गावरान कोंबडी पालन एक महत्त्वाचा जोड व्यवसाय.
कारण शेती हा एक व्यवसाय असला तरी तो निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतो. कधी पाऊसच पडत नाही, तर कधी अतिवृष्टीने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान होते.
कधी पिकावर रोगराई वाढते. अशा अनेक कारणामुळे पिकेल तर शेती अशीच अवस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची असायची.अशावेळी मदतीला धावून यायचा तो म्हणजे जोड व्यवसाय.
कोंबड्या व अंडी, बोकड आणि दूध, विक्री करून ग्रामीण भागात अनेकांचे शिक्षण झाले आहे, किंवा प्रपंचाला हातभार लागलेला आहे.
परंतु या जोडधंद्याचा मोठे व्यवसायात कधीच कोणी वापर केल्याचे दिसत नाही. अनेक तरुण नोकरीसाठी शहराकडे धावताना दिसतात.
परंतु गावाकडेच स्वतःचा एखादा व्यवसाय असावा असे कुणालाच कसे वाटत नाही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येते”
जोडधंदा ही काळाची गरज
वाढत्या महागाईच्या काळात शेतीसोबत जोडधंदा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बदलत्या हवामानामुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात.
अशा परिस्थितीत गावरान कोंबडी पालन हा कमी भांडवलात सुरू होणारा आणि नियमित उत्पन्न देणारा आधारभूत व्यवसाय ठरतो.
गावरान कोंबडी पालन म्हणजे काय?
गावरान किंवा देशी कोंबडी पालन म्हणजे पारंपरिक पद्धतीने, मोकळ्या वातावरणात देशी जातीच्या कोंबड्यांचे संगोपन करणे. या कोंबड्या आजारांना तुलनेने कमी बळी पडतात आणि त्यांचे मांस व अंडी पौष्टिक मानली जातात.
गावरान कोंबडी पालनाचे फायदे
कमी खर्चात व्यवसायाची सुरुवात करता येते.
बाजारात आज मांस व अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शिवाय गावरान कोंबड्यांचा औषध व खाद्य खर्च कमी असतो.
हा व्यवसाय घरच्या घरी किंवा शेतात करता येणारा व्यवसाय आहे.
महिला व युवकांसाठी उत्तम स्वयंरोजगार
यासाठी योग्य कोंबड्यांच्या जातींची निवड करणे आवश्यक असते. यावेळी स्थानिक बाजारात कोणत्या कोंबड्यांना जास्त मागणी आहे यावरून निर्णय घेणे आवश्यक असते.
महाराष्ट्रात खालील जाती लोकप्रिय आहेत.
🐔 कडकनाथ
🐔 ग्रामप्रिया
ग्रामप्रिया ही सुधारित देशी जात असून अंडी उत्पादनासाठी ओळखली जाते. ग्रामीण भागात सहज तग धरते आणि कमी खर्चात जास्त अंडी देणारी जात म्हणून लोकप्रिय आहे.
🐔 वनराजावनराजा ही दुहेरी उपयोगाची जात असून मांस आणि अंडी दोन्हीसाठी उपयुक्त आहे. ही कोंबडी जलद वाढणारी, मजबूत आणि खुल्या पद्धतीच्या पालनासाठी योग्य आहे.
🐔 कार्णिकाकार्णिका ही देशी व सुधारित संकरित जात असून ती विविध हवामान परिस्थितींशी जुळवून घेते. अंडी उत्पादन चांगले असून मृत्युदर कमी असतो.
🐔 देशी गावठी कोंबडीदेशी गावठी कोंबडी ही पारंपरिक जात असून अत्यंत कमी खर्चात पालन करता येते. मांस व अंडी चवीला उत्कृष्ट असून स्थानिक बाजारात नेहमी मागणी असते.
या जाती हवामानाशी जुळवून घेतात आणि उत्पादनक्षम असतात.
गावरान कोंबडी पालन व्यवस्थापन कसे करावे?
कोंबडी पालनासाठी जागा व निवास व्यवस्था
कोंबड्यांसाठी स्वच्छ, कोरडी आणि हवेशीर जागा आवश्यक असते.
१ कोंबडीसाठी सुमारे २ ते ३ चौरस फूट जागा
पावसाचे पाणी आत येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे आपल्या बजेटनुसार छोटीशे शेड उभारावे. आणि हळूहळू व्यवसाय मोठा करावा.
भटकी कुत्री, मांजरे, साप, बहिरी ससा आणि घार या भक्षक प्राणी आणि पक्षांपासून संरक्षण करणे आवश्यक असल्यामुळे शक्यतो शेड किंवा जाळी ही महत्त्वाचे ठरते.
खाद्य व्यवस्थापन
गावरान कोंबड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या नैसर्गिक अन्नावरही तग धरतात. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेले धान्य खूपच उपयोगी पडते. खर्च सुद्धा आपला वाचतो.
मका, ज्वारी, बाजरी
भाजीपाला अवशेष
किडे, कचरा, गवत
गरजेनुसार संतुलित खाद्य
स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
लसीकरण व आरोग्य काळजी
कोंबड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
राणीखेत (Ranikhet)
गंबोरो
देवी रोग
वेळोवेळी लसीकरण व स्वच्छता ठेवल्यास मृत्युदर खूप कमी राहतो.
खर्च व नफा अंदाज
१०० कोंबड्यांचा लहान प्रकल्प (अंदाजे):
पिल्ले खर्च: ₹8,000 – ₹10,000
खाद्य व औषध: ₹15,000
इतर खर्च: ₹5,000
एकूण खर्च: ₹25,000 – ₹30,000
६ ते ७ महिन्यांत कोंबडी विक्री व अंडी उत्पादनातून
नफा: ₹45,000 ते ₹60,000 पर्यंत होऊ शकतो.
बाजारपेठ व विक्री
स्थानिक आठवडी बाजार
हॉटेल्स व ढाबे
थेट ग्राहक विक्री
गाव व शहरी भागातील मागणी
गावरान कोंबडीला नेहमीच चांगला दर मिळतो. सध्याच्या मार्केटमध्ये गावरान कोंबडीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची आपणास पाहायला मिळते
शासकीय योजना व अनुदान
केंद्र व राज्य शासनाकडून कुक्कुटपालनासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून योजनेचा लाभ घेतला तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवी उभारी मिळते. यासाठी स्थानिक
पशुसंवर्धन विभागाचे अवश्य मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्याकडे खालील उपक्रम राबवण्याची व्यवस्था असते.
बँक कर्ज व अनुदान योजना
प्रशिक्षण कार्यक्रम
यामुळे व्यवसाय सुरू करणे अधिक सोपे होते.
यशस्वी व्यवसायासाठी टिप्स
लहान प्रमाणात सुरुवात करा
दर्जेदार पिल्ले घ्या
नियमित निरीक्षण ठेवा
स्थानिक बाजाराचा अभ्यास करा
खर्चावर नियंत्रण ठेवा.
👉🏻 वाचा सविस्तर बंदिस्त शेळीपालन सविस्तर माहिती
गावठी कोंबडी पालन करण्यासाठी अनेक प्रश्न पडतात. त्यापैकी काही प्रश्न खालील प्रमाणे.
❓ गावरान कोंबडी पालन व्यवसाय फायदेशीर आहे का?
होय. गावरान कोंबडीचे मांस व अंडी आरोग्यदायी असल्यामुळे बाजारात नेहमी मागणी असते. कमी खर्चात हा व्यवसाय नफ्याचा ठरतो.
❓ गावरान कोंबडी पालनासाठी किती भांडवल लागते?
लहान स्तरावर 50 ते 100 कोंबड्यांसाठी अंदाजे 25,000 ते 30,000 रुपये भांडवल पुरेसे असते.
❓ कोणती जात गावरान कोंबडी पालनासाठी योग्य आहे?
कडकनाथ, वनराजा, ग्रामप्रिया व देशी गावठी कोंबडी या जाती पालनासाठी योग्य मानल्या जातात.
❓ गावरान कोंबडी पालनासाठी शासन अनुदान मिळते का?
होय. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना, प्रशिक्षण व कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
❓ गावरान कोंबडी पालन घरी करता येते का?
होय. पुरेशी जागा, स्वच्छता व सुरक्षितता असल्यास घरच्या घरी देखील हा व्यवसाय करता येतो.
🔚 निष्कर्ष
गावरान कोंबडी पालन हा ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त आणि नफ्याचा व्यवसाय आहे. कमी गुंतवणूक, कमी जोखीम आणि सातत्यपूर्ण उत्पन्न यामुळे हा व्यवसाय अनेकांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. योग्य नियोजन व मेहनतीने हा व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो.
तुम्हाला गावरान कोंबडी पालनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा.
ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा