Translate

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMMY): पात्रता, फायदे, बँका कर्ज का नाकारतात व उपाय

लघु उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना.

महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांकडे कौशल्य, कल्पना आणि व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, परंतु भांडवलाच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत.

img src="..." alt=" मुद्रा कर्ज योजना  >
हीच समस्या लक्षात घेऊन 2015 साली सरकारने प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Pradhan Mantri Mudra Yojana – PMMY) सुरू केली. 

या योजनेत कर्ज घेण्यासाठी कोणतेही तारण (Collateral) लागत नाही आणि प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे.

मुद्रा कर्ज म्हणजे काय?

PMMY अंतर्गत लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग  स्व-रोजगार करणारे नवे उद्योजक यांना ₹10 लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. 

हे कर्ज खासकरून खालील क्षेत्रांसाठी दिले जाते:

छोटे उद्योग

किरकोळ व्यवसाय

सेवा क्षेत्र

उत्पादन उद्योग

ग्रामीण/शहरी सूक्ष्म उद्योग

महिला उद्योजकता

स्टार्ट-अप किंवा नवीन व्यवसाय

मुद्रा योजनेत व्यवसायाच्या टप्प्यानुसार तीन प्रकारचे कर्ज दिले जाते.

1) लहान कर्ज (नवीन व्यवसाय)

कर्ज मर्यादा: ₹50,000 पर्यंत

नवउद्योजक किंवा छोटा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हे कर्ज दिले जाते.

व्याजदर कमी आणि परतफेडीची मुदत लवचिक

2) मध्यम कर्ज.( व्यवसाय वाढ)

कर्ज मर्यादा: ₹50,000 ते ₹5 लाख

व्यवसाय वाढवण्यासाठी, मशीनरी घेण्यासाठी किंवा भांडवल वाढवण्यासाठी उपयुक्त

3) मोठे कर्ज.(व्यवसाय विस्तार)

कर्ज मर्यादा: ₹5 लाख ते ₹10 लाख

स्थिर व्यवसायाचा विस्तार, उपकरणे, मोठे प्रोजेक्ट किंवा दुकान/युनिट वाढवण्यासाठी दिले जाते

मुद्रा कर्जाचे फायदे

तारण (Collateral) लागत नाही

प्रोसेसिंग फी कमी किंवा नसते

व्याजदर कमी (बँकनुसार बदलू शकतो)

परतफेडीची लवचिक योजना

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम

महिला व तरुण उद्योजकांना विशेष प्रोत्साहन

कोण अर्ज करू शकतो? 

कोणताही भारतीय नागरिक जो व्यवसाय करतो किंवा करणार आहे

लघु/सूक्ष्म उद्योग

उत्पादन उद्योग

स्वरोजगार करणारे किंवा (रिक्षा/टॅक्सी चालक, फूड व्हॅन, स्टार्ट-अप इ.)

मशीनरी/उपकरणे खरेदी

कच्चा माल खरेदी

दुकानाच्या दुरुस्ती किंवा विस्तारासाठी

कार्यरत भांडवलासाठी

सेवा व्यवसाय (ब्यूटी पार्लर, सायबर कॅफे, वर्कशॉप इ.)

कागदपत्रे (Documents Required)

बँकेनुसार थोडा फरक असू शकतो, पण सामान्यतः खालील कागदपत्रे लागतात:

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. 2 पासपोर्ट फोटो

4. व्यवसायाची माहिती / प्रकल्प अहवाल  (Project report)

5. बँक स्टेटमेंट

6. राहण्याचा पत्ता पुरावा, लाईट बिल

7. व्यवसाय परवाना (लागू असल्यास)

8. उद्योम रजिस्ट्रेशन 

कर्ज कसे व कुठे मिळते?

PMMY अंतर्गत मुद्रा कर्ज मिळते:

राष्ट्रीयीकृत बँका

खासगी बँका

ग्रामीण/क्षेत्रीय बँका

लहान वित्तीय संस्था

MFIs आणि NBFCs

अर्ज प्रक्रिया:

जवळच्या बँकेत जाऊन ‘PMMY – Mudra Loan’ अर्ज मागून घ्या. त्यासोबत प्रकल्प अहवाल (Project report) व आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडा. आणि बँकेमध्ये सादर करा.

त्यानंतर तुमच्या अर्जाची बँक पडताळणी करते.

कर्ज मंजूर झाल्यावर रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते

व्याजदर (Interest Rate)

व्याजदर बँकेप्रमाणे बदलतो, परंतु साधारण 8% ते 12% पर्यंत असतो.(Marginal Cost of Funds Based Lending Rate)

महिला उद्योजकांना काही बँका अतिरिक्त सवलत देतात.

PMMY योजनेतील विशेष बाबी

कर्जासोबत मुद्रा कार्ड दिले जाते (ATMसारखे कार्ड), ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी पैसे वापरू शकता.

मुद्रा कार्ड हे केवळ 'एटीएम' नाही, तर ते 'कॅश क्रेडिट' (Cash Credit) सुविधेसारखे काम करते. म्हणजेच, जेवढे पैसे तुम्ही वापरता, तेवढ्यावरच व्याज लागते.

परतफेडीची मुदत सामान्यतः 3 ते 5 वर्षे असते.

मुद्रा कर्जावर कोणतीही सरकारी सबसिडी नसते.

बँका मुद्रा कर्ज देण्यास का टाळाटाळ करतात? | PMMY वास्तव”

कागदोपत्री प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMMY) सोपी वाटते, पण प्रत्यक्षात अनेक बँका मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. यामागे काही व्यवहार्य कारणे आहेत, ती समजून घेणे महत्त्वाचे आहे

1️⃣ डिफॉल्ट (NPA) होण्याची भीती

मुद्रा कर्ज वीणातारण असल्यामुळे:

कर्ज फेडले नाही तर बँकेकडे जप्तीचा पर्याय नसतो

अनेक जुनी मुद्रा कर्जे थकली आहेत. न्हणजेच (NPA) आहेत.

त्यामुळे शाखा व्यवस्थापक सावध भूमिका घेतात.

2️⃣ शाखा स्तरावर उद्दिष्ट (Target) नसणे

बँक कर्मचाऱ्यांना मोठी कर्जे (होम/कार/व्यवसाय) देण्याचे उद्दिष्ट असते.

₹50,000 – ₹2 लाख कर्जात त्यांना काम जास्त आणि फायदा कमी वाटतो

3️⃣ कमकुवत प्रकल्प अहवाल.(Project report)

अनेक अर्जदार फक्त अर्ज भरतात त्यांच्याकडे व्यवसायाची ठोस योजना नसते. प्रकल्प अहवालामध्ये खर्च, नफा दाखवत नाहीत.आवश्यक ती कागदपत्र नसतात.

अशा वेळी बँक अर्ज नाकारते किंवा टाळते.

4️⃣ CIBIL स्कोर व बँक इतिहास

जरी जाहिरातीत सांगितले जात नसले तरी:

खूप कमी CIBIL स्कोर असल्यास कर्ज अडते

आधीचे कर्ज थकलेले असेल तर नकार मिळतो

5️⃣ राजकीय/प्रशासकीय दबाव नसणे

काही योजनांमध्ये (पीक कर्ज, गृह कर्ज) राजकीय दबाव असतो परंतू मुद्रा कर्जात तो दबाव तुलनेने कमी असतो

शहरी शाखा जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करतात.

ग्रामीण भागात ग्रामीण बँका मुद्रा कर्ज देण्यास जास्त सकारात्मक असतात.

6. शहरी शाखा जोखीम पाहून टाळतात

मग मुद्रा कर्ज कसे मिळवावे? 

1. प्रकल्प अहवाल म्हणजेच (Project report) व्यवस्थित तयार करा. त्यामध्ये

तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात?

सदर व्यवसायास किती खर्च येणार आहे

महिन्याचा अंदाजे नफा किती होणार

कर्ज कसे फेडाल हे सर्व नमूद केले असल्यास बँकेचा विश्वास वाढतो.

2. लहान म्हणजे छोट्या कर्जापासून सुरुवात करा. थेट ₹5–10 लाख मागण्यापेक्षा आधी ₹50,000 – ₹1 लाख कर्ज घ्या आणि ते वेळेवर परतफेड करा. म्हणजे पुढील कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाही.

3. ग्रामीण/क्षेत्रीय बँक निवडा

RRB, सहकारी बँका, लहान वित्तीय बँका

सरकारी बँकांच्या ग्रामीण शाखा

4. Udyam Registration करा. Registration) पूर्णपणे मोफत आणि ऑनलाईन आहे. ते जोडल्यास 

MSME म्हणून नोंद होते

अर्जाला वजन येते

6. ऑनलाइन अर्ज पर्याय

PMMY पोर्टल

जनधन खात्याशी लिंक असल्यास सोपे जाते.

महत्वाची वस्तुस्थिती (खरे वास्तव)

मुद्रा कर्ज हा हक्क नाही, तर बँकेच्या जोखीम मूल्यांकनावर आधारित कर्ज आहे.

सरकार योजना देते, पण कर्ज मंजुरीचा अंतिम अधिकार बँकेकडेच असतो.

जरी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात अनेक बँका जोखीम, थकीत कर्जे आणि प्रोजेक्ट रिपोर्टच्या अभावामुळे मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अर्जदाराने योग्य तयारी करूनच बँकेकडे अर्ज करणे आवश्यक असते.

👉🏻 हेही वाचा.जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना संपूर्ण माहिती

खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 

मुद्रा कर्ज नाकारले गेले तर घाबरायचे कारण नाही. योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तर अनेक वेळा कर्ज मंजूर होते. 

मुद्रा कर्ज नाकारले तर काय करावे? 

1️⃣ सर्वप्रथम नकाराचे कारण स्पष्ट विचारा

बँकेने तोंडी “होत नाही” असे सांगितले तरी:

लेखी कारण (Reason for Rejection) विचारा

कारण समजल्याशिवाय पुढील पाऊल टाकू नका

सामान्य कारणे

1) कमकुवत प्रकल्प अहवाल 

कमी CIBIL स्कोर

व्यवसाय अनुभव नाही

बँकेची अंतर्गत धोरण

2️⃣ प्रकल्प अहवाल सुधारून पुन्हा अर्ज करा

अनेक वेळा अर्ज रिपोर्ट कमकुवत असल्यामुळे नाकारला जातो.

सुधारणा करताना:

खर्च व नफा वास्तववादी दाखवा

मासिक हप्ता कसा भरणार ते स्पष्ट करा

Udyam Registration (MSME) जोडा

त्याच बँकेत पुन्हा अर्ज करता येतो

3️⃣ दुसऱ्या बँकेत अर्ज करा (हे खूप महत्त्वाचे)

एक बँक नकार देईल म्हणजे सर्वच देणार नाहीत असे नाही.

प्रयत्न करा:

ग्रामीण/क्षेत्रीय ग्रामीण बँका (RRB)

लहान वित्तीय बँका

सहकारी बँका

अनेक वेळा ग्रामीण शाखा मुद्रा कर्ज देण्यास अधिक सकारात्मक असतात.

4️⃣ लेखी अर्ज देऊन पोहच घ्या

जर बँक टाळाटाळ करत असेल तर:

✍️ करा:

अर्ज लेखी द्या

पोहच (Seal + Date) घ्या.

यानंतर बँक “अर्जच दिला नाही” असे म्हणू शकत नाही.

5️⃣ शाखा व्यवस्थापकाकडे (Branch Manager) लेखी तक्रार करा

तोंडी नकार स्वीकारू नका – नेहमी लेखी प्रक्रिया करा.”

तक्रारीत लिहा:

आपण प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अंतर्गत अर्ज केला आहे

सर्व कागदपत्रे दिली आहेत

तरीही अर्ज स्वीकारला/प्रक्रिया केली जात नाही

6️⃣ बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार

जर शाखा स्तरावर प्रतिसाद नसेल तर:

Region Office / Zonal Office

बँकेच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार दाखल करा.

तक्रारीसोबत अर्जाची प्रत, बँकेला अहवाल सादर केल्याची पोहच,बँकेचे नाव व शाखा इत्यादी सादर करा.

7️⃣ ऑनलाईन तक्रार पर्याय

तुम्ही खालील मार्ग वापरू शकता:

बँकेची अधिकृत वेबसाईट

RBI CMS (Customer Complaint System)

जिल्हा उद्योग केंद्र (DIC)

8️⃣ CIBIL स्कोर कमी असल्यास काय करावे?

आधीचे थकीत कर्ज सेटल करा

3–6 महिने नियमित व्यवहार ठेवा

शिशु कर्ज (₹50,000 पर्यंत) पासून सुरुवात करा

9️⃣ महत्वाची वस्तुस्थिती (खरे सत्य)

मुद्रा कर्ज हा कायदेशीर हक्क नाही. बँकेला मंजुरीचा अधिकार असतो

पण बँक अर्ज स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अस्तित्वात असतानाही अनेक वेळा बँका विविध कारणांमुळे कर्ज नाकारतात. 

अशा वेळी अर्जदाराने नकाराचे कारण समजून घेऊन प्रोजेक्ट रिपोर्ट सुधारावा, दुसऱ्या बँकेत अर्ज करावा किंवा लेखी तक्रार करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. 

योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास मुद्रा कर्ज मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते.

अंतिम सल्ला

तोंडी नकार स्वीकारू नका

लेखी प्रक्रिया ठेवा

हार मानू नका

सर्वच बँका किंवा शाखा नकार देतात असे नाही; योग्य तयारी असल्यास अनेक ठिकाणी कर्ज मिळते.

जन समर्थ (Jan Samarth) पोर्टल:

आता सरकार सर्व सरकारी योजनांसाठी Jan Samarth Portal वापरत आहे. जर बँकेत कोणी ऐकत नसेल, तर या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज केल्यास अर्जाचा मागोवा (Tracking) घेणे सोपे जाते आणि बँकेला उत्तर द्यावे लागते.

जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू किंवा वाढवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान 

img src="..." alt=" नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर >


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...