काय आहे हे ॲमेझॉन?
आता ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. त्यामध्ये ॲमेझॉन ही कंपनी आघाडीवर आहे. परंतु पूर्वी एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर दुकानात जाऊन आणावी लागत असे.
परंतु त्यानंतर अनेक ठिकाणी मोठमोठे मॉल निर्माण झाले. त्यामुळे एका छताखाली अनेक वस्तू विकत घेता येणे शक्य झाले.
बाजारात सतत बदल होत राहतात. आता तर ऑनलाइन युग आले आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची सोय निर्माण झाली आहे. दुकानात किंवा मॉलमध्ये जाण्याची गरज उरली नाही.
ऑनलाईन वस्तूंची विक्री करण्यासाठी ॲमेझॉन ही कंपनी आघाडीवर आहे. जी वस्तू हवी आहे ती ॲमेझॉन वर नोंदवून लोक घरपोच वस्तू मागून घेतात.
शिवाय आपला जर एखाद्या व्यवसाय असेल तर आपल्या वस्तू आपण ॲमेझॉन वर विकू शकतो.
परंतु अनेकांना ॲमेझॉन म्हणजे काय हे माहीत नाही. त्यासाठी या लेखाद्वारे खालील प्रमाणे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानात आणि वेळेत आणि बचतीमध्ये नक्कीच खूप मोठा फरक पडेल.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन खरेदी-विक्री हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात Amazon (ॲमेझॉन) हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि विश्वासार्ह व्यासपीठ आहे.
ग्राहक म्हणून खरेदी करणे असो किंवा Seller म्हणून उत्पन्न मिळवणे असो ॲमेझॉन दोन्हींसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देते.
या लेखात आपण ॲमेझॉनवर खरेदी (Buying) आणि विक्री (Selling) या दोन्ही प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.भाग 1 : ॲमेझॉनवर खरेदी (Buying on Amazon)
1. ॲमेझॉन खाते (खाते) तयार करणे
ॲमेझॉनवर खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम खाते तयार करावे लागते.
तुमचा मोबाईल नंबर / ई-मेल वापरून खाते उघडा.
OTP द्वारे व्हेरिफिकेशन करा.
डिलिव्हरी अॅड्रेस आणि पेमेंट पद्धती सेव्ह करा.
2. हवे ते उत्पादन शोधणे
ॲमेझॉनच्या सर्च बारमध्ये:
उत्पादनाचे नाव, ब्रँड, किंमतफीचर्स टाकून शोध करता येतो.
यातील Filter आणि Sort ऑप्शन्स वापरून:
किंमत, रेटिंग, ब्रँड, डिस्काऊंट नुसार उत्पादन निवडणे सोयीचे होते.
3. उत्पादने तपासताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे
Customer Reviews: इतर ग्राहकांचे अनुभव वाचणे.
Ratings: 3.5+ स्टार असलेली प्रॉडक्ट्स जास्त विश्वसनीय असतात.
Product Description: फीचर्स, वॉरंटी, साईज, मटेरियल तपासा.
Seller Information: ब्रँड/सर्टिफाइड सेलरकडून खरेदी करणे सुरक्षित राहते.
4. ऑर्डर कशी करावी
उत्पादन निवडा
Buy Now किंवा Add to Cart क्लिक करा
अॅड्रेस निवडा,
पेमेंट मोड निवडा
Cash on Delivery (बहुतेक ठिकाणी उपलब्ध)
UPI / Net Banking
Debit / Credit Card
ऑर्डर प्लेस करा
5. डिलिव्हरी व ट्रॅकिंग
“Your Orders” मध्ये जाऊन उत्पादन कुठे पोहोचले आहे हे ट्रॅक करता येते
Amazon Logistics किंवा इतर कुरिअर द्वारे डिलिव्हरी केली जाते
6. रिटर्न आणि रिफंड
ॲमेझॉनची रिटर्न पॉलिसी भारतात सर्वात चांगली मानली जाते.
Wrong / Damaged / Defective प्रॉडक्टसाठी रिटर्न
पिकअप झाल्यावर 3–7 दिवसांत रिफंड
काही वस्तूंवर "Replacement Only" पॉलिसी असते.
ॲमेझॉन वर विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस असतात परंतु आपल्या घराच्या जवळ मिळणाऱ्या वस्तू आणि ॲमेझॉन वर खरेदी केलेले वस्तू यामध्ये किमतीमध्ये बराच फरक असतो.
ॲमेझॉन वर खरेदी केलेल्या वस्तू नक्कीच महाग असतात. त्यामुळे ज्या वस्तू आपल्या जवळच्या दुकानात किंवा मॉलमध्ये नाहीत. किंवा पाहिजे तश्या नाहीत असे असेल तरच ॲमेझॉन वर खरेदी करणे सोयीस्कर ठरते.
भाग 2 : ॲमेझॉनवर विक्री (Selling on Amazon)
ऑनलाईन उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ॲमेझॉन एक उत्तम व्यासपीठ आहे. लाखों ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी येथे मिळते.
1. Amazon Seller Account कसे तयार करावे?
Seller Central (sell.amazon.com) वर जाऊन:
मोबाइल नंबर / ई-मेल, व्यवसाय नाव
GST नंबर,बँक अकाउंट, पत्ता (Pickup Address) नोंदणी करा.
GST आवश्यक आहे. (काही श्रेणींमध्ये GST शिवाय विक्री करता येते)
2. विक्री मॉडेल्स (Selling Models)
1) Fulfilled by Amazon (FBA)
तुम्ही माल Amazon Warehouse मध्ये पाठवता
स्टोरेज, पॅकिंग, शिपिंग ॲमेझॉन करते
उत्पादने Prime Badge मिळवतात
विक्री जलद वाढते
2) Fulfilled by Merchant (FBM)
माल तुमच्या घरी/गोदामात ठेवता
पॅकिंग आणि शिपिंग तुम्हाला कkरावे लागते
कमी शुल्क पण काम जास्त
3. उत्पादने लिस्ट करणे
प्रॉडक्टचे नाव,किंमत,वजन,ब्रँड,फोटो (व्हाईट बॅकग्राऊंड),फीचर्स,कीवर्ड्स
देऊन प्रॉडक्ट लिस्ट करावे.
4. किंमत व नफा (Pricing & Profit)
ॲमेझॉन खालील शुल्क घेतो:
Referral Fee, Closing Fee
Fulfillment Fee (FBA असल्यास)
Shipping Charges
नफा काढण्यासाठी: Selling Price (खर्च + Amazon Fees) = Profit
5. पॅकिंग व शिपिंग
Seller Flex / Easy Ship / Self Ship पर्याय इत्यादी पर्याय उपलब्ध असतात.
प्रॉडक्ट सुरक्षितपणे पॅक करणे आवश्यक
वेळेत शिपिंग केल्यास अकाउंट हेल्थ चांगले राहते.
6. पेमेंट
ॲमेझॉन दर 7 किंवा 14 दिवसांनी तुमच्या खात्यात पैसे जमा करत राहतो.
डॅशबोर्डवर सर्व व्यवहार दिसतात.
7. Seller Account Health
चांगली विक्री करण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या:
कमी रिटर्न, जलद डिलिव्हरी, कमी कॅन्सलेशन्स, चांगले रेटिंग, प्रॉडक्ट क्वालिटी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत
8. ॲमेझॉनवर विक्रीचे फायदे
लाखों ग्राहक,Prime डिलिव्हरी,
Easy Shiping, कमी खर्चात मोठा व्यवसाय, कमी जोखीम
24x7 विक्री
ॲमेझॉन हे ग्राहकांसाठी सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर खरेदीचे ठिकाण आहे, तर विक्रेत्यांसाठी मोठा ग्राहकवर्ग आणि प्रचंड व्यवसाय संधी देते.
योग्य माहिती, चांगली उत्पादने व योग्य किंमत ठेवून तुम्हीही ॲमेझॉनवर सहज ऑनलाईन उत्पन्न मिळवू शकता.
या लेखाद्वारे आपणास ॲमेझॉन बद्दल माहिती मिळाली असेलच तर नक्कीच ॲमेझॉनचा वापर करा. व आपला व्यवसाय वाढवा. पुढे न्या, त्याचप्रमाणे खरेदी करताना आजूबाजूला सुद्धा चौकशी करा मगच खरेदी करा.
ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान.(Rural culture & modern technology)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा