
तमाशा सम्राट शंकरराव कोकाटे
त्यावेळी कलेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. अंगभुत कला हीच त्यावेळी कलाकाराची शिदोरी होती. त्यावेळी ग्रामीण भागातील कलाकारांवर रसीकांनी मणस्वी प्रेम केले.कलेला दाद दिली. प्रसगी वर्गण्या काढुन कलाकरांना मदत देखील केली.त्यामुळे अनेक कलाकार पुढे आले.लोकप्रिय झाले.ग्रामीण भागाचे नाव रोशन केले.अशा या कलाकारांच्या कलेचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी लिहीला पाहीजे.व तो आपण सर्वांनी वाचला पाहीजे हीच साधारण अपेक्षा व्यक्त करतो.
गण
आपल्या या ग्रामीण भागात अनेक कलाकारांनी कलेची सेवा केली आहे त्यापैकी तमाशा सम्राट कै.शंकरराव कोकाटे (टोकावडे) कै.विष्णू चासकर (चास) श्री.रामचंद्र वाडेकर (सुरकुंडी) कै.राम पोखरकर (वाळद) श्री.मारूती भोकटे सह नंदा भोकटे (साकुर्डी)श्री.दत्ता भोकटे (साकुर्डी) कै.शंकरराव आहिलू तळपे कै.मोतीराम मोहन कै.विष्णू हुरसाळे (मंदोशी )श्री. चिंधू वनघरे,श्री. बापू साबळे (भिवेगाव) श्री.सखाराम उगले,विठ्ठल उगले (कारकुडी) श्री.नारायण गायकवाड( डेहणे) यांनी तमाशाची सेवा केली.
प्रासादिक भजनी भारूडाची सेवा देखील काही मान्यवरांनी केली.श्री.विठू नांगरे मोरोशी हे प्रसादिक भजनी भारूड मंडळाचे अनभिषिक्त सम्राट होते.श्री. बाबुराव व श्री.काशिनाथ गुंजाळ कै.शेळके (पोखरी),श्री.सिताराम मु-हे,श्री.रामु न्हावी.(टोकावडे) श्री.दत्तात्रय मिलखे गुरूजी श्री मुरलीधर माळी गुरूजी कै.शंकर मारूती ठोकळ ,मारूती सावळेराम ठोकळ श्री.शंकर माळी (स्रीपात्र)श्री.कोथेबुवा श्री.सुदाम उर्फ वाळकू माळी श्री.मारूती वडेकर श्री गीताराम डवणे सर्व (नायफड ) यांनी ग्रामीण भागातील भारूड संपुर्ण महाराष्ट्रात नेण्याचे काम केले.
रंगबाजी
भारूडांचे खेळ आता शेवटची घटका मोजताहेत.गावागावात असणारी प्रासादिक भजने काही गावांचा अपवाद सोडला तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.काळाच्या ओघात या कला जरी मागे पडल्या असल्या तरी या आपल्या भागाच्या मातीतुन अजुनही कलाकारांचा ओघ चालुच आहे.त्यापैकी श्री.विकास सोनवणे (शेंदुर्ली) श्री.दत्तात्रय तिटकारे (नायफड) श्री.दत्ता उबाळे ( मिसेस मुख्यमंत्री )श्री. बाबूराव भोर (पिपाणी) यांचा उल्लेख करावा लागेल.
मास्टर कै.शंकरराव कोकाटे हे खेड तालुक्यातील टोकावडे ता.खेड गावचे होते.वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली.सुरूवातीला त्यांनी डबेवाल्यांचा व्यवसाय केला.आणि हा व्यवसाय करत असताना त्यांचे पाय नाटकाकडे ओढले गेले.
मुंबईला ते सुरंगी नाटकात काम करत.सुरंगी नाटकात ते दरोडेखोराची भुमीका करत.
या नाटकात काम करत असताना त्यांची कला तमाशा सम्राट कै.तुकाराम खेडकर यांनी पाहीली.आणि तमाशात काम करण्याची आँफर दिली.
पुढे कै.तुकाराम खेडकर यांच्या तमाशात त्यांनी अनेक निगेटिव्ह (नकारात्मक) भुमिका केल्या.प्रसिध्द नेपथ्यकार श्री.रघुवीर तुळशिलकर सांगतात की त्यांनी एका वगनाट्यात कालीमातेचा रोल केला होता.वग सुरू होण्याच्या आधी प्रथे प्रमाणे तमाशातील काही महिला कालीमातेची पुजा करायच्या.अशीच एक महिला कालीमातेची पुजा करायला उभी असताना कै.शंकरराव कोकाटे यांची कालीमातेची एंन्ट्री स्टेजवर दाखल झाली.कोकाटे यांची कालीमाता पाहून ती महिला अक्षरशा बेशुद्ध पडली.
त्या वेळी कै.तुकाराम खेडकर यांच्या तमाशात शंकरराव कोकाटे यांच्याबरोबर दत्ता महाडिक व कै.चंद्रकांत ढवळपुरीकर हे सुद्धा काम करत होते.
काही कालावधीनंतर कोकाटे,महाडिक व ढवळपुरीकर यांनी एकत्र येत नविन तमाशा चालू केला.या तमाशात काही काळ काम केल्यांनंतर व एकदा कै.माधवराव गायकवाड यांच्याबरोबर वगनाट्यात झालेल्या लढाईत त्यांच्या डोळ्याला मार लागला त्यामुळे त्यांना काही काळ गावी यावे लागले.
त्यानंतर त्यांना वाडा गावचे रसिक कै.अनंत दगडू केदारी (अंतूशेठ) शांतारामशेठ व इतरांनी आम्ही तुम्हाला भांडवल पुरवतो तुम्ही स्वतंत्र तमाशा काढा.असे सुचवले.
त्यानंतर कै.कोकाटे यांनी मास्टर शंकरराव कोकाटे टोकावडेकर या नावाने स्वतंत्र तमाशा काढला.यासाठी त्यांना वाडागावचे त्याकाळातील कलेची कदर असलेले वाडा गावचे व तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य कै.अनंत केदारी व शांतारामशेठ.यांनी पश्चिम भागाचे नाव महाराष्ट्रात होणार आहे या उद्देशाने त्यांनी सढळ हाताने भरघोस अर्थिक मदत केली.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुंबईला असणा-या चाकरमान्यांनी सुद्धा भरपुर अर्थिक मदत केली.सर्वांची जेवणखाण्याची व्यवस्था केली.त्यामध्ये श्री.सहदेव जढर,श्री.नामदेवराव कशाळे कै.नानासाहेब कशाळे कै.दादाभाऊ कोरडे, कै.ज्ञानदेव वाजे साहेब,कै.गणपत लांघी,गणपत कावळे कै.महादू कोरडे जयावंत कोरडे, श्री.गोविंदराव कशाळे. कै.श्रीपतराव वाजे यांनी कोकाटे यांना तमाशा उभा करण्यासाठी त्याकाळी १५०००/-रूपयाची रोख मदत केली होती.कै.विठ्ठल दगडू कहाणे (डेहणे) यांच्या किराणा दुकानातुन तमाशाचा संपुर्ण बाजार भरला जात असे.
कै.शंकरराव कोकाटे यांच्या मृत्यू मुळे कै.विठ्ठल कहाणे यांना फार मोठी अर्थीक झळ सोसावी लागली होती.
मा.शंकरराव कोकाटे यांना तमाशाच्या स्टेज साठी टोकावडे ता.मुरबाड जि.ठाणे येथील ग्रामस्थांनी कोकाटे हे जरी आपल्या गावचे नसले तरी केवळ टोकावडेकर नाव लावतात मग ते खेड तालुक्यातील का असेना हे गृहीत थरून लाकडे दिली.शिवाय अर्थीक मदत देखील केली.
कै.शंकरराव कोकाटे यांच्या तमाशात श्री.राम पोखरकर (वाळद) रघुनाथ शेलार (खरोशी) श्री.शिवराम थोरात,कै.शांताराम थोरात (टोकावडे) यांनी भुमीका केल्या.श्री.शिवराम थोरात-(टोकावडे) यांनी त्यांना शेवटपर्यत साथ दिली.
कै.कोकाटे यांच्या तमाशाचे ओपनिंग हे दस-याच्या शुभमुहर्तावर टोकावडे येथील मुक्ताबाईच्या मंदिराच्या पटांगणात होत असे.हा खेळ पहायला भागातील जनसमुदायाचा महापुर लोटत असे.
दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी हा तमाशा बुकिंग केलेल्या गावी जात असे.
कै.कोकाटे यांचा तमाशा मुंबईच्या थिएटर मध्ये होत असताना अनेक लोक केवळ शंकरराव कोकाटे यांची भुमीका पाहण्यासाठी येत असत.कोकाटे हे वगनाट्यामध्ये नकारात्मक ( निगेटिव्ह ) रोल करायचे.
त्यांनी सिध्दीजोहर,अफजलखान,औरंगजेब, दानवांच्या, राक्षसांच्या आदी प्रभावी भुमीका केल्या.या भुमीका प्रचंड ताकदवान होत्या.या भुमिकांच्या अजुनही चर्चा रंगतात.हे विशेष.
त्यांच्या सुरंगी या नाटकातील दरोडेखोराच्या भुमिकेतले फोटो आजही नारायणगाव येथील राजकमल हाँटेलमध्ये पहावयास मिळतात.या फोटोतील वेशभुषा व केशभुषा पाहुन लोकप्रिय चंद्रकांता मालीकेतील क्रूरसिंंगची भुमिका साकारली गेली.
त्याकाळात कै.कोकाटे यांच्या तमाशामध्ये साधारण सत्तर,ऐशी लोक होते.स्टेज,कनात, राहुटी,पडदे,लाईट ,स्पिकर इत्यादी साहित्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र दोन ट्रक होते.सर्व सामग्री अद्यायावत होती.
कै.कैकाटे यांचा हा तमाशा साधारण ९ ते १० वर्ष सुरू होता.त्यांनी त्यांचा तमाशा संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागात केला कै.कोकाटे यांनी.ख-या अर्थाने आपल्या पश्चिम भागाचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात मोठे केले.
मी एकदा जालन्याला गेलो होतो.तेव्हा एका वृद्ध माणसाबरोभर चर्चा करत असताना त्यांनी कै.शंकरराव कोकाटे यांनी केलेल्या भुमीकांविषयी आठवणी सांगीतल्या. ते ज्या वेळी सांगत होते त्या वेळी मी रोमांचीत झालो व नकळत अभिमानाने डोळे पाणावले व उर भरून आला.
आजही कधी कोकणात जा.अनेक वृद्ध लोक आजही कै.शंकरराव कोकाटे यांच्या आठवणी सांगतील.
कै.कोकाटे यांचा तमाशा हा ठाणे जिल्ह्यातुन शहापुर येथील एका गावातुन तमाशाचे काम संपवून परतीचा प्रवास करत असताना किनवलीच्या हद्दीत त्यांच्या तमाशाचा ट्रक उलटला. त्त्या अपघातामध्ये हालगीपटू कै.शांताराम थोरात - टोकावडे कै मुळूक आचारी (चास) यांचा मृत्यू झाला.यामध्ये मोठ्या प्रमाणावर तमाशाचे नुकसान झाले.अर्थीक हानी झाली.आणि यामुळे कर्जाच्या खाईतअसलेला हा तमाशा अजूनच कर्जाच्या दरीत कोसळला.आणि यातुन हा तमाशा पुढे कधीच वर आला नाही.
या धक्क्याने कै.कोकाटे हे आजारी पडले त्यांना पुणे येथे दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांचे दुर्दैवाने डेहणे येथे निधन झाले.त्यावेळी त्यांचे वय अवघे 45 वर्ष होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा