सन 1985 निवडणुकीची पार्श्वभूमी
सन 1985 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्या काळात काँग्रेस पक्षात राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोठा मतभेद झाला आणि काँग्रेसचे दोन गट पडले.समाजवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस. या पार्श्वभूमीवर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली.
राजकीय पार्श्वभूमी
त्या काळात समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते. काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यभर राजकीय समीकरणे बदलली होती.
महाराष्ट्रात काँग्रेसला बहुमत मिळाले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले, तर समाजवादी काँग्रेसला 54 जागा मिळून ती मुख्य विरोधी पक्ष ठरली. शरद पवार हे विरोधी पक्ष नेते झाले.
उमेदवारांची लढत
खेड-आळंदी मतदारसंघात एकूण 6 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
प्रमुख उमेदवार
1. कै. नारायणराव बाबुराव पवार – समाजवादी काँग्रेस
निवडणूक चिन्ह: चरखा
पूर्वी खेड पंचायत समिती सदस्य
2. शांताराम नथुजी घुमटकर – आय काँग्रेस
निवडणूक चिन्ह: हाताचा पंजा
राजगुरुनगरचे दीर्घकाळ सरपंच
अपक्ष उमेदवार
3) बबनराव धर्माजी डावरे
4) नामदेव सगाजी भालेराव
5) तुकाराम गेनू शिंदे
6) विठ्ठलराव केरुजी दौंडकर
या निवडणुकीत मुख्य लढत नारायणराव पवार विरुद्ध शांताराम घुमटकर अशीच रंगली होती.
नारायण हे पवार हे पंचायत समिती सदस्य सुद्धा होते. त्यांनी सन 1978 साली अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती व ते राम कांडगे यांच्याकडून पराभूत झाले होते.
त्याचप्रमाणे शांताराम घुमटकर हे राजगुरुनगरचे दीर्घकाळ सरपंच होते.
बबनराव डावरे हे देखील तत्कालीन पंचायत समिती सदस्य होते.
मतदार व मतदान माहिती
एकूण मतदार: 1,32,397
पुरुष: 64,086
महिला: 68,311
मतदान केलेले:
पुरुष: 43,943
महिला: 38,006
एकूण मतदान: 81,949 (61.9%)
एकूण मतदान केंद्रे: 173 बूथ
ही आकडेवारी त्या काळातील ग्रामीण भागातील चांगल्या मतदान टक्केवारीचे उदाहरण मानली जाते.
निवडणूक निकाल
उमेदवार, पक्ष, मते आणि टक्केवारी
नारायण बाबुराव पवार इंडियन काँग्रेस (सोशलिस्ट) 48,758 (60.7%)
शांताराम नथुजी घुमटकर इंडियन नॅशनल काँग्रेस 28,326 (35.3%)
बबनराव डावरे अपक्ष 1,217 (1.5%)
नामदेव भालेराव अपक्ष 905 (1.1%)
तुकाराम शिंदे अपक्ष 633 (0.8%)
विठ्ठलराव दौंडकर अपक्ष 440 (0.6%)
विजयाचा फरक: 20,432 मते (24.9%)
या निवडणुकीत नारायणराव बाबुराव पवार यांचा दणदणीत विजय झाला.
त्या काळातील प्रचाराची झलक ग्रामीण संस्कृती
आजच्या डिजिटल युगाच्या तुलनेत 1985 मधील प्रचार साधनं अत्यंत साधी होती. पण त्यात एक वेगळी ऊब आणि लोकसहभाग होता.
प्रचारासाठी मुख्य साधन: सायकल आणि ट्रक
कधीमधी एक जीप प्रचारासाठी वापरली जायची.
जीपवर भोंगे (लाऊडस्पीकर) बांधून गावोगावी फिरत प्रचार केला जायचा.
प्रचार साहित्य: हाताने लिहिलेले पोस्टर, पत्रके.
भिंतीवर गेरूच्या आणि पांढऱ्या चण्याच्या साह्याने रंगवलेले उमेदवाराचे नाव, पक्षाने चिन्ह, स्लोगन आणि यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा.यांची खूण ××× असे वाक्य.
कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी साधी व्यवस्था भेळ.
आजच्या मोठ्या सभा, सोशल मीडिया आणि डिजिटल जाहिरातींच्या तुलनेत तो काळ अत्यंत साधा, पण लोकांशी थेट जोडणारा होता.
👉🏻हेही वाचा खेड आळंदी विधानसभा सन 1990 चे दशक आणि नारायणराव पवार यांचे वर्चस्व
निष्कर्ष
सन 1985 ची खेड-आळंदी विधानसभा निवडणूक ही ग्रामीण राजकारण, काँग्रेसमधील फुट आणि साध्या प्रचार पद्धतींचा संगम दाखवणारी निवडणूक ठरली.
नारायणराव बाबुराव पवार यांचा विजय हा समाजवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा टप्पा ठरला, तर त्या काळातील प्रचार पद्धती आजही ग्रामीण राजकीय संस्कृतीची आठवण करून देतात.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा