Translate

पिकावरील रोग : ओळख, कारणे व प्रभावी उपाय – शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

पिकावरील रोग : ओळख, कारणे व उपाय

भारतीय शेतीमध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी केवळ सुधारित बियाणे व खतांचा वापर पुरेसा नसतो, तर पिकांवरील रोगांचे योग्य वेळी निदान व नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

<img src="..." alt=" पिकावरील कीड व्यवस्थापन >
रोगांमुळे उत्पादनात मोठी घट होते, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि कधी कधी संपूर्ण पीकही वाया जाते. त्यामुळे पिकावरील रोगांची ओळख, कारणे आणि प्रभावी उपाय जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. 

पिकावरील रोग म्हणजे काय?

पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर किंवा गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणाऱ्या समस्यांना पिकावरील रोग म्हणतात. हे रोग मुख्यतः बुरशी, जिवाणू, विषाणू, कीड तसेच पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे होतात.

पिकांवरील प्रमुख रोगांचे प्रकार

1️⃣ बुरशीजन्य रोग (Fungal Diseases)

हे रोग सर्वाधिक आढळतात आणि दमट वातावरणात जलद पसरतात.

उदाहरणे :

करपा (Blight), भुरी (Powdery Mildew), तांबेरा (Rust), मर रोग 

लक्षणे :

पानांवर पांढरी किंवा तपकिरी पावडर

झाड कोमेजणे, पानांवर डाग पडणे

2️⃣ जिवाणूजन्य रोग (Bacterial Diseases)

हे रोग प्रामुख्याने पाण्याद्वारे किंवा जखमांमधून पसरतात.

उदाहरणे :

करपा, पानांवरील ठिपके,मऊ कुज (Soft Rot)

लक्षणे :

पानांवर पाण्यासारखे डाग, झाडातून दुर्गंधीयुक्त द्रव स्रवणे

3️⃣ विषाणूजन्य रोग (Viral Diseases)

हे रोग किडींमार्फत (मावा, पांढरी माशी) पसरतात.

उदाहरणे :

पान वाकडे होणे, पिवळसरपणा (Yellow Mosaic),

लक्षणे :

पानांवर पिवळे ठिपके,झाडाची वाढ खुंटणे

4️⃣ पोषणतत्त्वांची कमतरता

ही रोग नसली तरी चुकीच्या खत व्यवस्थापनामुळे निर्माण होणारी समस्या आहे.

लक्षणे :

नत्राची कमतरता – पाने पिवळी

स्फुरदाची कमतरता – झाड खुंटणे

पालाशाची कमतरता – कडा जळल्यासारख्या दिसणे

पिकानुसार आढळणारे प्रमुख रोग.

1️⃣ कापूस

करपा (Boll Rot), पान करपा, पिवळा मोझॅक विषाणू रोग, मर रोग

2️⃣ सोयाबीन

पिवळा मोझॅक रोग, तांबेरा (Rust),

करपा, मर रोग

3️⃣ भात (धान)

ब्लास्ट रोग,करपा, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट, तांबेरा

4️⃣ गहू

तांबेरा (Yellow / Brown Rust)

भुरी रोग, करपा

5️⃣ मका

पान करपा, डाउनी मिल्ड्यू, करपा

6️⃣ ऊस

लाल कुज (Red Rot),व्हायरल मोझॅक

टॉप रॉट, वाळवी व मर रोग

7️⃣ भाजीपाला पिके

(टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी)

करपा,पान वाकडे होणे, भुरी, बॅक्टेरियल विल्ट

8️⃣ डाळी पिके

(हरभरा, तूर, मूग, उडीद)

मर रोग, करपा, पिवळा मोझॅक,पान डाग रोग

9️⃣ तेलबिया पिके

(भुईमूग, सूर्यफूल, मोहरी)

तांबेरा, करपा, पान डाग व मर रोग

1️⃣0️⃣ फळपिके

(द्राक्षे, डाळिंब, आंबा)

भुरी, करपा, अँथ्रॅक्नोज, डाळिंब फुट रोग

पिकावरील रोग ओळखण्याचे उपाय

दररोज पिकांची पाहणी करणे

पानांचा रंग, आकार व डाग तपासणे

झाडाची वाढ व फुलोरा निरीक्षण करणे

गरज असल्यास कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे

पिकावरील रोगांवरील प्रभावी उपाय

✅ 1. प्रतिबंधात्मक उपाय

प्रमाणित व रोगमुक्त बियाण्यांचा वापर

पीक फेरपालट (Crop Rotation)

योग्य अंतरावर लागवड

पाणी साचणार नाही याची काळजी

✅ 2. जैविक उपाय

ट्रायकोडर्मा, बॅसिलस यांसारख्या जैविक घटकांचा वापर

निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क फवारण

✅ 3. रासायनिक उपाय

बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर

जिवाणू व विषाणूजन्य रोगांसाठी शिफारस केलेली औषधे

औषध फवारणी करताना लेबलवरील सूचना पाळणे.

✅ 4. कीड नियंत्रण म्हणजे काय? ते कसे करावे?

विषाणू पसरवणाऱ्या किडींचे नियंत्रण

चिकट सापळे व प्रकाश सापळे वापरणे

खाली पिकावरील किड नियंत्रण कसे करावे, तसेच कोणत्या पिकांवर कोणती किड येते, कोणती औषधे व किती प्रमाणात वापरावीत याची थोडक्यात पण उपयोगी माहिती दिली आहे. ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे; स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते.

पिकावरील किड नियंत्रण क्षेत्रानुसार शिफारस केलेले कीटकनाशक व फवारणी प्रमाण.

(हे प्रमाण केवळ सामान्य मार्गदर्शन आहे. यासाठी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या शिफारशी नुसारच फवारणी करा.)

१ एकर क्षेत्रासाठी पाणी : 150 ते 200 लिटर

१ हेक्टर (2.5 एकर) : 375 ते 500 लिटर

1️⃣ कापूस

किड: मावा, पांढरी माशी

कीटकनाशक : इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 

प्रमाण: एकरी 40 ml औषध / 200 Lपाणी.

हेक्टरी: 100 ml औषध / 500 Lपाणी.:

कीटकनाशक मावा थायमेथॉक्साम 25 WG

प्रमाण: एकरी 40 g औषध / 200 Lपाणी.

हेक्टरी: 100 g औषध / 500 Lपाणी

कीड: बोन्डअळी:

कीटकनाशक: एमामेक्टीन बेंझोएट 5 SG

प्रमाण: एकरी 60 ml औषध / 200 Lपाणी.

हेक्टरी: 150 ml औषध / 500 Lपाणी

2️⃣ सोयाबीन

किड: पाने खाणारे अळी 

कीटकनाशक: क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5 SC

प्रमाण: एकरी 60 ml औषध / 200 Lपाणी.

हेक्टरी: 150 ml औषध / 500 Lपाणी

कीड:उंटअळी

कीटकनाशक : लॅम्डा सायहॅलोथ्रीन 5 EC

प्रमाण: एकरी 100 ml औषध / 200 Lपाणी.

हेक्टरी: 250 ml औषध / 500 Lपाणी

3️⃣ भात (धान)

किड: खोडकिड

कीटकनाशक : कार्टाप 4G (दाणेदार)

प्रमाण एकरी 10 kg / हेक्टरी 25 kg

किड :तुडतुडे

कीटकनाशक : फिप्रोनील 5 SC

प्रमाण एकरी 400 ml / 200 L पाणी

हेक्टरी 1 लिटर / 500 L पाणी

4️⃣ गहू

किड :मावा

कीटकनाशक: थायमेथॉक्साम 25 WG

प्रमाण एकरी 40 g / 200 L पाणी

हेक्टरी 100 g / 500 L पाणी

किड:तुडतुडे

कीटकनाशक:डायमेथोएट 30 EC

प्रमाण एकरी 300 ml / 200 L पाणी

हेक्टरी 750 ml / 500 L पाणी

5️⃣ भाजीपाला (टोमॅटो, मिरची, वांगी)

किड:फळ पोखरणारी अळी

कीटकनाशक: स्पिनोसॅड 45 SC

प्रमाण एकरी 70 ml / 200 L पाणी

प्रमाण हेक्टरी180 ml / 500 L पाणी

कीटकनाशक: थ्रिप्स अबामेक्टीन 1.9 EC

प्रमाण एकरी 150 ml / 200 L पाणी

प्रमाण हेक्टरी 375 ml / 500 L पाणी

6️⃣ डाळी (तूर, हरभरा, मूग)

किड:शेंगा पोखरणारी अळी

कीटकनाशक: इंडोक्झाकार्ब 14.5 SC

प्रमाण एकरी 100 ml / 200 L पाणी

प्रमाण हेक्टरी 250 ml / 500 L पाणी

कीटकनाशक: एमामेक्टीन बेंझोएट 5 SG

प्रमाण एकरी 80 g / 200 L पाणी

प्रमाण 200 g / 500 L पाणी

7️⃣ तेलबिया (भुईमूग, सूर्यफूल)

किड :पाने खाणारी अळी

किटकबाशक: क्विनालफॉस 25 EC

प्रमाण एकरी 400 ml / 200 L पाणी

प्रमाण हेक्टरी 1 लिटर / 500 L पाणी

किटकनाशक: मावा क्लोरपायरीफॉस 20 EC प्रमाण एकरी 500 ml / 200 L पाणी

प्रमाण हेक्टरी 1.25 लिटर / 500 L पाणी

वरील कीटकनाशकांची निवड व प्रमाण स्थानिक कृषी विभागाच्या शिफारशीप्रमाणे बदलू शकते.

महत्त्वाच्या सूचना

कीटकनाशक फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा.

एकाच कीटकनाशकांची वारंवार फवारणी टाळा.

👉🏻 हेही वाचा स्मार्ट शेती बाबत संपूर्ण मार्गदर्शन

संरक्षण साधने (मास्क, हातमोजे) वापरा

औषधाचे लेबल व शिफारस वाचा.

योग्य वेळी किड ओळख → प्रतिबंध → जैविक → रासायनिक उपाय या क्रमाने नियंत्रण केल्यास खर्च कमी होतो व उत्पादन वाढते. अति औषध फवारणी टाळून संतुलित कीड व्यवस्थापन करणे हीच शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

आजच्या काळात ड्रोन फवारणी, माती परीक्षण, मोबाइल अ‍ॅप्स यांच्या मदतीने रोगांची अचूक ओळख व नियंत्रण शक्य झाले आहे. यामुळे खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
🧑‍🌾 निष्कर्ष

पिकावरील रोग हे शेतीसाठी मोठे आव्हान असले तरी योग्य वेळी ओळख, प्रतिबंध आणि योग्य उपाय केल्यास नुकसान टाळता येते. शेतकऱ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.

सूचना:

या लेखातील कीटकनाशकांची माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. प्रत्यक्ष वापरापूर्वी आपल्या तालुका कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान (Rural culture & modern technology)


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...