Translate

ड्रोन: अर्थ, प्रकार, कंपन्या आणि किमती – संपूर्ण माहिती

ड्रोन म्हणजे काय?(What is drone)

<img src="..." alt=" शेतीसाठी ड्रोन >
ड्रोन म्हणजे काय? ड्रोन (Drone) हे मानवविरहित हवाई वाहन (UAV – Unmanned Aerial Vehicle) असून ते रिमोट कंट्रोल किंवा ऑटोमॅटिक सिस्टिमने उडवले जाते. आज शेती, फोटोग्राफी, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रात ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढत आहे. या लेखात आपण ड्रोनचे उपयोग, प्रकार, फायदे, तोटे आणि भारतातील किमती सविस्तर पाहणार आहोत.

सध्याच्या काळात ड्रोन हे एक वरदानच म्हणावे लागेल. कारण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी लाभदायक होत असतो. 

त्यामुळे डिजिटल युगात मोठी क्रांती झाली असून ते कृषी क्षेत्र, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, संरक्षण, कला अशा सर्वच क्षेत्रात त्याचा उपयोग होताना दिसतो.

ड्रोनचा वापर कुठे होतो?

शेती (Agriculture), पिकांचे सर्वेक्षण

खत व कीटकनाशक फवारणी, 

त्पादनाचा अंदाज, जमिनीची मोजणी ड्रोन द्वारे करणे अतिशय सुलभ होते.

सुरक्षा आणि पोलिस विभाग

जमावावर नजर, गुन्हे शोधणे, सीमेवर नजर ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत शोधमोहीम यासाठी पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्यावरचा बराच ताण ड्रोन मुळे कमी होतो. आणि मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाचतो. 

फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग

डिजिटल युगात जसजशी क्रांती झाली तशी सामाजिक क्रांती सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे. अलीकडे लग्न समारंभामध्ये ड्रोनद्वारे शूटिंगला खूप महत्त्व आले आहे. 

त्यामुळे ड्रोनचा उपयोग लग्न समारंभ, जास्त प्रमाणात होताना दिसतो. त्याचप्रमाणे सिनेमा क्षेत्र, एपिसोड, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म मध्ये सिनेमॅटिक शूट, ड्रोनद्वारे जास्त प्रमाणात केले जाते.

अनेक लोक व्हिडिओ ब्लॉग बनवतात. आणि ते युट्युबवर प्रकाशित करतात. त्यासाठी ज्यांचा विषय पर्यटन स्थळांचा आहे ते लोक पर्यटनस्थळांचे एरियल व्ह्यू ड्रोन द्वारे घेत असतात. 

आणि त्यांचे अतिशय सुंदर असे ब्लॉग youtube वर प्रकाशित करतात. त्यांच्या दृष्टीने हा एक मोठा फायदाच म्हणावा लागेल.

आपत्ती व्यवस्थापन

अलीकडच्या काळात देशात आणि महाराष्ट्रात पूर, भूकंप, आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. अडकलेल्या लोकांचा शोध व रेस्क्यू ड्रोनच्या माध्यमातून यशस्वीरित्या करता आले त्यामुळे जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली नाही व प्रशासनाचा भार हलका झाला. हे ड्रोनचे यश म्हणावे लागेल.

औद्योगिक वापर

वीज लाईन, गॅस पाइपलाइन, रेल्वे ट्रॅक तपासणी, बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण सुधा ड्रोनच्या माध्यमातून करता येते. त्यामुळे विकासाला एक प्रकारे गती प्राप्त झाली आहे. 

डिलिव्हरी सेवा

औषधे, पार्सल, खाद्यपदार्थांची डिलिव्हरी

दुर्गम भागात तातडीची मदत पोहोचवणे. यामुळे लोकांना वेगाने मदत प्राप्त होते. व वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. हे केवळ ड्रोन द्वारे शक्य झाले आहे.

नकाशे तयार करणे (Mapping & Surveying)

जमिनीचे अचूक मोजमाप, 3D नकाशे बनवणे, यामुळे महसूल विभागाचे आणि भूमी अभिलेख, विभागाचे काम हलके झाले आहे.

ड्रोनचे फायदे

वेळ आणि मनुष्यबळ वाचते, धोकादायक ठिकाणी माणसाऐवजी ड्रोन पाठवता येतो

अचूक माहिती मिळते, खर्च कमी होतो

ड्रोनचे तोटे

चुकीच्या वापराने सुरक्षा धोक्यात

अपघाताची शक्यता, गोपनीयतेचा भंग होऊ शकतो, काही लोक चुकीच्या मार्गाने ड्रोनचा उपयोग करतात. मध्यंतरी अनेक लोक चोरीच्या उद्देशाने एखाद्या घरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवून रात्री चोऱ्या पण करत होते. त्यामुळे काही अंशी ड्रोनवर प्रशासनाने बंदी घातली.

काही ड्रोनची किंमत जास्त असल्यामुळे सामान्य लोकांना ते परवडत नाही.

ड्रोन हे आधुनिक तंत्रज्ञानातील अत्यंत उपयुक्त साधन आहे. शेतीपासून सुरक्षा, उद्योग, चित्रिकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात ड्रोनचा वापर सतत वाढत आहे. योग्य नियमांचे पालन करून ड्रोनचा वापर केला तर ते अत्यंत फायदेशीर ठरते.

ड्रोनमध्ये खालील तंत्रज्ञान असते:

कॅमेरा,GPS, सेन्सर्स, मोटर्स, कंट्रोलर,

व बॅटरी हे सर्व तंत्रज्ञान मिळून ड्रोनला हवा मिळेल त्या दिशेने उड्डाण करू देते.

ड्रोनचे प्रकार

ड्रोन मुख्यतः खालील प्रकारात विभागले जातात:

फोटोग्राफी / व्हिडिओग्राफी ड्रोन

उच्च गुणवत्तेचे कॅमेरे,सिनेमॅटिक शॉट्स

लग्न, पर्यटन, जाहिरातींसाठी वापर केला जातो.

कृषी (Agriculture) ड्रोन

कीटकनाशक फवारणी,पीक निरीक्षण

जमिनीचे सर्वेक्षण केली जाते.

सर्वेक्षण व मॅपिंग ड्रोन (Survey & Mapping)

3D नकाशे, जमीन मोजणी, बांधकाम प्रकल्प ड्रोन द्वारे केली जाते.

सुरक्षा व निरीक्षण ड्रोन

पोलिस व सैन्य,देखरेख/सीमांवर उपयोग केला जातो.

खेळण्यासाठीचे / हौशी ड्रोन

सुरुवातीच्या शिकण्यासाठी, कमी क्षमता, कमी किंमत त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगला उपयोग होतो.

प्रमुख ड्रोन कंपन्या

सध्या भारतात आणि जगभरात खालील कंपन्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत:

1) DJI (चीन)

जगातील नंबर 1 ड्रोन कंपनी

फोटोग्राफी, उद्योग, शेती सर्व क्षेत्रातील ड्रोन सर्वात विश्वसनीय आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत

2) Autel Robotics

उच्च गुणवत्तेचे कॅमेरे व प्रोफेशनल ड्रोन

सर्वेक्षण व औद्योगिक कामांसाठी प्रसिद्ध

3) Parrot (फ्रान्स)

हलके, मजबूत आणि बजेट फ्रेंडली ड्रोन

शिक्षण व औद्योगिक उपयोगांसाठीही चांगले आहेत.

4) Yuneec

मध्यम किंमतीत उत्तम कॅमेरा ड्रोन

फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी चांगले

5) भारतीय कंपन्या (कृषी क्षेत्रासाठी)

IdeaForge

Garuda Aerospace

Dronitech

IoTechWorld

ही भारतीय कंपन्या विशेषतः कृषी फवारणी ड्रोन आणि सर्वेक्षण ड्रोन विकसित करतात.

भारतातील ड्रोनच्या किमती 

ड्रोनची किंमत त्याचा प्रकार, कॅमेरा गुणवत्ता, उड्डाण वेळ, तंत्रज्ञान, आणि उपयोगावर अवलंबून बदलते.

1) खेळण्यासाठीचे/ हौशी ड्रोन

₹3,000 – ₹15,000

सुरुवातीसाठी योग्य

2) एंट्री लेव्हल कॅमेरा ड्रोन

₹20,000 – ₹50,000

यू ट्यूबर, बेसिक शूटसाठी

3) मध्यम श्रेणीचे ड्रोन

₹60,000 – ₹1,20,000

लग्न, फोटोग्राफी, व्यावसायिक व्हिडिओ

4) प्रोफेशनल ड्रोन

₹1,50,000 – ₹5,00,000

सर्वेक्षण / सिनेमॅटिक शूट / औद्योगिक काम

5) कृषी ड्रोन (Agriculture)

₹3,00,000 – ₹10,00,000

कीटनाशक फवारणी व पीक निरीक्षण

लोकप्रिय ड्रोन मॉडेल्स (उदाहरणार्थ)

1) DJI Mini 2 SE

किंमत: ~₹45,000 – ₹50,000

हलके, सुरुवातीसाठी उत्तम

2) DJI Mavic Air 2

किंमत: ~₹55,000 – ₹65,000

फोटोग्राफी/व्हिडिओसाठी परफेक्ट

3) DJI Mini 4 Pro

किंमत: ~₹1,10,000 – ₹1,20,000

कंटेंट क्रिएटरसाठी सर्वोत्तम

4) Autel EVO II Pro

किंमत: ₹3,50,000 – ₹4,50,000

व्यावसायिक आणि सर्वेक्षण कामांसाठी

कृषी फवारणी ड्रोन (10L – 20L)

किंमत: ₹3 – 8 लाख

भारतीय कंपन्यांचे उत्तम पर्याय उपलब्ध

ड्रोन खरेदी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

ड्रोन DGCA नियमांनुसार परवानगी/नोंदणी आवश्यक आहे का हे तपासा

बॅटरी टाइम (Flight Time)

कॅमेराची गुणवत्ता

GPS स्थिरता

स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिस सेंटर

ड्रोनचे वजन (250g पेक्षा जास्त असल्यास नियम कठोर)

ड्रोन विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. ड्रोन उडवण्यासाठी परवानगी लागते का?

➡️ हो, भारतात DGCA च्या नियमांनुसार 250g पेक्षा जास्त ड्रोनसाठी नोंदणी आवश्यक आहे.

Q2. ड्रोन शेतीसाठी फायदेशीर आहे का?

➡️ हो, कीटकनाशक फवारणी, पीक निरीक्षण आणि वेळ बचतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Q3. सुरुवातीसाठी कोणता ड्रोन योग्य?

➡️ एंट्री लेव्हल कॅमेरा ड्रोन किंवा Mini सिरीज योग्य ठरते.

निष्कर्ष 

ड्रोन हे आजच्या काळातील अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे. फोटो-व्हिडिओ, शेती, सुरक्षा किंवा सर्वेक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात त्याचा वेगाने वापर वाढत आहे. वेगवेगळ्या कंपन्या आणि किमतीमुळे ड्रोन निवडताना आपला उपयोग, बजेट आणि नियम यांची योग्य जुळवाजुळव करणे महत्त्वाचे आहे.

ग्रामीण संस्कृती आधुनिक तंत्रज्ञान Rural culture and modern technology 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...