खेड आळंदी विधानसभा निवडणूक आणि नारायणराव पवार यांचे वर्चस्व
खेड–आळंदी विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो.
1990 ते 1999 या कालखंडात झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांनी या मतदारसंघाचे राजकीय स्वरूप, मतदारांची भूमिका आणि पक्षीय समीकरणे स्पष्टपणे समोर आणली.
या काळात नारायणराव बाबुराव पवार हे या मतदारसंघातील केंद्रस्थानी राहिलेले नेतृत्व ठरले.
विधानसभा निवडणूक 1990 महाराष्ट्र खेड-आळंदी.
मतदारसंघाची आकडेवारी :
एकूण मतदार : 1,67,440
पुरुष मतदार : 83,446
महिला मतदार : 83,994
मतदान केलेले पुरुष : 57,369
मतदान केलेल्या महिला : 46,153
एकूण मतदान : 1,03,522 (61.8%)
मतदान केंद्रे : 218
विजयाचा फरक : 29,242 (28.2%)
उमेदवारनिहाय निकाल
क्रमांक स्थान उमेदवाराचे नाव मिळालेले मते मतांची टक्केवारी आणि पक्ष
1) पवार नारायणराव बाबुराव 57,072 56.2% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2) टकळकर प्रताप गणभाऊ 27,830 27.4% जनता दल
3) चव्हाण सुरेश धोंडिबा 14,645 14.4% शिवसेना
4) गरुड नानासाहेब भिकोबा 793
0.8% इंडियन काँग्रेस (सोशलिस्ट शरद चंद्र सिन्हा)
5) जांभळे विलास गणपत 369
0.4% अपक्ष
6) घुमटकर ज्ञानेश्वर गंगाराम 297
0.3% अपक्ष
7) सातकर सूर्यकांत नानासाहेब 288 0.3% हुल झारखंड पक्ष
8) शेख ए. हमीद ए. कादर (मोमीन) 214 0.2% अपक्ष
विश्लेषण
इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार नारायणराव बाबुराव पवार हे निवडून आले आणि आमदार झाले.
या निवडणुकीमध्ये मूळ काँग्रेसचे असलेले प्रतापराव उर्फ नाना टाकळकर यांनी ऐनवेळी जनता दलात प्रवेश करून तिकीट मिळवले होते. परंतु पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे त्यांना निवडणूक प्रचार करण्यास मर्यादा आल्या.
त्याचप्रमाणे तुलनेने नवखे असलेले शिवसेनेचे उमेदवार सुरेश चव्हाण हे निवडणूक रिंगणात होते. त्यांच्याकडे पुरेसे कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते.
खेड तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे व तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार यांनी चाकण येथे घेतलेल्या सभेमुळे नारायणराव पवार यांना त्याचा फायदा झाला. आणि त्यांनी निवडणूक जिंकली.
विधानसभा निवडणूक 1995 महाराष्ट्र खेड-आळंदी
सर्वसाधारण माहिती
राज्य : महाराष्ट्र
मतदारसंघ : खेड-आळंदी
मतदारसंघ प्रकार : सर्वसाधारण (GEN)
एकूण उमेदवार : 14
एकत्रित मतदान आकडेवारी
एकूण मतदार : 1,76,644
पुरुष मतदार : 87,602
महिला मतदार : 89,042
मतदान केलेले पुरुष : 72,615
मतदान केलेल्या महिला : 67,693
एकूण मतदान : 1,40,308 (79.4%)
मतदान केंद्रे : 274
विजयाचा फरक : 3,839 (2.7%)
उमेदवारनिहाय निकाल
1) नारायणराव बाबुराव पवार 60,436 (44.6%) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2) बबनराव लक्ष्मण डावरे 56,597 (41.8%) अपक्ष
3) उत्तम बबनराव गोगावले 9,286 (6.9%) शिवसेना
4) ऍड. पोपटराव शंकरराव तांबे 3,852 (2.8%) जनता दल
5) घुमटकर ज्ञानेश्वर गंगाराम 983 (0.7%) अपक्ष
6) जाधव प्रभाकर शंकर 749
(0.6%) अपक्ष
7) आनंद मारुती उर्फ नानासाहेब अंकुश 693 (0.5%) अपक्ष
8) शेलार ज्ञानेश्वर गणपतराव 660 (0.5%) अपक्ष
9) विठ्ठलराव केरूजी दौंडकर (मास्तर) 519 (0.4%) अपक्ष
10) साळवे काळूराम धोंडीराम उर्फ दादासाहेब 445
(0.3%) भारिप बहुजन महासंघ
11) चित्ते सुरेश धोंडिबा 423
(0.3%) अपक्ष
12) जमदार अशोक साहादू 308 (0.2%) अपक्ष
13) कड बबन गंगाराम 296
(0.2%) अपक्ष
14) शहा सुभाष भिकचंद 225
(0.2%) अपक्ष.
विश्लेषण
या निवडणुकीत अपक्ष असलेले बबनराव डावरे यांना 56597 मते पडली होती. आणि नारायणराव पवार हे निसटत्या फरकाने निवडून आले होते.
जर कदाचित बबनराव डावरे यांना शिवसेना किंवा जनता दलाची उमेदवारी मिळाली असती तर नक्कीच त्यांनी नारायणराव पवार यांचा पराभव केला असता आणि बबनराव डावरे आमदार झाले असते.अशी त्यावेळी तालुक्यात चर्चा होती.
विधानसभा निवडणूक 1999 महाराष्ट्र खेड-आळंदी
एकत्रित मतदान आकडेवारी
एकूण मतदार : 1,81,562
पुरुष मतदार : 92,348
महिला मतदार : 89,214
मतदान केलेले पुरुष : 66,649
मतदान केलेल्या महिला : 54,253
एकूण मतदान : 1,20,902 (66.6%)
मतदान केंद्रे : 274
विजयाचा फरक : 3,834 (3.2%)
उमेदवारनिहाय निकाल
1) पवार नारायणराव बाबुराव 47,925 (41.9%) राष्ट्रवादी काँग्रेस
2) दिलीप दत्तात्रय मोहिते 44,091 (38.5%) शिवसेना
3) ऍड. गारगोटे शांताराम विष्णू 18,090 (15.8%)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4) गावळी आशा अरुण 4,324
(3.8%) अखिल भारतीय सेना
विश्लेषण
सन 1999 मध्ये काँग्रेसमध्ये वेगळे होऊन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. आणि लगेचच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
या निवडणुकीमध्ये नारायणराव पवार हे अत्यंत निसटत्या फरकाने विजयी झाले होते.
सन 1992 ते सन 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेले श्री दिलीप मोहिते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती.
तसेच ॲड शांताराम गारगोटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. परंतु खेड विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्यामुळे निसटत्या फरकाने का होईना नारायणराव पवार विजयी झाले होते.
1990, 1995 आणि 1999 या तीन निवडणुकांमधून खेड–आळंदी विधानसभा मतदारसंघात नारायणराव बाबुराव पवार यांचे राजकीय वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.
मात्र 1995 आणि 1999 मध्ये विजयाचा फरक कमी होत गेल्याने मतदारसंघातील राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होत गेली, हेही तितकेच महत्त्वाचे वास्तव ठरते.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा