भारतीय चलन आणि नाण्यांचा आधुनिक इतिहास

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1952 नंतर भारतीय चलनी नोटांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे बदल झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1952 नंतर भारतीय चलनी नोटांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे बदल झाले.

भारतीय चलन आणि नाण्यांचा आधुनिक इतिहास

दशमान पद्धत 

दशमान पद्धतीचा अवलंब (Decimalisation)  1957 मध्ये करण्यात आला.

त्याआधी भारतीय चलनात रुपया, आणा, पैसे आणि पई यांसारखे घटक होते. एक रुपया म्हणजे सोळा आणे,एक आणा म्हणजे चार पैसे आणि एक पैसा म्हणजे तीन पई.

दिनांक 1 एप्रिल 1957 रोजी दशमान पद्धती (Decimal System) लागू करण्यात आली. यानुसार, एक रुपयाचे 100 'नये पैसे' असे विभाजन करण्यात आले.'नये पैसे' हे नाव काही वर्षांनी वगळण्यात आले आणि ते फक्त 'पैसे' म्हणून ओळखले जाऊ लागले. यामुळे चलनाचे व्यवहार अधिक सोपे झाले.

नवीन नाण्यांची ओळख

दशमान पद्धती लागू झाल्यानंतर 1, 2, 5, 10, 25 आणि 50 नये पैसे तसेच एक रुपयाची नाणी जारी करण्यात आली.

पूर्वी एक नया पैसा कांस्य धातूचा होता, तर 2, 5, 10 नये पैसे क्युप्रो-निकेलचे होते. 25, 50 नये पैसे आणि 1 रुपयाची नाणी निकेल या धातूंची होती.

1970 च्या दशकात 1, 2 आणि 3 पैशांची नाणी हळूहळू बंद करण्यात आली.

पाच पैसे, दहा पैसे व वीस पैशाची नाणी ही जर्मन या धातूची  होती.

सन 1988 मध्ये 10, 25 आणि 50 पैशांची नाणी स्टेनलेस स्टीलमध्ये सुरू करण्यात आली.

त्यानंतर 1992 मध्ये एक आणि पाच रुपयांची नाणीही स्टेनलेस स्टीलमध्ये आली.

सन 2011 मध्ये 25 पैशांची नाणी आणि त्यापेक्षा कमी मूल्याची सर्व पैशांची नाणी चलनातून काढून टाकण्यात आल

भारत स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राजे व राण्यांचे चित्र काढून टाकून भारतीय नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरले गेले.नवीन नाणी आणि नोटांमध्ये 'रुपया' हे नाव कायम ठेवण्यात आले.

सन 1957 नंतर भारताने दशमान पद्धती (Decimal System) स्वीकारली. यापूर्वी 1 रुपयाचे 16 आणे होते, ते बदलून 1 रुपयाचे 100 पैसे असे प्रमाण निश्चित करण्यात आले. यामुळे पैशांची गणना अधिक सोपी झाली.








नोटांच्या मूल्यांमध्ये आणि डिझाइनमध्ये बदल

सन 1950 मध्ये भारत सरकार च्या रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक, दोन, पाच आणि दहा रुपयाच्या नोटा चलनात आणल्या.

न 1954 मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्यात आल्या. या नोटा 1938 ते 1946 पर्यंत चलनात होत्या, परंतु इंग्रज राजे आणि राणी यांची चित्रे असलेल्या नोटा रद्द करून अशोक स्तंभाचे चित्र असलेल्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.

1954 मध्ये भारतीय नोटांचा कागद  हा कापसाच्या लगद्यापासून आणि लिनन च्या मिश्रणातून बनवला होता. हा कागद मजबूत आणि टिकाऊ असावा यासाठी विशेष काळजी घेतली गेली.

या नोटांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये (security features) देखील समाविष्ट केलेली असत, जसे की वॉटरमार्क (watermark) आणि चमकदार शाई (fluorescent ink). त्या काळात मध्यप्रदेशातील होशंगाबाद आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे नोटांसाठी कागद तयार केला जात असे.

 रुपये एक हजार, 5 हजार व दहा हजाराच्या नोटा


















 रुपये एक, दोन, पाच, दहा व शंभर च्या नोटा 


               









 रुपये वीस व पन्नास रुपयांच्या नोटा 
सन 1978: मध्ये एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनातून रद्द करण्यात आल्या.काळ्या पैशांना (Black money) आळा घालण्यासाठीचा हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला नोटा बदल होता.

वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि क्रयशक्ती कमी झाल्यामुळे उच्च मूल्याच्या नोटांची गरज भासू लागली. त्यामुळे सन 1987 मध्ये 500 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली,

 रुपये पाचशेची नोट 



सन 1996: महात्मा गांधी मालिकेतील (Mahatma Gandhi Series) नोटा जारी करण्यास सुरुवात झाली. या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र होते जे पूर्वीच्या डिझाइन ऐवजी वापरले गेले. यामध्ये दहा, वीस,पन्नास, शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या चित्राचा समावेश होता. या नोटांमध्ये अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये (Security Features) समाविष्ट करण्यात आली.
सन 2000 मध्ये एक हजार व पाचशे  रुपयांची नोटे मध्ये आवश्यक ते सुरक्षित बदल करून ही नोट नव्याने परत चलनात आणण्यात आली.
सन 2005: मध्ये महात्मा गांधी मालिकेतील जुन्या नोटा मध्ये बदल करून सुधारित सुरक्षेच्या वैशिष्ट्यासह त्या जारी करण्यात आल्या.

सन 2014: '₹' हे भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह चलनात आणण्यात आले. हे चिन्ह भारतीय नोटांवर आणि नाण्यांवर वापरण्यात आले.

पुन्हा नोटाबंदी 

8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने 500 आणि 1,000 रुपयांच्या महात्मा गांधी मालिकेतील 2005 पर्यंतच्या नोटा चलनातून रद्द केल्या. हा एक मोठा नोटाबंदीचा निर्णय होता.
 
यानंतर 500 रुपयांची नवीन नोट आणि 2,000 रुपयांची नवीन नोट (महात्मा गांधी नवीन मालिका) चलनात आणण्यात आली. या नवीन नोटांचे डिझाइन आणि आकार पूर्वीपेक्षा वेगळे होते.या नोटांमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये होती, जसे की वॉटरमार्क, सुरक्षा धागा आणि दृष्टिहीनांसाठी विशिष्ट वैशिष्ट्ये
आहेत.

 रुपये 10, 20 50 व 100 रुपयाच्या आधुनिक नोटा 

 










रुपये दोनशे, पाचशे व दोन हजारांच्या आधुनिक नोटा 

सन 2017-18 मध्ये दोनशे रुपयांची नोट तसेच दहा, पन्नास आणि शंभर रुपयांच्या नवीन नोटा (महात्मा गांधी नवीन मालिका) जारी करण्यात आल्या. या नोटांचा आकार आणि रंग पूर्वीच्या नोटांपेक्षा वेगळा होता.

सन 2019: मध्ये RBI ने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली, परंतु त्या वैध चलन म्हणून राहतील असे सांगितले. नंतर एक ऑक्टोबर 2023 नंतर 2000 ची नोट पूर्णपणे चलनातून बंद झाली.

नोटांच्या डिझाइनमध्ये बदल:

भारतीय नोटांच्या डिझाइनमध्ये वेळोवेळी बदल होत गेले आहेत. सुरुवातीला अशोक स्तंभ आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिमा होत्या. नंतर महात्मा गांधींचे चित्र नोटांवर मध्यभागी आले. नवीन मालिकेतील नोटांवर स्वच्छ भारत अभियान, मंगलयान, सांची स्तूप, राणी की वाव यांसारख्या भारतीय वारसा स्थळांचे आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या प्रतिमा दिसतात.

थोडक्यात, 1952 नंतर भारतीय चलनी नोटांनी ब्रिटिश राजवटीतील खुणा मागे टाकून, दशमान पद्धती स्वीकारली, विविध मूल्यांच्या नोटांचा समावेश केला, आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवून, भारतीय संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडवले. निश्चलनीकरण आणि नवीन नोटांच्या मालिकेमुळे भारतीय चलनी नोटांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
भारतात चलनी नोटा चार ठिकाणी छापल्या जातात.

भारतीय चलनाच्या करन्सी प्रिंटिंग प्रेस 

नाशिक (महाराष्ट्र): येथे इंग्रजांच्या काळापासून नोटा छापल्या जातात. त्यावेळी सबंध भारतात एकच नाशिक ही करन्सी प्रिंटिंग प्रेस होती.

देवास (मध्य प्रदेश) येथे सन 1947 नंतर भारत सरकारच्या मालकीची बँक नोट प्रेस आहे. देवासमध्ये नोटांसाठी आवश्यक शाईचे उत्पादन करणारा कारखाना देखील आहे.

म्हैसूर (कर्नाटक) ही प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड द्वारे चालवली जाते.

साल्बोनी (पश्चिम बंगाल) ही प्रेस देखील भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL) द्वारे चालवली जाते.

नाण्यांच्या टाकसाळी 

या चार ठिकाणांव्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे नोटांसाठी लागणारा विशेष कागद तयार केला जातो. तसेच, काही प्रमाणात कागद आणि शाई परदेशातून देखील आयात केली जाते.

नाणी मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथील चार टकसाळींमध्ये (मिंट्स) पाडली जातात.

रिझर्व बँक ऑफ इंडिया गव्हर्नरांची यादी

१ ऑस्बॉर्न स्मिथ १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७

२ जेम्स ब्रेड टेलर १ जुलै १९३७ ते १७ फेब्रुवारी १९४३

३  सी. डी. देशमुख ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९

४  बेनेगल रामाराव १ जुलै १९४९ ते १४ जानेवारी १९५७

५  के.जी.आंबेगावकर १४ जाने. १९५७ ते २८फे. १९५७

६  एच व्ही.आर.आयंगर १ मार्च १९५७ ते २८ फेब्रु. १९६२

७  पी.सी. भट्टाचार्य १ मार्च १९६२ ते ३० जून १९६७

८  एल के झा १ जुलै १९६७ ते ३ मे १९७०

९  बी. एन. आडारकर ४ मे १९७० ते १५ जून १९७०

१० एस. जगन्नाथन १६ जून १९७० ते १९ मे १९७५

११ एन सी सेन गुप्ता १९ मे १९७५ ते १९ ऑगस्ट १९७५

१२ के आर पुरी २० ऑगस्ट १९७५ ते २ मे १९७७

१३ एम. नरसिंहन २ मे १९७७ ते ३० नोव्हेंबर १९७७

१४ डॉ. आय.जी. पटेल१ डिसे. १९७७ ते १५ सप्टें. १९८२

१५ डॉ. मनमोहन सिंग १६ सप्टें १९८२ ते १४ जाने. १९८५

१६ घोष १५ जानेवारी १९८५ ते ४ फेब्रुवारी १९८५

१७ आर. एन. मल्होत्रा ४ फेब्रु. १९८५ ते २२ डिसें. १९९०

१८ एस. वेंकट रमणन २२ डिसें १९९० ते २१ डिसें १९९२

१९ डॉ. सी. रंगराजन 22 डिसें. 1992 ते 22 नोव्हें. 1997

२० डॉ. बिमल जालान २२ नोव्हें. १९९७ ते ६ सप्टें. २००३

२१ डॉ. वाय.व्ही. रेड्डी ६ सप्टें २००३ ते ५ सप्टें. २००८

२२ डॉ. डी. सुब्बाराव ५ सप्टें २००८ ते ४ सप्टें. २०१३

२३ डॉ. रघुराम राजन ४ सप्टें. २०१३ ते ४ सप्टें. २०१६

२४ डॉ. उर्जित पटेल ४ सप्टें. २०१६ ते ११ डिसें. २०१८

२५ श्री.शक्तिकांत दास १२ डिसें. २०१८ पासुन

 लेखक :- रामदास तळपे 











1 टिप्पणी:

  1. अप्रतिम माहिती तळपे साहेब पुढील लिखाणास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस