Translate

“स्मार्ट शेती म्हणजे काय? फायदे, तंत्रज्ञान आणि वापर

शेतीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान  फायदे ववापर (2025 -2026) (Smart Farming in Marathi) 

पूर्वी अजून सुद्धा काही ठिकाणी  पारंपारिक शेती केली जाते. पाण्याची टंचाई, पावसावर अवलंबून असलेली शेती, पारंपरीक यंत्र, ज्ञानाचा अभाव, मजूर टंचाई यामुळे शेतीमध्ये म्हणावे तसे उत्पादन होत नव्हते. 

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करण्याची सोडून इतर नोकरी व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले. सरकारच्या दृष्टीने ही चिंतेची बाब होती.

शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे, त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पाहिजे. हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट होते. 

भारतात आता शेतीबाबत मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहेत. अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळले आहेत. नवनवीन साधने, यांत्रिक उपकरणे, माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून भारतात आता मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करण्याचा कल निर्माण झाल्याने त्याचा शेतकऱ्याला फायदा होताना दिसत आहे.

परंतु आजही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मार्ट शेतीचा शेतकऱ्यांनी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. स्मार्ट शेतीचे ज्ञान, स्मार्ट शेतीचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे फार आवश्यक आहे.

​"पारंपारिक कष्टाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तरच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल. २०२५-२६ च्या काळात स्मार्ट शेती (Smart Farming) हा केवळ पर्याय नसून गरज बनली आहे

हा लेख वाचून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना नक्कीच याचा उपयोग होईल.

आधुनिक शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान (Smart Farming Technology) मोठ्या प्रमाणावर आता वापरले जात आहे.

<img src="..." alt=" स्मार्ट शेती कशी करावी  >
पावसावर अवलंबून असलेली पारंपरिक शेती आता डिजिटल, स्वयंचलित आणि डेटा-आधारित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक शेती करणे शक्य झाले आहे.

स्मार्ट शेती म्हणजे काय?

स्मार्ट शेती म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मेहनत, कमी खर्च आणि अधिक उत्पादन मिळवण्याची पद्धत.

यात सेन्सर, ड्रोन, IoT (Internet of Things),  Ai, मोबाइल अँप्स, स्मार्ट यंत्रसामग्री, हवामान माहिती, उपग्रह डेटा, आणि स्वयंचलित सिंचन प्रणाली यांचा वापर केला जातो.

👉🏻 हे ही वाचा पिकावरील रोग कारणे आणि त्यावरील उपाय

याबाबत काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. यावरून तुम्हाला स्मार्ट शेतीचे महत्व कळेल.

प्रश्न १: स्मार्ट शेतीसाठी जास्त खर्च येतो का?

उत्तर: सुरुवातीला थोडा खर्च वाटला तरी, खत, पाणी आणि मजुरीमध्ये होणारी बचत पाहता दीर्घकाळात हा खर्च भरून निघतो.

​प्रश्न २: ड्रोन फवारणीसाठी परवाना लागतो का?

उत्तर: हो, व्यावसायिक वापरासाठी नागरी विमानन संचालनालयाच्या (DGCA) नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे मुख्य प्रकार

1️⃣ IoT आधारित (Internet of Things) उपकरणे

शेतात विविध सेन्सर लावले जातात जे जमिनीची आर्द्रता, तापमान, पाणी पातळी, पोषकद्रव्ये याबद्दल माहिती देतात. त्याचा पिकांच्या वाढीसाठी खूप चांगला परिणाम होतो.

उदाहरणे:

Soil moisture sensors

स्मार्ट वॉटर पंप

temperature & humidity sensors

2️⃣ ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology) ड्रोन शेती फायदे

पूर्वी मॅन्युअल पद्धतीने पिकांची तपासणी केली जायची. मोठ्या क्षेत्रामध्ये औषध फवारणी करायला खूप वेळ लागायचा, मजूर लागायचे. 

औषधे सुद्धा खूप लागायची. परंतु आता ड्रोनच्या मदतीने पिकांची तपासणी करणे, त्यामुळे आपल्या पिकावर कोणती कीड/रोग पडले आहे याची ओळख होते. आणि त्याप्रमाणे कीड नियंत्रण करण्यासाठी खत आणि औषध फवारणी (mapping) मॅपिंग प्रमाणे केली जाते. त्यामुळे ही सर्व कामे जलद व अचूक होतात.

3️⃣ आधुनिक सिंचन प्रणाली (Automated Irrigation)

 पूर्वी पाण्याची सुविधा नसल्यामुळे अनेक जमिनी शेती वाचून पडेल होत्या. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती. त्या ठिकाणी शेताला पारंपारिक पद्धतीने पाणी दिले जात असे. त्यामुळे शेतामध्ये भरपूर पाण्याचा वापर केला जात होता. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र सतत पाणी दिल्यामुळे क्षारपड म्हणजेच नापीक जमीन तयार झाली आहे. ही सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण झाली होती.

परंतु आता आधुनिक स्मार्ट शेतीमुळे 

जमिनीचा ओलसरपणा सेन्सरने तपासला जातो आणि पिकांना लागणारे पाणी स्वयंचलितपणे दिले जाते. त्यामुळे पिकांना जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढेच दिले जाते. 

त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत निर्माण झाले आहे. आणि अनेक नापीक जमिनींचे सुपीक शेतीमध्ये रूपांतर झाले आहे.

4️⃣ GIS आणि उपग्रह माहिती (Satellite & GPS)

पूर्वी आपण हवामानाचा अंदाज हा केवळ बातम्यांद्वारे वर्तवला जायचा. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांकडे ही माहिती पोहोचत नव्हती. परंतु स्मार्ट शेती तंत्रज्ञानामुळे आपल्या शेताच्या पिकांची वाढ, हवामान बदल, मातीचे प्रकार, वादळ/दुष्काळ सतर्कता याची माहिती शेतकऱ्यांना मोबाइलवर मिळते. 

त्यामुळे त्या त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपाय योजना करता येतात. त्यामुळे उत्पादन क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते 

5️⃣ AI आधारित सल्ला 

AI तंत्रज्ञान वापरल्यामुळे पिकांना लागणारे खत, कीड नियंत्रण, हवामान बदल व रोग निदान यावर मार्गदर्शन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची अवस्था आधीच माहीत झाल्यामुळे त्या त्या वेळी उपाययोजना करून पिकांना लागणारी खते, किड नियंत्रण, रोग निदान हे करणे सोयीचे होते.

6️⃣ अत्याधुनिक यंत्रसामग्री (Smart Machinery)

 पूर्वी अनेकांकडे बैल होते, नंतर ट्रॅक्टर आले. त्या माध्यमातून शेती केली जायची. परंतु आता स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अनेक शेतकऱ्यांकडे स्वयंचलित ट्रॅक्टर, रोबोटिक स्प्रेयर,सेन्सरयुक्त हार्वेस्टर ही यंत्रे आल्यामुळे वेळ, इंधन आणि मजूर खर्च वाचवतात.

डिजिटल शेतीचे फायदे

1. उत्पादनात 20–30% वाढ

अचूक माहितीवर आधारित शेती केल्याने पिकांना लागणारे खत, पाणी व औषधे योग्य प्रमाणात दिली जातात. आवश्यक तेवढे शेताला पाणी दिल्यामुळे जमिनीत क्षारपड होण्याचा धोका निर्माण होत नाही.

2. पाण्याची 40–60% बचत

ड्रीप + सेन्सर आधारित सिंचनामुळे अनावश्यक पाणी वाया जात नाही. पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांना हा मोठा फायदा आहे. त्यामुळे इतरही जमिनी आता ओळीताखाली आले असल्याचे चित्र पाहायला मिळते.

3. खत व औषधांच्या खर्चात 30% घट

पूर्वी खत आणि औषधे ही अंदाजाने मॅन्युअल पद्धतीने शेतीला देत असत. त्यामुळे खत आणि औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत असे. त्याचा खर्च मोठा होता.

ड्रोन फवारणी व AI निदानामुळे फक्त पाहिजे तिथेच औषधांचा वापर होतो जिथे गरज आहे.

4. श्रम खर्च कमी होतो

स्वयंचलित यंत्रे, पंप, सेन्सर व अँप्समुळे मजूरांची गरज कमी होते. त्यामुळे श्रम आणि वेळेची तसेच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते.

5. पिकांचे रोग लवकर ओळखता येतात.

ड्रोन फोटो, उपग्रह चित्रे आणि AI स्कॅनिंगने रोग सुरुवातीला ओळखता येतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन कीड नियंत्रण करता येते.

6. हवामान बदलाचा धोका कमी

हवामान सतर्कता यामुळे पाऊस, दुष्काळ, गारपीट यापूर्वीच कळते.

7. गुणवत्तापूर्ण उत्पादन

खत आणि पाण्याचे उचित व्यवस्थापन झाल्याने उत्पादनाचा दर्जा सुधारतो.

8. बाजारभावाची माहिती

मोबाइल अँप्सवर दररोजचे बाजारभाव मिळत असल्याने कोणत्या बाजारात माल विकायचा हे ठरवणे सोपे होते.

🚜 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर (आधुनिक शेती उपाय)

1. जमिनीची तपासणी (Soil Testing Sensors)

जमिनीतील NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) पातळी तपासली जाते. यालाच यालाच माती परीक्षण असेही म्हटले जाते. शेती करण्यापूर्वी माती परीक्षण करणे खूप आवश्यक असते. त्यावरच पुढील नियोजन करता येणे शक्य होते.

2. डिजिटल पिक व्यवस्थापन (Crop Monitoring)

मोबाईलवर पिकांची स्थिती, वाढ आणि रोगाचे निदान दिसते.

3. ड्रोनद्वारे औषध फवारणी

ड्रोनद्वारे, संपूर्ण शेतामध्ये एकसारखी आणि सुरक्षित फवारणी होते.

ड्रोन 1 तासात 20–30 एकर औषध फवारू शकतात.

4. स्मार्ट सिंचन पद्धत

पाणी फक्त जिथे गरज तिथेच दिले जाते.

यामुळे पाणी, वेळ आणि विजेची बचत.

5. कृषी यंत्रसामग्री GPS तंत्रज्ञान

GPS असलेले ट्रॅक्टर स्वतः दिशा घेतात, एकसारखी नांगरणी करतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीमध्ये प्रकाश किरणे आणि ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते.

6. मोबाईल अँप्स 

पिकांची शिफारस, हवामान अंदाज,

बाजारभाव याबाबत महत्त्वाची माहिती मिळते.

किड नियंत्रण

सगळं एकाच अँप्स मध्ये उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. व योग्य ते मार्गदर्शन मिळते.

भारतात लोकप्रिय प्रगत शेती तंत्रज्ञान कंपन्या

1. DeHaat

एक मोठे AgriTech स्टार्टअप जे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कृषि इनपुट्स, सल्ला, बीज, खत, कीटकनाशक आणि मार्केट लिंकसेस प्रदान करतो.

डेटा-आधारित परामर्श आणि समाधाने देऊन उत्पादन आणि महसूल वाढवण्यास मदत करतो. 

2. CropIn

AI आणि डेटा-टेक्नॉलॉजी वापरून रियल-टाइम फॉर्म व्यवस्थापन, हवामान, कीटक-रोग अलर्ट आणि पिक ट्रॅकिंग सारखी समाधानं देणारी कंपनी.

सॅटेलाइट, IoT आणि मोबाइल अ‍ॅप्सद्वारे शेतकऱ्यांना स्मार्ट निर्णय घेण्यास मदत करते. 

3. AgroStar

मोबाइल/वेबसाइट आधारित अग्रो-टेक प्लॅटफॉर्म जे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण इनपुट, कृषी सल्ला आणि ज्ञान उपलब्ध करून देते.

पर्सनलाइझ्ड कृषी सल्ला व डेटा-आधारित सूचना देऊन पिक व्यवस्थापन सुधारतो. 

4. BigHaat

डिजिटल मार्केटप्लेस ज्यातून शेतकरी सहजपणे बीज, खत, केमिकल्स व कृषी उपकरणे ऑनलाइन बुक करू शकतो.

शेतकऱ्यांना स्मार्ट इनपुट सोल्यूशन्स उपलब्ध करून देतो. 

5. Fasal (IoT-सेन्सर आधारित

IoT सेन्सर आणि डेटा-एनालिटिक्स वापरून पाणी, खत आणि संसाधन वापराचे ऑप्टिमायझेशन करते.

पिक व्यवस्थापन अधिक अचूक व पैसे वाचवणारं बनवते. 

6. JioKrishi

IoT-आधारित स्मार्ट कृषी सोल्यूशन्स, अग्रो-मॅनेजमेंट टूल्स आणि ऑनलाइन मार्केटप्लेस प्रदान करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

शेतकऱ्यांना विविध इनपुट्स आणि डिजिटल सल्ले एकाच प्लॅटफॉर्मवर मिळवून देतो. 

7. Intello Labs

AI-आधारित इमेज-प्रोसेसिंग व सॉफ्टवेअरने पिक गुणवत्ता, कीटक/रोग ओळख व मार्केट ग्रेडिंगवर काम करते.

कृषी प्रक्रियेत स्वयंचलन व अचूकता आणते. 

8. AgNext Technologies

डेटा-ड्रिव्हन अग्रो-टेक कंपनी जी खाद्य गुणवत्ता विश्लेषण आणि मॉनिटरिंग सिस्टम ऑफर करते.

पिकांची गुणवत्ता, ट्रेसबिलिटी आणि शेत-मार्केट सुलभतेमध्ये मदत. 

9. TartanSense

AI, संगणक दृष्टी आणि रोबोटिक्सचा वापर करून ऑटोमेटेड खेती-सोल्यूशन्स विकसित करणारी भारतीय कंपनी आहे.

यंत्रमानव आधारित स्वयंचलनावर लक्ष केंद्रित यावर प्रामुख्याने भर दिला जातो.

AgriTech vs Smart Farming:

भारतात अनेक AgriTech कंपन्या आहेत ज्यात स्मार्ट सेन्सर, डेटा-एनालिटिक्स, AI, IoT आणि मोबाइल-आधारित टूल्सचा वापर करून पारंपारिक शेती अधिक शहाणपणाने (smarter) बनवण्याचा प्रयत्न केला जातो याला सामान्यतः Smart Farming किंवा Precision Agriculture म्हणतात.

या कंपन्या सेन्सर, ड्रोन, AI आधारित सल्ला आणि स्मार्ट यंत्रे पुरवतात.

स्मार्ट शेती हे भविष्यातील तंत्रज्ञान नसून आजच्या काळाची गरज आहे.

यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पाण्याची बचत होते आणि शेतकरी अधिक सक्षम होतो. डिजिटल साधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर व शाश्वत बनते.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान (Rural culture & modern technology)















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...