्धा त्याने शिकून घेतले. त्याच्यामध्ये हॉटेल टाकायची खूप जिद्द होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे काहीच पर्याय शिल्लक नव्हता.
पावसाळ्यात भीमाशंकर ला जाणाऱ्या पर्यटकांची खूपच वर्दळ असते. हे पाहून नेकलेस धबधब्याजवळ संजयने एक छोटे तात्पुरते हॉटेल सुरू केले. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. लोक तेथे चहा नाश्ता करू लागले. परंतु एक महिन्यानंतर पुन्हा काय करायचे हा प्रश्न होताच. कारण धबधब्याचे पाणी कमी झाल्यावर लोक तेथे थांबत नसत.
खूप कष्ट आणि मेहनत करून संजयने त्याच्यात शेतात अगदी राजगुरुनगर भीमाशंकर या रस्त्याच्या कडेला वांजळे गावच्या हद्दीत अतिशय टुमदार व सुंदर असे हॉटेल टाकले आहे. प्रशस्त जागा, गाड्या पार्किंग करण्याची सोय शिवाय अविट गोडीचे चविष्ट असे पदार्थ संजयच्या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. फक्त एकदा तिथे जाऊन खात्री करण्याची आवश्यकता आहे.
भीमाशंकरला जाताना अवश्य श्री संजय सोळशे यांच्या वांजळे येथील..... हॉटेल ला भेट द्या.
आपल्या भागातील नव उद्योजक श्री संजय सोळशे यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेला युवक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अगदी वेटर पासून स्वतःचे हॉटेल सुरू करतो. हेच खरे भूषणावह आहे. आपल्या भागात असे उद्योजक तयार होणे अतिशय आवश्यक आहे आहे.. सलाम माझ्या वर्ग बंधू संजयला.
बुकिंग साठी,संजय सोळशे यांचा संपर्क:- 8788416205