गाव तस चांगलं ...

 गाव तसं चांगलं 

मंदोशी गाव हे ख-या अर्थाने महाराष्ट्रात प्रख्यात झाले ते पावसाळ्यात ओसांडून वाहणाऱ्या धबधब्यामुळे.पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग,डोंगर द-या मधुन ओसांडणारे पाणी व धबधबे..तत्कालीन शिक्षक श्री.संजयजी नाईकरे यांचे यामध्ये  मोठे योगदान आहे.पावसाळ्यात हे निसर्गवैभव पहायला हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

तसे पाहिले तर मंदोशी गावाने अनेकांना पुढे आणले.कै.विष्णू कमाजी हुरसाळे! के.खेमा तळपे,श्री,सहदेव जढर,कै.विष्णू पांडु तळपे,श्री.विष्णू गोमा तळपे,कै.हरिभाऊ आंबवणे श्री.बारकू तळपे, श्री.किसन गोडे,श्री.होनाजी मोसे श्री.कुशाबा अंबेकर या नामवंत पहिलवानांनी अनेक संस्मरणीय कुस्त्या केल्या.त्याकाळी या कुस्त्या केवळ पागोट्यावर  (फेटा)  असत.त्यानंतर श्री.हरिभाऊ हुरसाळे,श्री.महादू मोहन, श्री.अशोक सुतार,श्री.दत्ता आंबवणे,श्री.अंकुश हुरसाळे, श्री.प्रकाश आंबेकर ,.दत्ता तळपे,श्री.सुरेश तळपे,श्री.भिमाजी मिलखे अशा अनेक जणांनी गावचे नाव अजरामर केले.पश्चिम भागात मंदोशी गावाला एक परंपरा होती..भागात दरारा,होता नावलौकिक होता.

जसे गावासाठी पहिलवान मंडळींचे योगदान होते.तसेच अनेक कलाकार सुद्धा होते..फार पुर्वी गावचा तमाशा होता.कै.विष्णू हुरसाळे,कै.मोतीराम मोहन,कै.संपत जढर कै.बुधाजी तळपे, कै.शंकर अहिलू तळपेअसे असे अनेक कलाकार होऊन गेले या कलाकारांनी त्यांची कला कोकणापर्यंत सादर करून मंदोशी गाव कुठेतरी आहे याची जाणीव करून दिली.त्यानंतर गावात हर्मोनियम (पायपेटी) पेटीमास्तर तयार झाला पाहिजे या जाणिवेतुन गावाने श्री.धर्मा बुधाजी तळपे यांना हार्मोनियम शिकवण्यासाठी गावाने पेटीमास्तरची नेमणुक केली.त्याचा संपुर्ण खर्च (पगार) त्यावेळी गावाने उचलला.नंतर गावाने त्या काळात साधारण १९६८-६९ साली रुपये गावाने वर्गणी काढून ५०००/-ची मुंबईवरून नवीन पायपेटी विकत आणली.त्यानंतर परत एकदा कै.सिताराम तळपे.श्री.चिंधू धोंडू तळपे.कै.नामा जढर यांनी सुद्धा तमाशासाठी योगदान दिले.

मंदोशी गावचे एकतारी भजन फार प्रसिद्ध होते.कै.बाळासाहेब तळपे (सरपंच ) वीणा व चिपळ्या अप्रतीम वाजवायचे. कै.ज्ञानदेव तळपे पखवाद उत्तम वाजवायचे.त्याकाळात या भजनाला वाडा,भिमन्याहार व भामन्याहार अशा दोन्हीही भागात या भजनाला प्रचंड मागणी होती.त्यांनीही एक प्रकारे गावाचे नाव रोशन केले.

जावळेवाडीचा तमाशा सुद्धा मला आठवतो..कै.नारायण तळपे व श्री.बबन गोडे (मा.सरपंच) (राजा) श्री.शंकर गवारी (कल्याण) व श्री.दुलाजी गोडे (चेअरमन) द्वारपाळ हे पात्र करायचे.गोडे परिवाराचा सुद्धा पुर्वी गावात दरारा होता.वचक होता.त्यांच्याकडे खेड,आंबेगाव.व जुन्रर तालुक्यातुन अनेक लोक येत असत.येवढे त्याकाळात त्यांचे येवढे सबंध होते.हे अश्चर्यकारकच म्हणावे लागेल.त्याच प्रमाणे कै.शंकर राघुजी हुरसाळे यांचे सुद्धा तत्कालीन राजकीयय पुढारी खासदार श्री.अशोकराव मोहळ,कै.साहेबराव सातकर,आमदार कै.नारायणराव पवार अशा अनेकांशी जवळचे संबध होते.

पश्चिम भागात कै.बाळासाहेब तळपे यांचा सुद्धा प्रचंड दबदबा होता.परंतु अल्पावधीतच त्यांची राजकिय कारकिर्द बहरलीच नाही त्यातच ते गेले.

श्री.धर्मा तळपे,श्री.सुदान बारवेकर,कै.चंद्रकांत मोहन,श्री.बबन आहिरे,श्री.दिगांबर उगले,कै.विष्णू पांडू तळपे यांनी सगीत भजन तालुक्यात प्रसिद्ध केले मला आठवतय सन १९९५ साली मंदोशी गावच्या भजनाचा प्रथम क्रमांक आला होता. सन २००५ पर्यत या भजनाचा सुवर्णकाळ होता.मला आठवतय आठवड्यातील चार दिवस हे भजन बाहेरगावी असायचे.ख-या अर्थाने मंदोशी गावाचे नाव तेव्हा सगळीकडे दुमदुमत होते.कै.चंद्रकांत मोहन यांची भजने अद्यापही कानात रुंजी घालतात.

पुर्वी गावात लग्न कार्यासाठी,यात्रांसाठी गावचा ताफा फार प्रसिद्ध होता..श्री.नामदेव रोकडे (सनई)कै.शांताराम रोकडे (सनई) श्री.कचर रोकडे (ताशा) बबन आहिरे (ताशा) कै.श्रीपत रोकडे धोटा,श्री.शिवराम रोकडे (ढोलकी/ संबळ) यांच्या ताफ्याला सन १९८५ ते १९९९ पर्यत प्रचंड मागणी होती.हा ताफा खेड,आंबेगाव,जुन्नर व मावळ या चार तालुक्यामध्ये गावचे नाव गाजवत होता.ख-या अर्थाने मंदोशी गाव जिल्ह्यात पोहचवण्याचे काम या मंडळींनी केले आहे.

श्री.दत्ता आंबेकर श्री.अंकुश हुरसाळे.यांनी दे आई प्रतिष्ठाणची स्थापना करून भागात प्रथमच हळदीकुंकू,आरोग्य तपासणी, झाडांचे वाटप,भजन,किर्तन या सारख्या माध्यमातून समाजसेवेची मुहर्तमेढ रोवली व अद्यापही त्यांचे कार्य चालू आहे. हाच धागा पकडून कोकाटवीर देवस्थानच्या माध्यमातून श्री शंकर गवारी व श्री.सखाराम गोडे यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे.

कै.नारायण हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक कै.दत्तू हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक व मंगलाष्टका श्री.सुदाम बारवेकर यांनी वाचलेली पोथीव अध्याय अद्यापही जुने लोक विसरू शकलेले नाहीत.

श्री.वामण जढर यांच्या अमृता व नमृता या दोन मुलींनीसुद्धा बाल किर्तनकार म्हणून भरपुर प्रसिद्धी मिळवली व गावचे नाव महाराष्ट्रभर पोहचवले.

आताही ह.भ,प.अशोक महाराज हुरसाळे एक तरूण प्रवचनकार व किर्तनकार म्हणून नावारूपाला येत आहेत.श्री.रोहिदास व श्री.एकनाथ वाघमारे श्री.गोपाळ हुरसाळे श्री.सुदामराव तळपे साहेब श्री.दत्ता गोडे,श्री.नामदेव हुरसाळे,श्री नामदेव तळपे साहेब (मंदिर बांधकामात मोलाचे कार्य)श्री.एकनाथ तळपे (उपसरपंच / बिरसा ब्रिगेड)श्री.अरूण मोहन श्री.यमन हुरसाळे, श्री.शिवाजी हुरसाळे,श्री.अनिल तळपे (अध्यक्ष शिक्षक समिती) श्री.देवराम मोहन यांचे सुद्धा गावासाठी भरपुर योगदान आहे. श्री.शंकरराव गवारी हे सुद्धा सामुदायिक वधूवर सुचक मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांनी सुद्धा गावचे नाव नाशिक,अहमदानगर,ठाणे व पुणे अशा चार जिल्ह्यात नेले आहे.प्रा.श्री.गणेश हुरसाळे सर यांनी सुद्धा पुण्यासारख्या विद्येचे माहेघर असलेल्या शहरात शुन्यातुन ज्ञानज्योत क्लासेसच्या माध्यमातून मंदोशी गावचे नाव मोठे केले आहे. २५-३० शिक्षक त्यांच्याकडे नोकरी करतात.मी सुद्धा ग्रामीण संस्कृतीच्या माध्यमातून गावचे नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येक जनआपापल्या परीने गावचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत या सारखा आनंद नाही.तरी  सगळेजण एकत्र येत नाही.हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल..



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस