आठवणींचा ठेवा
खेडोपाडी अनेक सुधारणा झाल्या असल्या,आणि कितीही सोयी सुविधा उपलब्ध असल्या तरी जुन्या काळी जी मज्जा होती ती आता राहिली नाही.
काळ बदलला, प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. तरी जुन्या आठवणीने मन भरून येते. आणि जुने दिवस, जुन्या आठवणी आठवतात. हा आठवणीचा ठेवाच म्हणावा लागेल.
अंग घासण्याच्या घासनी
साधं आंघोळीचे उदाहरण घ्या.घरातील प्रत्येकाला अंगाला लावायला आज वेगवेगळा साबण असतो. परंतु त्या काळात साबण हा बघायलाही मिळत नसे.
पूर्वी लोक अंग घासण्यासाठी, किंवा अंगावरील मळ काढण्यासाठी वेगवेगळ्या घासणींचा उपयोग करत असत. दगडाची घासन,कौलाची घासण व त्यानंतर फेसाची घासन हे प्रकार प्रसिद्ध होते.
पूर्वी घराच्या भिंती बांधताना डबरांची गरज भासत असे. त्यासाठी लोक दगड फोडण्यासाठी सुरुंगाचा वापर करीत. दगडाचे डबर बनवताना छोट्या छोट्या खडबडीत चिपा निघत.
याच खडबडीत छोट्या छोट्या चिपांचा वापर लोक आंघोळीच्या वेळी अंग घासण्यासाठी करत.
खूप पूर्वी व त्यानंतरही अनेकांच्या घरांवर नळीची कवले असत. लोक या कौलांचा अत्यंत सुबकपणे घासणी साठी उपयोग करत असत.
नळीचे कौल व्यवस्थित फोडून त्याचे रूपांतर घासणीत करत.आतल्या बाजूला चूक किंवा खिळ्याने उभ्या आडव्या रेघा मारत.काही लोकांच्या कवलाच्या घासणी या ओबडधोबड असत.
काही लोकांच्या या कौलांच्या घासणी अत्यंत सुबक असत. या घासणी घेऊन लोक आंघोळीसाठी ओढ्यावर किंवा नदीवर जात असत. लोक या घासणी खुप जपून वापरत.कारण ती हातातून पडल्यावर फुटायची भीती असे.
गावाकडील काही लोक मुंबईला असत. ते जेव्हा गावाला येत तेव्हा फेसांच्या घासणी घेऊन येत.फेसाची घासणी म्हणजे साबणाच्या वडीप्रमाणेच भासे.
फेसाची घासणी ही पांढरीशुभ्र असून त्यावर छोटी छोटी छिद्रे असत. ही घासणी दिसायला अत्यंत सुबक जरी असली तरी काही दिवसातच ती झिजून जात असे.
मला फेसाची घासणी खूप आवडायची. परंतु याला फेसाची घासणी का म्हणतात हे अजूनही मला कळले नाही. अनेक लोकांना फेसाच्या घासणीचे अप्रूप वाटायचे.
काही लोक मुंबईकरांना,मुंबईवरून येताना फेसाची घासणी घेऊन येण्याचे आवर्जून सांगत असत.
शिकेकाई
स्त्रिया केस धुण्यासाठी शिकेकाईचा उपयोग करत असत.जंगलातून शिकेकाईच्या शेंगा आणल्या जात. त्या उखळामध्ये कुटून त्याची पावडर केली जाई. त्या शिकाकाईची पावडर आंघोळ करताना डोक्याला लावत असत.
शिकेकाईची पावडर ही आजच्या केमिकलयुक्त साबणापेक्षा कितीतरी पटीने सरस होती.
लाईफबॉय साबण
त्यानंतर बरेच दिवसांनी गावाकडे पहिला साबण कोणता आलाअसेल तो म्हणजे लाईफबॉय साबण.
कागदी वेस्टनामध्ये असलेली ही छोटीशी मऊशार,वेगळाच सुगंध असलेली लाल वडी होय.
अंघोळ केल्यानंतर या साबणाचा वेगळाच सुगंध दरवळत असे. त्या काळात गावाकडील लाईफ बॉय साबण हा खूपच प्रसिद्ध झाला होता.
"लाईफ बॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी" हे स्लोगन असलेल्या वाक्याची जाहिरात रेडिओवर त्यावेळी फार प्रसिद्ध झाली होती.
लाईफ बॉय इतकी प्रसिद्धी गावाकडे इतर कोणत्याही साबणाला मिळाली नसेल हे मात्र नक्की.
गावाकडे डोक्याला लावण्यासाठी आजही खोबरेल तेलाचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल आजही गावाकडे टिकून आहे.
सनलाईट साबण
501 बार हा साबण फुटभर तरी लांब असे. लोक पाहिजे तेवढा साबण कापून वापरत असत. सन लाईट साबण हा पण त्याकाळी फारच प्रसिद्ध होता.
बटाट्यापासून तयार झालेला भवरा छाप हा साबण गरीब लोक वापरत असत.

निरमा पावडर
त्यानंतर निरमा साबण गावाकडे फारच प्रसिद्ध झाला. वॉशिंग पावडर निरमा, दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपडा को पिल पिल जाई.वॉशिंग पावडर निरमा ही जाहिरात टीव्हीवर फारच प्रसिद्ध झाली होती. निरमाने तेव्हा गावाकडली बाजारपेठ व्यापून टाकली.आणि सन लाईट,501 बार साबण मागे पडले.
निळ पावडर
पूर्वी गावाकडे बरेच लोक हे धोतर, सदरा, टोपी, लेंगा वापरत असत. हे सर्व कपडे पांढरे शुभ्र असत. शाळेच्या मुलांचा गणवेशही पांढरा असे.त्यामुळे पांढरी कपडे अजून स्वच्छ दिसण्यासाठी निळी चा उपयोग प्राधान्याने होत असे.
निळ पावडर,निळीचे खडे त्यावेळी फार प्रसिद्ध होते. दुकानदार निळ पावडर हे बरणीत ठेवत असत. दहा पैसे, चार आण्याला निळ पावडर मिळत असे.
आम्ही शनिवारी शाळा सुटल्यावर दत्ता शेठ कोरडे यांच्या दुकानातून चार आण्याची निळ घेत असू.
त्यानंतर बाटलीतून लिक्विड स्वरूपात निळ विक्रीस उपलब्ध
होऊ लागली. इना - लिना ही निळीची बाटली त्यानंतर फारच प्रसिद्ध होऊ लागली. आणि पावडर स्वरूपात असलेली नीळ हद्दपार झाली.
तंबाखू, विड्या व तापकीर
पूर्वी गावाकडे अनेक लोक तंबाखू जरी खात असत,तरी अनेक पुरुष विड्या ओढत असत.
स्त्रिया तपकीर किंवा मशेरी लावत असत. त्यासाठी खास तपकिरीची डबी असे.चिमूटभर तपकीर नाकात कोंबल्यास शिंका मागून शिंका येत असत.
कधीतरी गंमत म्हणून आम्ही झोपलेल्या माणसाच्या नाकासमोर तपकीर धरत असु. त्यानंतर त्याला ज्या काही शिंका येत विचारू नका.
त्या काळात अनेक लोक व स्त्रिया सर्रासपणे मशेरी लावत असत. त्यासाठी बाजारात मशेरी भाजण्यासाठी मोठ-मोठी तंबाखूची पाने मिळत.स्रिया दिवसातून खूप वेळा मशेरी लावत असत.तर काही तपकीर लावत असत.
कोलगेट पावडर

गायछाप

चारमिनार सिगरेट








फारच छान .एकदम सचित्र तपशीलवार माहिती .जूने दिवस आठवले . वाईटही वाटले कारण आता ती मजा पुन्हा कधीच मिळणार नाही कितीही पैसे दिले तरी .🌹🌹👍👌👌
उत्तर द्याहटवाKhup chhan mahiti
उत्तर द्याहटवा