रामायण हे महाकाव्य नसून वास्तव इतिहासच
अनुक्रमणिका
1) लेखकाचे मनोगत
2) रामायणाची पूर्वपिटिका
3) रामायणाची मूळ कथा
4) रामायणाचा अचूक कालावधी
5) श्रीरामाच्या 40 पिढ्या
6) रामायण कळानंतरची भारतातील प्रमुख राज्ये
7) रामायण काळानंतरचे कवी किंवा इतिहासकार
8) रामायण काळ व त्यानंतरची समाज व्यवस्था
9) रामायण काळातील ऋषीमुनी
10) महर्षी वाल्मीकि आणि रामायण
11) रामायणातील विस्तृत पात्रयादी
12) श्रीरामचा जन्म कालावधी
13) रामायणामधील श्रीराम कसा होता?
14) रामायणातील भरत आणि लक्ष्मण व्यक्तिचित्र
15) राणी कैकेयी, दासी मंथरा आणि रामाचा वनवास
16) श्रीरामाचा सध्याच्या राज्यानुसार वनवास काळातील संपूर्ण प्रवास.
17) सीता अपहरण
18) किष्किंधा राज्य (कर्नाटक)
19) दक्षिणेकडे शोध मोहिम
20) रामायणकालीन श्रीलंका (लंका) – यथार्थ वर्णन
21) रावण, कुंभकर्, मंदोदरी, मंदोदरी व इंद्रजीत व्यक्तिचित्र
22) सुशेन व्यक्तिचित्र आणि तत्कालीन भारतीय आयुर्वेद सखोल माहिती.
23) रामायणकालीन श्रीलंका (लंका) – यथार्थ वर्णन
24) रामायण घडल्याचे पुरावे
25) रामायण काळातील शस्त्रे आणि अस्त्रे
26) रामायणाचा इतर धर्मात असलेला प्रभाव
27) श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरे
28) रामायण जगात लोकप्रिय का आहे?
29) पुष्पक विमान
30) रामायण आदर्शवादाचा परिपाक
31) श्रीराम मंदिर आयोध्या आतापर्यंत घडलेल्या घडामोडी
32) नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराची वास्तुकला आणि रचना, मूर्ती आणि इतर माहिती.
33) काही प्रमुख रामायण आणि त्यांचे लेखक
34) रामायणाचा मुख्य संदेश
-------------------------------------------------------------------
✍️ लेखकाचे मनोगत
पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पोथी-पुराणांचे पारायण करण्याची सुंदर परंपरा होती. त्या वेळी रामविजय, पांडवप्रताप, हरिविजय, नवनाथ, शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथांचे पारायण गावोगावी होत असे.
माझ्या घरीही, मी लहान असताना, माझे वडील रामविजय आणि नवनाथ या ग्रंथांचे नियमित पारायण करत असत. त्या वेळी एक जण ग्रंथ वाचत असे, तर दुसरा त्याचा सोप्या मराठीत अर्थ सांगत असे—ही परंपरा अत्यंत सुंदर आणि ज्ञानवर्धक होती.
या पारायणाचा आनंद घेण्यासाठी गावातील आबालवृद्ध, स्त्रिया मोठ्या उत्साहाने आमच्या घरी एकत्र येत असत. रामायणातील सुरस कथा ऐकताना मन भक्तिभावाने आणि आनंदाने भरून जात असे. त्या वातावरणात श्रीरामांविषयी अपार प्रेम, श्रद्धा आणि भक्ती निर्माण होत असे. लोक अक्षरशः श्रीरामांच्या भक्तिरसात तल्लीन होत असत.
कालांतराने मी रामायणाचा कथासार वाचला. मात्र, या कथा वाचताना माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. रामायणातील काही प्रसंग अनाकलनीय वाटू लागले आणि त्यांचा संदर्भ जुळत नव्हता.
उदाहरणार्थ
अयोध्या ते श्रीलंका हे साधारण अडीच हजार किलोमीटर अंतर असताना, आणि रामेश्वर ते श्रीलंका समुद्रातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर असताना, रावणाला सीतामाईच्या स्वयंवराचे आमंत्रण देण्यासाठी कोण गेले असेल आणि ते कसे गेले असेल?
तसेच, श्रीलंकेतील रावणाची सासुरवाडी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे असल्याचे काही उल्लेख आढळतात. इतक्या लांब अंतरावर असा सोयरसंबंध कसा प्रस्थापित झाला असेल?
रामायणातील अनेक घटना नाशिकजवळील पंचवटी येथे घडल्या, तसेच हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे झाला असे मानले जाते. तरीही हनुमान मध्य प्रदेशातील किष्किंधा येथे सुग्रीवाकडे का गेला असेल?
राम-लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी थेट श्रीलंकेकडे न जाता पंचवटीपासून सुमारे ८०० किलोमीटर दूर असलेल्या किष्किंधा येथे का गेले?
याशिवाय, रामेश्वर ते श्रीलंका दरम्यान वानरांनी पूल बांधणे, पुष्पक विमान, आकाशातून बाण मारणे, रावणाचे विशाल सैन्य ही सर्व वर्णने वास्तवाच्या दृष्टीने कशी समजावून घ्यावीत? एवढ्या छोट्या बेटावर इतकी मोठी लोकसंख्या कशी राहिली असेल?
अशा असंख्य प्रश्नांनी मन सतत अस्वस्थ होत राहिले.
तथापि, या सर्व प्रश्नांनंतरही श्रीरामांविषयीचा माझा भक्तिभाव तसूभरही कमी झाला नाही.
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला; परंतु समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नव्हते. म्हणूनच सखोल अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.
या पुस्तकामध्ये रामायणातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक लिहित असताना मला सतत हनुमंताचे सान्निध्य जाणवत होते. यावरून मला अशी प्रचिती आली की, श्रीरामांची कथा म्हणजे रामायण हे केवळ महाकाव्य नसून एक ऐतिहासिक वास्तवही असू शकते.
रामायणावर हे पुस्तक लिहिण्याची संधी मला लाभली, हे मी माझे परमभाग्य मानतो.
🙏🏻 जय श्रीराम! जय श्रीराम 🙏🏻
✍️ रामदास तळपे
-------------------------------------------------------------
रामायण पूर्वपिठीका
इसवी सन पूर्व सातव्या शतकात भारतात अनेक राज्य व महाजनपदे उदयास आली. या सर्वांवर रामायणाचा एक विशेष प्रभाव निर्माण झाला.
आदर्श राजा आणि आदर्श राज्य कसे असावे आदर्श पती कसा असावा आदर्श मित्र कसा असावा, आदर्श राज्य कसे करावे हे रामायणातून शिकले गेले. रामायणातील प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे असल्यामुळे भारतातील तत्कालीन अनेक राज्यांनी रामायणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला.
अशा रीतीने प्राचीन भारतात उदयास आलेल्या राज्यव्यवस्थांवर रामायणातील आदर्शांचा प्रभाव पडल्याचे अनेक अभ्यासक मानतात. आणि पुढे हिंदू धर्मात हळूहळू रामायणाचा प्रभाव वाढत गेला.
रामायण काळातील राजा दशरथ रणांगणात केव्हाही मृत्यू स्वीकारायला तयार असत. श्रीराम, भरत, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आणि रावण यांच्यासारख्या विविध व्यक्तिमत्त्वांनी त्या काळातील समाजावर परिणाम घडवला. त्या काळातील प्रत्येकाकडून काही ना काही गुण दोष घेण्यासारखे होते.
रामायणातील आदर्शांचा प्रभाव काही प्रमाणात राजकीय विचारसरणीवर पडला असावा. त्या काळातील सामाजिक महत्त्व पुढे त्याचे धार्मिक महत्त्वामध्ये रूपांतर झाले.
आजही जर विचार केला तर रामायण हे काळाच्या कितीतरी पुढे असल्याचे दिसून येते. म्हणूनच रामायण काल आजही तितकाच लोकप्रिय आहे.
कोणत्याही धर्माचा जर अभ्यास केला तर प्रत्येकाने कसे वागावे पाहिजे कशा प्रकारे जीवन व्यतीत केले पाहिजे हे महत्त्वाचे सांगितले आहे. परंतु प्रत्येक कालखंडात प्रत्येक धर्मामध्ये मूळ मुद्दा हरवलेला गेला आणि कर्मकांडांना महत्त्व दिले गेले.
त्या काळात गद्य हा लेखन प्रकार अस्तित्वात नव्हता. पद्य लिखाण हे अस्तित्वात होते. त्यामुळे इतिहास लिखाण अनेकदा पद्यपद्धतीने लिहिला जात असे. संस्कृत ही मुख्य भाषा असल्याने ऐतिहासिक ग्रंथांची संस्कृत भाषेत अनुप्रास छंदामध्ये लिहिली गेली. रामायण देखील संस्कृत भाषेत अनुप्रास छंदामध्ये लिहिले गेले आहे.
कोणतीही काव्य रचना करताना काव्य वाचन सोपे होण्यासाठी किंवा विशिष्ट वेग प्राप्त होण्यासाठी कवी अलंकारिक आणि प्रतीकात्मक भाषेचा वापर करतो. त्यामुळे काही प्रमाणात अतिशयोक्तीचा देखील त्यामध्ये समावेश होतो.
मुळ वाल्मिकी रामायणामध्ये बालकांड व उत्तरकांड यांचा समावेश नव्हता. बालकांड व उत्तरकांड यांचा समावेश पुढे नंतरच्या काळात हजारो वर्षांनी मूळ वाल्मिकी रामायणामध्ये जोडला गेला आहे.
उत्तरकांडातील व रामायणातील काही घटना पहिल्या सहा कांडांशी विरोधाभासी आहेत. काही विद्वानांच्या मते बालकांड व उत्तरकांड नंतरच्या काळात जोडली गेली असावेत.”
नंतरच्या काळात ती कांड रामायणामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे रामायणाचे स्वरूप अनेक ठिकाणी विसंगत वाटते.
परंतु वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणामध्ये तत्कालीन भारतीय संस्कृती तसेच भौगोलिक परिस्थिती भौगोलिक मार्ग व परिसर यांचे वास्तव वर्णन केले आहे. त्यामुळे पडताळणी करता खरे असल्याचे दिसून येते. रामायणात ऐतिहासिक घटक असल्याचे अनेकांना वाटते, तर काही जण ते सांस्कृतिक महाकाव्य मानतात.”
आजही आपण पुराणातील अनेक कथा वाचतो कवी प्रिय रम्यतेसाठी आकाशाला चंद्र तोडून आणतो अशी उपमा देतो आणि असे म्हणतो. परंतु कथा वाचताना आपण प्रत्यक्ष अर्थ न घेता त्यामागचा सार समजून घेतो. त्यामुळे रामायणामध्ये अशा अनेक गोष्टी अतिशयोक्ती वाटू शकतात. म्हणून रामायण शब्दशः घडले नाही असे आपण म्हणू शकत नाही.
परंतु रामायणाचा भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये इतका प्रभाव होता की रामायण हे ३०० भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. शिवाय अनेक देशांमध्ये श्रीरामाची भव्य मंदिरे देखील बांधण्यात आली आहेत.
या सर्वांवर रामायण हे महाकाव्य नसून वास्तव इतिहास असल्याचे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना उत्तरांचा शोध घेण्याची सवय निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वाचकांनी रामायणाकडे केवळ कल्पनारम्य कथा म्हणून नव्हे, तर त्यातील तत्त्वज्ञान, इतिहास आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.”
-------------------------------------------------------------
रामायणाची मूळ कथा
दशरथ हे अयोध्येचे राजे होते. त्यांना तीन पत्नी होत्या कौसल्या, सुमित्रा व कैकेयी. परंतु त्यांना एकही मूलबाळ नव्हते.
त्यासाठी राजा दशरथाने शृंगी ऋषींनी सांगितल्यानुसार पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
त्यानंतर दशरथ राजाच्या कौसल्या या पत्नीस श्रीराम, कैकेयी या पत्नीस भरत व सुमित्रा या पत्नीस लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी जुळी मुले झाली.
या सर्व मुलांना राजा दशरथाने वशिष्ठ ऋषी यांच्या गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवले.
वशिष्ठ ऋषींच्या गुरुकुलात शिक्षण पूर्ण होत असतानाच मिथिला नगरीचा राजा जनकाने त्यांची मुलगी जानकीचे स्वयंवर होणार असल्याचा निरोप मिळाला।
जानकीच्या स्वयंवरांसाठी गुरु वशिष्ठसह राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न जनकाच्या मिथिला नगरीत गेले. तेथे अनेक नगरींचे राजे, महाराजे उपस्थित होते.
तेथे असलेल्या अत्यंत जड अशा शिवधनुष्यास जो कोणी वीर दोरी लावेल, त्यास जानकी माळ घालेल, असा तो पण होता. परंतु प्रचंड जड असलेले शिवधनुष्य कोणच उचलू शकले नाही.
लंकेचा राजा रावणाने प्रयत्न केला; परंतु ते शिवधनुष्य इतके जड होते की ते रावणाच्या अंगावर पडले व रावण त्याखाली चिरडला गेला.
परंतु या शिवधनुष्याला श्रीरामाने सहज उचलले व दोरी लावली. त्यामुळे जानकीने श्रीरामाला वरमाला घातली.
अशा तऱ्हेने श्रीरामाचे जानकीबरोबर लग्न लागले.
त्याचप्रमाणे भारताचे लग्न गौतमी, लक्ष्मणाचे लग्न उर्मिला तर शत्रुघ्नचे लग्न श्रुतकीर्तीबरोबर झाले.
पुढे दशरथाने श्रीरामाला अयोध्येचा राजा करण्याचा निर्णय घेतला. परंतु दशरथाची पत्नी कैकेयीची दासी मंथरा हिने कैकेयीला तिच्या पुत्राला, म्हणजेच भरताला, राजा करण्याबाबत सल्ला दिला.
त्यानुसार कैकेयीने राजा दशरथाकडून पूर्वी दोन वचने घेतली होती. त्या वचनांची परतफेड म्हणून राजा दशरथाला श्रीरामाला १४ वर्षे वनवासास पाठवावे व माझा पुत्र भरत यास अयोध्येचा राजा करावे, असे सांगितले.
राजा दशरथाचे श्रीरामावर खूप प्रेम होते; परंतु वचनात अडकल्यामुळे राजा दशरथाला श्रीरामाला वनवासास पाठवणे भाग पडले.
श्रीराम हे पितृभक्त असल्यामुळे व आदर्श राजपुत्र असल्यामुळे वनवासात जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर जानकी आणि लक्ष्मण हेही निघाले. भरत सुद्धा श्रीरामाबरोबर वनवासासाठी निघाला.
परंतु राज्याची काळजी घेण्यासाठी कुणीतरी अयोध्यामध्ये राहिले पाहिजे, असे श्रीरामाने भरतास सांगितले. परंतु भरताचे श्रीरामावर अलोट प्रेम होते. त्याने राजगादीवर बसण्यास स्पष्ट नकार दिला. त्याऐवजी राजगादीवर श्रीरामाच्या पादुका ठेवून श्रीराम परत येईपर्यंत राज्यकारभार करीन, असे श्रीरामाला सांगितले.
श्रीराम, जानकी व लक्ष्मण वनवासाला गेल्यानंतर इकडे दशरथ राजाचा श्रीरामाच्या पुत्रवियोगाने मृत्यू झाला.
श्रीराम, जानकी व लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर आले आणि तेथून दंडकारण्यात गेले. तेथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते. तेथे त्यांना अगस्ती ऋषी भेटले.
अगस्ती ऋषींनी श्रीरामाचे आदरातिथ्य केले व त्यांना आपल्या आश्रमात ठेवून घेतले. अगस्ती ऋषींनी श्रीरामाला नाशिकजवळील पंचवटी या ठिकाणी आश्रम बांधून राहण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार श्रीरामाने पंचवटी येथे आश्रम बांधला व तेथे राहू लागले. पंचवटी येथे श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण तेरा वर्षे वास्तव्यास होते.
अजूनही पंचवटी येथे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि जानकीकुंड प्रसिद्ध आहे. तेथे ते दररोज स्नान करीत असत. पेशव्यांच्या काळापासून दर बारा वर्षांनी पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
पंचवटी येथील अरण्यात राहणाऱ्या शुर्पणखा हिने लक्ष्मणाला मोहित करण्याचा प्रयत्न केला असता लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले.
शुर्पणखा ही रावणाची सावत्र बहीण होती. रावणाला हा वृत्तांत कळल्यावर रावणाने सीतेचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रावणाने त्याचा मामा मारीच याला बरोबर घेतले.
पंचवटी येथे आल्यावर मारीच याने हरिणाचे रूप घेऊन श्रीराम, जानकीच्या आश्रमाजवळून फिरू लागला. जानकीने हरिण पाहिल्यावर श्रीरामाला हरिण मारून त्याच्या कातड्याची चोळी शिवण्यासाठी हरिणाला मारण्यास सांगितले.
श्रीरामाने आपले धनुष्यबाण घेऊन हरिणाच्या दिशेने धाव घेतली. पुढे गेल्यावर एकच मोठा आवाज झाला. जानकीने हे ऐकल्यावर तिने लक्ष्मणाला कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी पाठवले.
ही संधी साधून रावणाने भिक्षुकाचे रूप घेऊन जानकीच्या आश्रमाच्या दारात जाऊन भिक्षा मागितली. जानकी रावणाला भिक्षा घालत असतानाच रावणाने जानकीचे अपहरण केले.
रावण जानकीला घेऊन जात असताना गिधाडांचा राजा जटायु याने पाहिले आणि रावणाला तीव्र प्रतिकार केला. परंतु रावणाने जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले व पुढे निघून गेला. हे स्थान इगतपुरी, जिल्हा नाशिक येथील टाकेद येथे आहे.
श्रीराम सीतेला शोधत शोधत तिथे आले असता जटायूचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी आले. जटायूची रक्तबंबाळ अवस्था पाहून श्रीरामाने जटायुला विचारले, “तुझी ही अवस्था कोणी केली?”
यावर जटायूंनी सर्व वृत्तांत श्रीरामांना सांगितला. रावण हा सीतेला घेऊन लंकेच्या दिशेने गेला आहे, हेही सांगितले. जटायूंनी श्रीरामांना पाणी मागितले. श्रीरामाने धनुष्याला बाण लावून जमिनीत बाण मारला व त्यातून पाणी बाहेर काढले. आणि हेच पाणी श्रीरामांनी जटायूला पाजले. जटायूंनी त्यानंतर श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडला.
श्रीरामाने जटायूचे अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर सीतेच्या शोधार्थ पुढे निघाले.
सुग्रीवाला वाटले, बालीनेच या तरुणांना मला ठार मारण्यासाठी पाठवले आहे की काय? यासाठी सुग्रीवाने हनुमंत आणि जांभवन यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी पाठवले.
हनुमंताने हे दुसरेच राजकुमार असून ते जानकीच्या शोधार्थ निघाले आहेत, हे पाहून त्यांनी या दोघांना सुग्रीवाकडे आणले. रामाने सर्व प्रकार सुग्रीवाला कथन केला.
त्यावर सुग्रीव म्हणाला, “आम्ही जानकीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करू; परंतु माझी पत्नी माझा भाऊ बाली याने हिसकावून घेतली असून मला राज्याबाहेर हुसकावून लावले आहे. यासाठी मला मदत करा.”
श्रीरामाने सुग्रीवाला मदत करण्याचे वचन दिले व सुग्रीवने देखील श्रीरामाला जानकीचा शोध लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे दोघांची मैत्री झाली.
त्यानंतर श्रीरामाने बालीला सुग्रीवाची पत्नी परत देण्याचे सांगितले; परंतु बाली तयार झाला नाही. बाली हा अत्यंत शूर होता. तो कुणालाच ऐकत नव्हता.
श्रीराम आणि बाली यांच्यामध्ये युद्ध झाले. शेवटी श्रीरामाने एका बाणाने बालीचा प्राण घेतला.
त्यानंतर श्रीरामाने सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले आणि बालीच्या मुलगा अंगद याला युवराज केले।
त्यानंतर सुग्रीव, हनुमान, अंगद, जांबुवान, सुमेध, नळ आणि निळ या प्रमुख योद्ध्यांना आणि वानर सैन्यांना घेऊन लंकेच्या दिशेने निघाले.
मजल दरमजल करीत असताना ते समुद्राच्या किनारी आले. लंका बेट हे समुद्राने वेढले असल्यामुळे तेथे कुणालाही जाता येत नव्हते. त्यामुळे कुणीच लंकेला जायला तयार होईना.
शेवटी जांबुवंताने हनुमानाला त्याच्या ताकदीची आठवण करून दिली. आणि मग हनुमान लंकेला जाण्यासाठी निघाला. पाण्यातून जात असताना हनुमानावर मगरीने हल्ला केला; परंतु हनुमंताने सूक्ष्म रूप धारण करून मगरीच्या पोटातून तोंडातून बाहेर पडले. त्या संकटातून वाचून हनुमान लंकेला पोहोचला.
श्रीलंकेला जाऊन अनेक ठिकाणी जानकीचा शोध घेतला. शेवटी हनुमंताने अशोक वनामध्ये जाऊन सीतेचा शोध घेतला व ओळख म्हणून हनुमानाने सीतेला रामाची अंगठी दाखवली. व थोड्याच दिवसांत जानकीची सुटका करण्याचे आश्वासन दिले.
त्याचवेळी काही लंकावासीयांनी हनुमंताला पाहिले व पकडून रावणापुढे हजर केले. रावणाने हनुमंताच्या शेपटीला कपडे बांधून तेल ओतून पेटवून दिले; परंतु हनुमंताने शेपटीला लागलेल्या आगीच्या सहाय्याने लंकेतील घरे पेटवून दिली व परत श्रीरामाकडे आले.
सीतेचा शोध लागल्यावर सर्व वानरसेना लंकेला जाण्यासाठी सिद्ध झाली. समुद्रातून जाण्यासाठी त्यांनी दगडांचा पूल बांधला आणि त्यावरून प्रवास करून श्रीरामासह वानरसेना लंकेला पोहोचली.
श्रीरामाने वालीपुत्र अंगद याला सीतेला सोडून देण्यासाठी रावणाकडे पाठवले. अंगदाने रावणाला सीतेला सोडून देण्याची विनंती केली. रावणाची पत्नी मंदोदरी हिने सुद्धा रावणाला सीतेला सोडून देण्याचा सल्ला दिला; परंतु रावणाने अंगद आणि मंदोदरी यांची विनंती धुडकावून लावली.
निराश होऊन अंगद परत श्रीरामाकडे आला. याच वेळी रावणाचा भाऊ बिभीषण हा सुद्धा श्रीरामांना येऊन मिळाला. बिभीषणाने श्रीरामांना रावणाचे सर्व कच्चे दुवे सांगितले.
त्यानंतर श्रीरामाच्या सेनेने रावणाला युद्धाचे आमंत्रण दिले आणि थोड्याच दिवसांत प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली.
श्रीरामाच्या सेनेने रावणाचे अनेक सेनापती यमसदनाला पाठवले.
रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा रात्रंदिवस झोपत असे आणि भूक लागल्यावर जेवण करून पुन्हा झोपत असे. सहा-सहा महिने तो झोपत असे. इतकी त्याला झोप प्रिय होती.
रावणाने कुंभकर्णाला मोठमोठे नगारे वाजवून उठवले व युद्धासाठी पाठवले. कुंभकर्ण हा जरी झोपाळू असला तरी खूप शूर होता. त्याने रणांगणावर खूप पराक्रम केला; परंतु श्रीरामाच्या एका बाणाने त्याचा प्राण घेतला.
रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा रणांगणामध्ये धारातीर्थी पडला, हे कळताच रावणाला प्रचंड दुःख झाले।
रावणाचे अनेक मोठे सेनापती व सैनिक मारल्यानंतर रावणाने त्याचा मुलगा इंद्रजीत याला युद्धास पाठवले.
इंद्रजीताने आकाशात जाऊन ढगांच्या आडून लक्ष्मणावर बाण मारण्यास सुरुवात केली. लक्ष्मण आणि इंद्रजीत यांचे घनघोर युद्ध झाले.
इंद्रजीतचा एक बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसला आणि लक्ष्मण खाली कोसळला. हे पाहून श्रीरामांना अतिव दुःख झाले. श्रीरामाच्या वानर सैन्याने लक्ष्मणाला सुरक्षित स्थळी नेले.
वानर सेनेचा वैद्य सुसेन याने संजीवनी वनस्पती मिळाली तर लक्ष्मण वाचण्याची दाट शक्यता आहे, असे निदान केले.
परंतु संजीवनी वनस्पती पृथ्वीवर फक्त द्रोणागिरी पर्वतावर आहे आणि तो इथून खूप लांब आहे. त्यामुळे ही औषधी वनस्पती कशी आणायची, हा मोठा प्रश्न उभा राहिला.
संजीवनी वनस्पती आणण्यासाठी जांभुवंताने हनुमानाला पाचारण केले आणि थोड्याच वेळात हनुमान द्रोणागिरी पर्वताकडे निघाला. तिथून हनुमानाने संजीवनी वनस्पतीच्या मुळ्या आणल्या.
सुसेनाने त्या मुळ्यांचा काढा करून लक्ष्मणाला त्याचा रस पाजला व उर्वरित चोथा वाळवून कुटून त्याचा लेप जखमेच्या ठिकाणी लावला.
थोड्याच दिवसांत लक्ष्मण शुद्धीवर आला. सर्व सैन्याला प्रचंड आनंद झाला. पुन्हा युद्ध सुरू झाले. लक्ष्मणाने आपल्या एका बाणाने इंद्रजीताचा शिरच्छेद केला.
इंद्रजीत धरणीवर पडल्यावर रावणाला आणि मंदोदरीला अतिव दुःख झाले. मंदोदरीने रावणाला खूपच दुशणे दिली व जानकीला सोडून देण्याचा पुन्हा सल्ला दिला.
तरीही रावणाने मंदोदरीचे ऐकले नाही.
शेवटी रावण एकटाच राहिला आणि तो स्वतः युद्धाला जाण्यासाठी सज्ज झाला. श्रीरामाचे आणि रावणाचे तुंबळ युद्ध झाले. कोणीच कुणाला मात देऊ शकत नव्हते.
रावणाचा जीव त्याच्या बेंबीमध्ये आहे, हे बिभीषणाने रामाला सांगितले. श्रीरामाने एकाच बाणाने रावणाच्या बेंबीवर हल्ला केला. बरोबर बेंबीत बाण घुसल्याने रावण धरणीवर कोसळला आणि “राम राम” म्हणत प्राण सोडला.
श्रीरामाने लंकेचे राज्य बिभीषणाला दिले आणि सीतेला घेऊन अयोध्येकडे प्रस्थान केले. अशी साधी आणि सरळ कथा रामायणामध्ये वर्णन केलेली आहे.
-------------------------------------------------------------
रामायणाचा अचूक कालावधी
रामायण हे महाकाव्य की खरोखरच घडलेला वास्तव इतिहास याबाबत अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. कारण रामायण केव्हा घडले हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.
रामायण व पुराणेही श्रीराम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला, तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
अनेक इतिहासकार, आणि त्या विषयाचे तज्ञ यांनी त्यांच्या परीने वेगवेगळा कालावधी काढलेला आहे. त्यामुळे रामायणाचा नेमका कालावधी कोणता याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
रामायण काळ नेमका केव्हापासून हे आपण अधिक सोप्या पद्धतीने आणि विस्तृतपणे समजून घेऊया.
हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृतीचा कालखंड लिबी यांच्या कार्बन-१४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.
हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते.
तत्कालीन लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्ग शक्तींना महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते.
निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती म्हणजेच शिव, नाग व वृषभ (म्हणजे बैल) यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते; मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत.
हडप्पा येथे सापडलेल्या पशुपती आणि बैलांच्या मूर्ती पाहता सिंधू संस्कृतीतील लोक शिवाची पूजा करत होते, असे अनुमान काढता येते. म्हणजेच भगवान शिव ही देवता किती प्राचीन आहे, याची कल्पना येते
हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती अथवा मंदिर किंवा इतर कोणत्याही वस्तू अथवा अवशेष सापडलेले नाहीत. हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये गाय, बैल, शेळी या प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत.
परंतु घोड्याचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत. त्या काळात जी शिल्पे सापडली, त्यावर घोड्याचे कोणतेही चित्र आढळले नाही. याचा अर्थ हडप्पा काळातील लोकांना घोडा माहीत नव्हता.
परंतु रामायण काळात घोड्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ हडप्पा संस्कृतीच्या नंतर रामायण काळ झाला असावा, असे स्पष्ट होते.
हडप्पा संस्कृतीचा शेवटचा काळ
जर इ.स.पू. २००० ते १५०० हा शेवटचा काळ मानला, तर मग रामायण काळ केव्हाचा असेल याचे अनुमान काढूया.
हडप्पा संस्कृतीचा शेवटचा काळ
जर इ.स.पू. २००० ते १५०० हा शेवटचा काळ मानला, तर मग रामायण काळ केव्हाचा असेल याचे अनुमान काढूया.
ऋग्वेद
ऋग्वेदात अश्वमेध वगैरे यज्ञाचा उल्लेख आहे. यावरून असे सांगता येते की ऋग्वेद हा घोडा आपल्याकडे आल्यावरचाच असावा. घोडा हा आर्यांचा अत्यंत लाडका प्राणी. परंतु हडप्पा काळात घोडा नव्हता, हे उत्खननांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे हडप्पा काळातील संस्कृतीमध्ये ऋग्वेद देखील नव्हता. म्हणजेच ऋग्वेद हा ग्रंथ हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळातील आहे.
लोखंड
ऋग्वेदात लोखंडाचा उल्लेख नाही. मग आपल्याकडे लोखंड केव्हा आले? याचा अगदी अलीकडचा पुरावा म्हणजे इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास भारतात लोखंड सापडते. अलाहाबाद, बिहार या भागात तशा खाणीही सापडल्या आहेत.
त्यावरून हा काळ काढता येतो. म्हणजे ऋग्वेद हा इ.स.पूर्व १५०० च्या आधीचा आहे, हे सांगता येते. घोडा आपल्या कडे कधी आला, याचे उत्तर इ.स.पूर्व १५०० च्या नंतर असे सांगता येते, कारण त्यापूर्वी त्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही.
त्यावरून इ.स.पूर्व २००० ते १५०० याच्या मधला काळ साधारणपणे ऋग्वेदाचा सांगता येईल.
रामायण काळात कपडे होते, दागिने होते, लोखंडाचे धनुष्यबाण होते, घोडे होते, रथ होते. ज्या अर्थी रामायणामध्ये लोखंडाच्या वस्तू होत्या, त्याअर्थी लोखंडाचा शोध लागून त्याची विविध हत्यारे बनवली जात होती.
इ.स.पूर्व १५०० च्या आसपास जर लोखंड अस्तित्वात होते, त्या अर्थी तेव्हा लोखंडाच्या वस्तू बनवल्या जात असाव्यात. परंतु इ.स.पूर्व १६०० मध्ये लोखंडाचा कुठेही उल्लेख नाही.
म्हणजेच रामायण काळ हा इ.स.पूर्व १५०० च्या नंतरचा मानायला काहीच हरकत नाही.
जातिव्यवस्था
आर्यांच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात होत्या. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र. परंतु रामायण काळ जर पाहिला, तर त्या काळात लोखंडाच्या वस्तू बनवणारे लोहार होते.
रथ बनवणारे किंवा लाकडी राजवाड्यांचे खांब बनवणारे आणि लाकडी वस्तू बनवणारे सुतार होते.
मडकी किंवा मातीची भांडी बनवणारे कुंभार होते.
त्याचप्रमाणे रामायणामध्ये धोब्याचाही उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की आर्यानंतर हळूहळू वर्णव्यवस्थेचे जातीव्यवस्थेमध्ये रूपांतर झाले होते.
म्हणजेच रामायण काळ हा सिंधू संस्कृतीनंतरचा असावा, असेही अनुमान काढता येते.
इसवी सन पूर्व आठव्या शतकातील राज्य
इसवी सन पूर्व आठव्या शतकात भारतात अनेक छोटी-मोठी राज्ये, आणि गणराज्ये अस्तित्वात होती. त्यानंतर पुढच्या दोन शतकात म्हणजेच सातव्या आणि सहाव्या शतकात महाजनपदे उदयास येऊ लागली होती, जी मोठ्या आणि शक्तिशाली राज्यांची सुरुवात होती.
अयोध्या नगरी
श्री प्रभू रामचंद्राच्या इक्ष्वाकु पूर्वजांनी या नगराची स्थापना केली. या नगरीचे सुरुवातीचे नाव कोसल असे होते.
पाणिनीची अष्टाध्यायी आणि त्यावर पतंजली यांचे भाष्य यासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये मात्र साकेत असा उल्लेख आहे.
महर्षी व्यास लिखित ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात अयोध्याचे नाव सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचे अयोध्या नगर असा आला आहे.
येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. म्हणजेच पूर्वीच्या काळात अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती हेही मान्य करावे लागेल.
पाणिनी ऋषी
पाणीणी ऋषी हे आठव्या शतकात होऊन गेले असे मानले जाते. त्यावेळेस अयोध्येचे नाव साकेत असे होते. आणि त्यानंतर अयोध्या हे नाव बदलले गेले आहे. म्हणजेच हा बदल इसवी सनपूर्व आठव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असावा. आणि त्यानंतर रामायणाचा काळ म्हणजेच आठव्या शतकाचा उत्तरार्ध येतो.
पाणिनी ऋषींचा काळ हा निश्चितपणे सांगणे थोडे कठीण आहे, कारण विद्वानांमध्ये याबाबत मतभेद आहेत. मात्र, बहुतांश विद्वानांच्या मते इ. स. पूर्व ५ वे किंवा ६ वे शतक हा त्यांचा काळ मानला जातो. काही संशोधकांनी त्यांचा काळ इ.स. पूर्व ८ व्या शतकापर्यंत मागे नेला आहे.
त्यांच्या "अष्टाध्यायी" या संस्कृत व्याकरणावरील ग्रंथावरून, ते एका अत्यंत प्रगत भाषिक परंपरेचे प्रतिनिधित्व करत होते हे स्पष्ट होते. त्यांच्या कार्यामुळे संस्कृत भाषेला एक निश्चित आणि सुव्यवस्थित व्याकरण मिळाले, जे आजही प्रामाणिक मानले जाते.
निष्कर्ष
पाणीनी ऋषींनी लिहिलेल्या अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणातील ग्रंथांमध्ये अयोध्येचे नाव साकेत असे आहे. म्हणजेच कोसल हे नाव बदलून या नगरीचे नाव साकेत असे ठेवले गेले.
पाणीणी ऋषींचा कार्यकाल जर इसवी सन पूर्व आठवे शतक मानला तर हा आयोध्या नावाच्या आधीचा कार्यकाल आहे.
म्हणजेच साकेत या नगरीचे नाव नंतरच्या काळात आयोध्या असे ठेवले गेले आहे. याचाच अर्थ रामायणाचा काळ हा इसवी सन पूर्व आठव्या शतकाच्या नंतरचा असू शकतो.
दुसरा निष्कर्ष असा काढू जर श्रीरामाच्या पाचव्या वंशजाने म्हणजेच इक्ष्वाकुने जर कोसल येथे नगर वसवले. त्यानंतर. पुढील काळात कोसलचे साकेत आणि साकेतचे आयोध्या असे नाव बदलले गेले.
------------------------------------------------------------
श्रीरामाच्या 40 पिढ्या
०० - ब्रह्मा
०१ - मरीची.
०२ - कश्यप.
०३ - विवस्वान.
०४ - वैवस्वत मनु.याच्याच काळात जलप्रलय झाला.
०५ - इक्ष्वाकु याने अयोध्याला इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली
०६ - कुक्षी.
०७ - विकुक्षी.
०८ - बाण.
०९ - अनरण्य.
१० - पृथु.
११ - त्रिशंकु.
१२ - धुंधुमारु
१३ - युवनाश्व.
१४ - मान्धाता.
१५ - सुसंधी.
१६ - ध्रुवसंधी व प्रसेनजित.
१७ - भरत.
१८ - असित.
१९ - सगर.
२० - असमंज.
२१- अंशुमान.
२२ - दिलीप.
२३ - भगीरथ.यानेच गंगा पृथ्वीवर आणली.
२४ - ककुत्स्थ.
२५ - रघु. हा अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती होता. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे रघुकुळ म्हणुन प्रसिद्ध झाले.
२६ - प्रवृद्ध.
२७ - शंखण.
२८ - सुदर्शन.
२९ - अग्निवर्ण.
३० - शीघ्रग.
३१ - मरु.
३१ - मरु.
याच्या सत्तेने आताचे अरब स्तान मरुधर, मरुस्थान किंवा मरू भूमी म्हणून ओळखले जायचे
३२ - प्रशुश्रुक.
३३ - अम्बरीष.या राजाने कायम संन्यस्त असावे याचा परिपाठ घातला.
३४ - नहुष.यांच्यापासुन कुरुवंश सुरू होतो
३५ - ययाति.
३६ - नाभाग.
३७ - अज.
३८ - दशरथ.
३९ - दशरथचे चार पुत्र
राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.
ब्रह्माच्या ४० व्या पीढ़ीत श्रीराम जन्मले.
श्रीरामाच्या चाळीस पिढ्यांचे इतकं अचूक वर्णन महर्षी वाल्मिकी यांनी केले आहे. रामायण जर महाकवी असते तर कवीला श्रीरामाच्या चाळीस पिढ्यांचे वर्णन करायची काय गरज होती?
आपण सर्वसाधारणपणे वीस वर्षाची एक पिढी मानूया. 100 वर्षात साधारण पाच पिढ्या आपण समजूया. जर इक्ष्वाकुने इसवी सन पूर्व 1500 मध्ये कोसल येथे राजधानी स्थापन केली असेल तर आपण साधारण पस्तीस पिढ्या मागे येऊया. कारण 40 पैकी पाच पिढ्या आधीच घडून गेल्या होत्या.
३५ भागिले ५ म्हणजेच ७ म्हणजे ७०० वर्षे मागे आलो. म्हणजेच इसवीसन पूर्व १५०० - ७०० = ८०० म्हणजेच इसवी सन पूर्व ८ वे शतक. म्हणजेच रामायणाचा अचूक कालावधी येतो.
------------------------------------------------------------
रामायण कळानंतरची भारतातील प्रमुख राज्ये
इसवी सन पूर्व ६ व्या शतकातील भारतातील राज्य
मगध
हे सर्वात महत्त्वाचे आणि शक्तिशाली महाजनपद होते. त्याची राजधानी पाटलीपुत्र होती.
कोसल
हे देखील एक मोठे महाजनपद होते, जे नंतर मगधमध्ये विलीन झाले.
वत्स
हे एक महत्त्वाचे राज्य होते.
अवंती
उज्जैन ही त्याची राजधानी होती.
वृज्जी (लिच्छवींसह)
हे एक गणराज्य होते, ज्याची राजधानी वैशाली होती. नंतर मगधचा राजा अजातशत्रूने हे राज्य जिंकले.
गांधार
सिंधू नदीच्या परिसरात असलेले हे राज्य होते आणि त्याची राजधानी तक्षशिला होती.
कुरु
महाभारतात उल्लेख केलेले एक प्रसिद्ध आर्य जमातीचे राज्य.
पांचाल
हे देखील एक आर्य जमातीचे राज्य होते.
मत्स्य
हे एक गणराज्य होते.
अंग
बिंबिसाराने अंग जिंकून मगधमध्ये विलीन केले.
कबोज
हे देखील एक महत्त्वाचे राज्य होते.
शाक्य गणराज्य
गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले हे एक गणराज्य होते.
अश्मक
हे गोदावरी नदीजवळचे एक राज्य होते.
सूरसेन
मथुरा ही त्याची राजधानी होती.
या काळात भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र पंजाबमधून गंगा नदीच्या खोऱ्यात सरकत होते. लोह उत्पादन आणि सुपीक जमीन यामुळे या प्रदेशात मोठ्या राज्यांचा उदय झाला.
या शतकात प्रमुख राजकीय सत्ता म्हणजेच महाजनपदे उदयास आली.
बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो. ही महाजनपदे खालीलप्रमाणे होती.
मगध
हे सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. सध्याच्या बिहार राज्यातील पाटणा आणि गया जिल्ह्यांचा प्रमुख भाग यात समाविष्ट होता. त्याची सुरुवातीची राजधानी राजगृह होती.
मगध मध्ये शेती मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षम होती आणि लोह-समृद्ध प्रदेशांशी त्याची जवळीक होती, ज्यामुळे त्यांना चांगली शस्त्रे तयार करण्यास मदत झाली.
कृषी आणि व्यापार: या काळात शेतीचा विकास झाला आणि व्यापार वाढला, ज्यामुळे राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली.
------------------------------------------------------------
रामायण काळानंतरचे कवी किंवा इतिहासकार
कालिदास यांनी आपली महाकाव्ये साधारणपणे इ.स.च्या चौथ्या किंवा पाचव्या शतकात, म्हणजेच गुप्त काळात लिहिली असावीत, असे मानले जाते.
परंतु गुप्तकाळ हा भारतीय इतिहासातील ‘सुवर्णयुग’ मानला जातो आणि कालिदासांच्या साहित्यात गुप्तकालीन वैशिष्ट्ये दिसून येतात.
कुमारसंभव
हे महाकाव्य भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह आणि त्यांचा पुत्र कार्तिकेय याच्या जन्मावर आधारित आहे। तारकासुर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कार्तिकेयाचा जन्म कसा आवश्यक होता आणि शिव-पार्वतीच्या प्रेमकथेचा प्रवास यात वर्णन केला आहे।
रघुवंश
हे एक मोठे महाकाव्य आहे, ज्यात रघुवंशातील अनेक महान राजांचे विशेषतः श्रीराम आणि त्यांच्या पूर्वजांचे तसेच वंशजांचे विस्तृत वर्णन केले आह. यात दिलीप राजापासून सुरू होऊन अनेक पिढ्यांचा आदर्शवाद आणि सत्यता दर्शविली आहे.
याव्यतिरिक्त, कालिदासांनी खंडकाव्ये, लघुकाव्ये आणि नाटके देखील लिहिली आहेत. त्यांची काही इतर प्रसिद्ध कामे अशी आहेत.
महर्षी वाल्मीकी आणि महर्षी व्यास यांना जरी महाकाव्याचे जनक मानले जात असले, तरी त्यानंतर कालिदास यांनी अनेक महाकाव्ये व नाटकांची रचना केली.
आपल्याकडे एक पद्धत असते. सर्वसाधारण मागील साहित्याची रचना कशी केली आहे, त्यावरून आपण पुढे चालत असतो.
महर्षी वाल्मीकी आणि महर्षी व्यास यांची खंडकाव्ये आणि कालिदास यांची महाकाव्यरचना यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.
कालिदासांच्या खंडकाव्यात एकच कथा फुलवत नेली आहे व त्या कथेचा शेवट केला आहे.
कालिदासांना गुप्तकालीन राजांचे पाठबळ होते, राजकीय वरदहस्त होता. म्हणूनच त्यांनी या सर्व काव्यरचना केल्या त्या काळात अशिक्षित असलेला समाज या काव्यरचना वाचू शकत नव्हता.
कोणतेही खंड काव्य लिहिताना कवीला अनेक मर्यादा येतात. त्यामुळे प्रत्येक खंड काव्य ही विशिष्ट चौकटीत आणि थोडक्यात लिहिली गेली आहेत.
परंतु रामायण हे असे महाखंड काव्य आहे की तत्कालीन संपूर्ण भारताचा इतिहास त्यामध्ये समाविष्ट केला आहे.
इसवी सन पूर्व 6 व्या आणि 7 व्या शतकात आणि त्या नंतर उदय झालेल्या अनेक राजांनी आपल्या दरबारी कवींना, धर्म पारायण करणाऱ्या लोकांना स्थान दिले होते. त्यामुळे तत्कालीन काव्यरचनेला राज दरबारी महत्व प्राप्त झाले.
कालिदास यांना जसा गुप्तकालीन राजांचा पाठबळ होता, तर मग महर्षी वाल्मीकी आणि महर्षी व्यास यांनी एवढी मोठी खंडकाव्ये कुणाच्या आधारावर लिहिली? कारण तेव्हा वाचकवर्ग कोण होता, याचाही विचार करावा लागेल.
रामायण आणि महाभारताचे टीकाकार, इतिहासकार किंवा अभ्यासक रामायण आणि महाभारत हे महाकाव्य आहे, प्रत्यक्ष इतिहास नाही, असे म्हणून रामायण घडलेच नाही, असे सांगून मोकळे होतात.
तर मग ही महाकाव्ये लिहिण्यासाठी वाल्मीकी आणि व्यास यांना कोणत्या राजाने पाठबळ दिले? आणि ही काव्ये वाचायला भारतामध्ये त्यावेळी कोणता वाचकवर्ग होता, शिक्षणाच्या कोणत्या सुविधा होत्या, हे मात्र सांगितले जात नाही.
मुघलांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासापासून अगदी अलीकडील काळापर्यंत इतिहासाच्या सर्व नोंदी आपल्याकडे नोंदविलेल्या आहेत. या सर्व नोंदी विस्तृत आणि बारीकसारीक माहितीच्या स्वरूपात केलेल्या आहेत. त्यामुळे आपण हा इतिहास खोटा अथवा चुकीचा मानू शकत नाही.
रामायणामध्ये अगदी भगवान श्रीरामाच्या चाळीस पिढ्यांपासून प्रत्येक राजाच्या नावानिशी माहितीचे वर्णन केले आहे. शिवाय ते वनवासात जाण्यापासून ते परत येईपर्यंतची सर्व बारकाव्यांसह माहिती वर्णन केली आहे. यासाठी अनेक संदर्भ दिले आहेत. रामायणामध्ये साधारण 80 ते 900 लोकांच्या नावाचा समावेश केलेला आहे. तत्कालीन भौगोलिक रचना, डोंगर, दऱ्या, वने,,नद्या,,समुद्र असं संपूर्ण भारताचे वर्णन केले आहे.
याचाच अर्थ असा सिद्ध होतो की ऐतिहासिक महाकाव्य रचनाकार महर्षी वाल्मिकी यांनी रामायण काल घडल्यानंतर विविध माहिती आणि स्त्रोताच्या आधारे रामायण लिहिलेले असावे.
त्या काळात लिखाणाची पद्धत ही पद्य स्वरूपात असल्यामुळे ऐतिहासिक महाकवी लिहिताना महर्षी वाल्मिक अलंकारिक भाषेचा उपयोग केला असावा. हे ऐतिहासिक महाकाव्य अधिक सुंदर आणि बहारदार करण्यासाठी त्यांनी अनेक काल्पनिक आणि
नवव्या आणि दहाव्या शतकात नाथ संप्रदाय अस्तित्वात होता. नाथांच्या घडलेल्या अनेक घटना मालूकवी यांनी ‘नवनाथ’ ग्रंथात इसवी सन १७०० मध्ये ओवीबद्ध केलेल्या आहेत.
याचाच अर्थ रामायण काळ घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी ऐकीव माहितीच्या आधारे महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले असावे. त्यावेळी गद्य स्वरूपात लिखाण केले जात नव्हते. किंवा तो प्रकारच अस्तित्वात नव्हता. जे लिखाण केले जात होते ते पद्य स्वरूपात होते.
त्यानंतरच्या काळात कालिदासाच्या समकालीन कवींची महाकाव्य प्रसिद्धीस आली. रामायण देखील पद्य स्वरूपात असल्यामुळे ते महाकाव्य म्हणून प्रसिद्ध पावले.
तेव्हा संस्कृत ही भाषा यशाच्या शिखरावर होती. त्यामुळे कोणतेही लेखन हे अनुष्टूप छंदामध्ये लिहिले जात असे. म्हणूनच रामायण हा ग्रंथ सुद्धा किंवा इतिहास म्हणा हवं तर अनुष्टूप छंदामध्ये संस्कृत भाषेत श्लोकांमधून लिहिला गेला.
गद्य प्रकार हा नंतर अस्तित्वात आला. आजच्या काळात इतिहास हा गद्य स्वरूपात लिहिला जातो. असे असताना रामायण काळाला महाकाव्य म्हणून तो इतिहास नाही, असे म्हणणे वेडेपणाच नाही काय?
------------------------------------------------------------
रामायण काळ व त्यानंतरची समाज व्यवस्था
रामायण काळात सामान्य जनतेचा पेहराव हा मुख्यत्वे साधे आणि न शिवलेले कपडे असायचा. त्या काळात शिवलेले कपडे फारसे प्रचलित नव्हते, त्यामुळे लोक मुख्यत्वे खालील प्रकारचे वस्त्र परिधान करत असत.
पुरुषांचा पेहराव
पुरुष धोतरा सारखे वस्त्र नेसत असत, जे कमरेला गुंडाळून पायांच्या मधून घेऊन मागे खोचले जात असे. त्याला अंतरीय असे म्हटले जात असे.
अंगावर जे वस्त्र (शाल किंवा एक साधा कपडा) खांद्यावर किंवा गळ्यात टाकत असत. हे वस्त्र अंगाच्या वरच्या भागाला झाकण्यासाठी वापरले जात असे. या वस्त्राला उत्तरे असे म्हटले जात असे.
काही प्रसंगी उष्णीष म्हणजेच पगडी किंवा फेटा डोक्यावर बांधला जात असे, विशेषतः सैनिक किंवा महत्त्वाचे पुरुष.
महिलांचा पेहराव
स्त्रिया सामान्यतः एकच लांब कापड परिधान करत असत, जे आजच्या साडीसारखे कमरेभोवती गुंडाळले जात असे आणि त्याचा काही भाग वरच्या शरीरावर किंवा खांद्यावर घेतला जात असे. याला अंतरिया आणि उत्तरीया असेही म्हटले जात असे.
कमी कपड्यांमध्ये स्त्रिया फक्त कमरेभोवती एक वस्त्र गुंडाळत असत, विशेषतः घरात असताना किंवा कमी महत्त्वाच्या कामांसाठी होत असे.
याचाच अर्थ असा की तेव्हा शिवणकला विकसित झाली नव्हती.
दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे, जरी सामान्य जनता राजघराण्याइतके महागडे दागिने वापरत नव्हती.
वस्त्राचे प्रकार आणि रंग
कापूस Cotton)
सामान्य जनता प्रामुख्याने सुती कपडे वापरत असे, कारण ते उष्ण हवामानासाठी आरामदायक होते.
रेशीम (Silk)
रेशीम वस्त्रे राजघराण्यातील लोक किंवा धनाढ्य लोक विशेष प्रसंगी वापरत असत. पण रामायणात असे उल्लेख आहेत की रेशीम सामान्य लोकांसाठीही उपलब्ध होते, त्यांना "कौशेय" असे म्हटले जायचे.
क्षौम (Linan)
क्षौम हे एक प्रकारचे तलम वस्त्र होते, जे पवित्र मानले जात असे आणि पूजा-अर्चेसाठी वापरले जात असे.
रंग
त्या काळात तेजस्वी आणि नैसर्गिक रंगांचे कपडे वापरले जात असत. वाल्मिकी रामायणात विविध रंगांचे सुंदर वर्णन आढळते.
भरतकाम आणि किनारी
रामायण काळात भरतकाम केलेले आणि किनारी असलेले वस्त्र बनवण्याची कला प्रगत होती.
हरीण किंवा इतर तत्सम प्राण्यांना मारून त्यांच्या कातड्यापासून स्त्रियांसाठी चोळी किंवा कंचुकी बनवली जात असे.
लक्षात घेण्यासारख्या गोष्टी
वनवासात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी ऋषीमुनींसारखे वल्कले (झाडांच्या सालीपासून बनवलेले कपडे) परिधान केले होते, जे त्यांच्या त्यागी जीवनाचे प्रतीक होते.
एकूणच, रामायण काळातील सामान्य जनतेचा पेहराव हा साधा, सुती, अंतरीय आणि उत्तरीय प्रकारचा आणि हवामानाला अनुकूल असा होता, ज्यात नैसर्गिक रंगांचा आणि मर्यादित दागिन्यांचा वापर केला जात असे.
दागिने
सामान्य जनता सुवर्ण अलंकारांऐवजी तांबे, कासे किंवा मण्यांचे दागिने वापरत असावी. सीतेने वनवासात जाताना तिचे दागिने अंगावरच ठेवले होते, ज्याचा उपयोग पुढे मार्ग शोधण्यासाठी झाला, हे या वस्त्रांच्या आणि दागिन्यांचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
रामायण काळातील अन्नपदार्थ
प्रमुख अन्नपदार्थ
रामायण काळामध्ये लोकांचे प्रमुख अन्नपदार्थ विविध प्रकारचे होते, जे त्यांच्या सामाजिक स्थितीवर आणि ते कोणत्या ठिकाणी राहत होते यावर अवलंबून होते
धान्य
भात (तांदूळ)
हा एक महत्त्वाचा अन्नपदार्थ होता आणि तो दैनंदिन आहारात तसेच धार्मिक विधींमध्ये वापरला जात असे.
ज्वारी (बार्ली)
हे एक प्राचीन धान्य मानले जाते आणि ते यज्ञात तसेच सामान्य आहारातही वापरले जात असे.
गहू
गव्हाचा उल्लेख देखील आढळतो, विशेषतः समृद्ध आणि शहरी भागांमध्ये.
तीळ
तिळाचा वापर स्वयंपाकात आणि धार्मिक विधींमध्ये केला जात असे.
फळे आणि कंदमुळे
वनवासात असताना राम, लक्ष्मण आणि सीता मुख्यत्वे फळे आणि कंदमुळे खाऊन राहत असत. यामध्ये आंबे, केळी, फणस, बोर आणि विविध कंदमुळांचा समावेश होता.
फळे ही पवित्र मानली जात असत आणि देवांना अर्पण केली जात असत.
मध: मध हा एक मौल्यवान आणि शुद्ध अन्नपदार्थ मानला जात असे, जो आरोग्य आणि गोडवा दोन्हीसाठी महत्त्वाचा होता.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, लोणी आणि तूप हे आहाराचा एक महत्त्वाचा भाग होते.
मसाले
जेवणात विविध मसाल्यांचा वापर केला जात असे, जसे की लवंग, जिरे, आले आणि इतर सुगंधी मसाले.
थोडक्यात, रामायण काळातील लोकांचा आहार त्यांच्या जीवनशैलीनुसार (उदा. राजा किंवा वनवासी) आणि उपलब्धतेनुसार वैविध्यपूर्ण होता. धान्य, फळे, कंदमुळे,आणि दुध हे प्रमुख घटक होते.
रामायणातील वर्ण व्यवस्था
रामायणातील वर्ण व्यवस्था आणि त्या काळातील सामाजिक जीवन विविध घटकांनी बनले होते, ज्यामध्ये विविध प्रकारच्या कारागिरांचे, शेतकऱ्यांचे, आणि सेवक वर्गाचे महत्त्व होते. अयोध्येत विविध समाजवर्गांची उपस्थिती होती, ज्यांनी प्रत्येकाच्या कार्यानुसार तात्कालीन समाजाला महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये सर्वांनी विविध व्यवसायांचे पालन केले होते आणि त्यांचे योगदान त्या काळातील सामाजिक जीवनावर लक्षणीय प्रभाव पाडत होते.
रामायणातील वर्णव्यवस्था, जी त्या काळाच्या समाजाची रचना दर्शवते. चार प्रमुख वर्णांचा उल्लेख रामायणात केला जातो आणि प्रत्येक वर्णाचे विशिष्ट कार्य व भूमिका होती. यातील वर्ण प्रणालीने समाजातील कार्यविभाजन आणि सामाजिक स्थैर्य राखले होते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्मावरून आणि कर्मावरून एक स्थान देण्यात आले होते, आणि त्यानुसार त्यांना जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले जात होते.
1. ब्राह्मण
कार्य: ब्राह्मण हे समाजातील धार्मिक, विद्वान, आणि गुरु वर्गाचे लोक होते. त्यांचा मुख्य कार्यधारा वेदशास्त्रांचे अध्ययन, उपदेश, यज्ञ, आणि पूजा कर्मे होती. ते धार्मिक कार्ये, संस्कार, आणि वेदस्मरण करणारे होते. ब्राह्मण समाजाला आदर्श जीवन जगण्याचा मार्गदर्शन करत होते, तसेच त्या काळातील राजकारणातही त्यांचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप होता.
रामायणातील भूमिका
ऋषीमुनी
अनेक ऋषी ब्राह्मण वर्णातील होते. त्यांच्यामुळे धार्मिक जीवनशैली आणि पवित्रतांची जाणीव झाली.
वशिष्ठ आणि विश्वामित्र: श्रीरामाच्या जीवनात वशिष्ठ आणि विश्वामित्र या ब्राह्मण ऋषींचा विशेष महत्त्व आहे. वशिष्ठ हे रामाचे गुरु होते आणि त्यांचे जीवन वागणुकीचे आदर्श प्रस्तुत करत होते.
2. क्षत्रिय
कार्य: क्षत्रिय हे समाजातील शौर्य, सैन्य आणि राज्यकारभार करणारे वर्ग होते. त्यांचे मुख्य कार्य राज्याचे संरक्षण, युद्ध करणे, न्याय देणे, आणि समाजातील सुव्यवस्था राखणे हे होते. राजा, शाही घराणे, आणि सैन्य प्रमुख यांचे प्रमुख कार्य क्षत्रिय वर्गात येते.
रामायणातील भूमिका
श्रीराम: श्रीराम हा क्षत्रिय होता आणि त्याचे जीवन आदर्श राजा म्हणून दाखवले आहे. त्याच्या कर्तव्यपालनाची आणि सत्याची शिकवण या वर्गाचे आदर्श ठरली.
भरत, लक्ष्मण, आणि शत्रुघ्न: श्रीरामाचे बंधूही क्षत्रिय होते आणि त्यांचे कार्य राज्याचे रक्षण व धर्माचे पालन करणे होते.
रावण: रावण, जो रामायणातील मुख्य प्रतिपक्षी होता, तो देखील एक क्षत्रिय होता. तथापि, त्याच्या अत्याचारामुळे त्याची कथा एक नकारात्मक उदाहरण बनली.
3. वैश्य
कार्य: वैश्य हे व्यापारी, कृषक आणि धनसंचय करणारे लोक होते. यांचा मुख्य उद्देश आर्थिक व्यवहार, व्यापारी कर्तव्य, आणि कृषी उत्पादन करणे हा होता. वैश्य समाजाचा प्रमुख कार्यविभाग व्यापार, धनसंचय आणि अन्न उत्पादनाच्या क्षेत्रात होता. ते समाजासाठी उत्पादन आणि जीवनाची व्यवस्था करत होते.
रामायणातील भूमिका
शेतकरी आणि व्यापारी: रामायणात वैश्य वर्गाचे थेट उल्लेख कमी असले तरी त्यांचा अर्थशास्त्र आणि अन्न उत्पादनाच्या महत्त्वपूर्ण कार्यात उपस्थिती होती.
रामाचा आदर्श: श्रीरामाचा आदर्श, जे त्याचे कार्य आणि ध्येय, हे सर्व वर्गांच्या हितासाठी होते, आणि व्यापारी वर्ग देखील त्याच्या आदर्शातून प्रेरित होत होते.
4. शूद्र
कार्य: शूद्र हे समाजातील सेवा करणारे वर्ग होते. त्यांचे मुख्य कार्य अन्य वर्गांसाठी सेवा, हातकाम, आणि शारीरिक श्रम करणे होते. शूद्र समाजाला त्याच्या श्रमाशी संबंधित कार्य करण्याची जबाबदारी होती आणि त्यांची सामाजिक स्थिती अन्य तीन वर्णांपेक्षा कमी मानली जात होती.
रामायणातील भूमिका
शबरी: शबरी एक शूद्र स्त्री होती, आणि ती रामायणातील एक महत्त्वपूर्ण पात्र आहे. तिच्या आदर्श अतिथ्याने जातिव्यवस्थेच्या सीमा ओलांडल्या, आणि रामाने तिचे स्वागत केले. शबरीचे कार्य, भक्ती आणि आदर्श सेवा हे शूद्र वर्गाच्या सन्मानाचे प्रतीक बनले.
संत आणि भक्त: रामायणामध्ये शूद्र वर्गाच्या लोकांचा उल्लेख आहे ज्यांनी श्रीरामाचा आदर्श आणि धर्म स्वीकारला.
वर्णव्यवस्था आणि रामायणातील समाजाचे कार्यविभाजन
रामायणात वर्णव्यवस्था केवळ एक सामाजिक रचना नसून ती धार्मिक, संस्कृतिक, आणि आर्थिक कार्यविभाजनाच्या आधारावर आधारित होती. प्रत्येक वर्गाचे कार्य हे त्याच्या स्थानानुसार ठरवले गेले होते, आणि त्यांचा परस्पर संबंध समाजाच्या सुव्यवस्था राखण्यास मदत करत होता.
रामायणातील वर्णव्यवस्थेचे महत्त्व आणि त्याच्या कार्याचे विविध दृषटिकोन समाजाच्या आदर्श, धर्म, आणि जीवनशैलीमध्ये सामावलेले होते. प्रत्येक वर्गाने आपापले कार्य प्रामाणिकपणे केले आणि त्याच्या कर्तव्यात उत्कृष्टता साधली, जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.
रामायणातील चार वर्ण हे प्रत्येक सामाजिक कार्याच्या ठराविक भागाचे प्रतीक होते. त्यामध्ये ब्राह्मण समाज धार्मिक शिक्षण देणारा, क्षत्रिय समाज युध्द आणि राज्यकारभार सांभाळणारा, वैश्य समाज आर्थिक आणि कृषी कार्य करणारा आणि शूद्र समाज सेवा व श्रमाची भूमिका पार करणारा होता. प्रत्येक वर्गाने आपल्या कार्यांद्वारे समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्याचे कार्य जगण्यासाठी आवश्यक असले.
परंतु त्या काळात कोणत्याही वर्णाच्या माणसाला त्याच्या गुणवत्तेवरून दुसऱ्या वर्णात जाण्यास मुभा होती.
महर्षी वाल्मीकि हे कोळी समाजाचे होते, असे अनेक प्राचीन संदर्भ आणि कथा सांगतात. त्यांचा जन्म एका शूद्र कुटुंबात झाला होता. परंतु, त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे ते पुढे ब्राह्मण म्हणून ओळखले गेले , कारण त्यांचे धार्मिक कार्य आणि महत्त्व त्यांच्या शास्त्रज्ञानामुळे आहे.
तथापि, त्या काळात वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था अशा प्रकारे गुंतलेली होती की, समाजातील विविध तपशिलांमुळे या व्यक्तींची जात अधिक गडद होती. अनेक क्षुद्र लोक पुढे सैन्यात भरती होऊन क्षत्रिय झाले. त्यामुळे रामायणामध्ये जाती व्यवस्थेपेक्षा वर्ण व्यवस्थेला आणि वर्ण व्यवस्थित पेक्षा माणसाच्या कलागुणांना आणि ज्ञानाला महत्त्व होते.
रामायण काळातील व्यवसाय.
रामायण काळात ग्रामीण आणि शहरी भागात विविध व्यवसायिक लोक राहत होते. परंतु अद्याप त्यामध्ये व्यवसायाचे जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झाले नव्हते. हे सर्व व्यवसाय शूद्र या वर्णांमध्ये येत होते.
1. राजवाडे आणि घरे बांधणारे कारागीर, सुतार
रामायण काळात राजवाडे, महल, आणि घरांचे बांधकाम करणारे कारागीर व सुतार अत्यंत महत्त्वाचे होते. सुतार हे लाकडाचे काम करणारे कारीगर होते, जे घरांचे फर्निचर, दरवाजे, व महाल बांधण्यासाठी लाकडी सामग्री तयार करत होते. या कारागिरांचा समाजातील स्थान हे उच्च होते, कारण तेच राजवाड्यांच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी कौशल्ये देत होते.
2. शस्त्र तयार करणारे लोहार
लोहार हे शस्त्र तयार करणारे कारीगर होते. त्यांचे कार्य विशेषत: युद्धासाठी आवश्यक शस्त्रे, शिल्लक, आणि दारुगोळा तयार करणे होते. रामायणात श्रीराम आणि अन्य राजपुत्रांच्या शस्त्रांचे महत्व दाखवले आहे, आणि त्यासाठी लोहारांचे काम अत्यंत आवश्यक होते. रामाच्या धनुष्य, बाण यांसारख्या शस्त्रांचा उल्लेख यामध्ये महत्त्वाचा आहे. लोहार ही एक अत्यंत महत्त्वाची जात होती जी शौर्य आणि युध्दक्षमता प्रतीक म्हणून ओळखली जात होती.
3. दागिने बनवणारे सोनार
सोनार हे दागिने तयार करणारे कारीगर होते. या व्यवसायाच्या माध्यामातून समाजातील उच्च वर्गासाठी दागिन्यांचे उत्पादन केले जात होते. रामायणात हनुमानने सीतेसाठी सोने दाखवले, आणि सोने हे एक अत्यंत मौल्यवान वस्तू मानली जात होती. सोनार लोकांचा कार्य समाजातील वैभव आणि संपत्तीची प्रदर्शक होती.
4. सुत कातणारे, विणकर, कपडे रंगवणारे रंगारी
सुत कातणारे आणि विणकर हे कापड उद्योगात कार्य करणारे कारीगर होते. रामायण काळात कपड्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, विशेषत: राजघराण्यांच्या वस्त्रांची तयारी करण्यासाठी. रंगारी हे कपड्यांना रंग देणारे कलाकार होते, ज्याचा उपयोग विविध रयत्यांमध्ये होतो. या लोकांचे काम त्या काळातील सामाजिक जीवनात विशेष स्थानाचे होते, कारण ते लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्त्र तयार करत होते.
5. रथ बनवणारे कारागीर
रथ बनवणारे कारागीर हे तंत्रज्ञ होते, जे युद्धासाठी आवश्यक रथ तयार करत होते. रथ हे त्या काळातील प्रमुख युद्ध यंत्र होते, आणि रथ तयार करणारे कारीगर युद्धतंत्र आणि सैनिकी तयारीतील महत्त्वपूर्ण घटक होते. रामायणातील युद्धाच्या प्रसंगांमध्ये रथांची महत्त्वपूर्ण भूमिका होती
6. धान्य पिकवणारे शेतकरी
शेतकरी हे त्या काळात महत्त्वपूर्ण वर्ग होते. धान्य पिकवणे हे जीवन जगण्यासाठी आवश्यक होते. रामायणमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनातील साधेपणाचे आणि श्रमाचे महत्त्व दाखवले आहे. श्रीराम आणि त्याचा कुटुंब सदस्य सुद्धा त्यांचा आदर्श ठरवत, श्रम आणि साधेपणाला महत्त्व देतात. शेतकरी वर्गाचा समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे होते, कारण तेच अन्नधान्य उत्पादन करत होते.
7. धोबी
धोबी हे कपडे धुणारे लोक होते, आणि त्यांचे कार्य त्या काळात महत्त्वाचे होते. धोबी समाजातील सर्व वर्गांच्या कपड्यांना स्वच्छ आणि योग्य ठेवणारा महत्त्वाचा घटक होता. रामायणात श्रीराम आणि सीतेच्या कपड्यांच्या स्वच्छतेसाठी धोब्यांचा उल्लेख आला आहे, जो त्यांच्या कार्याच्या महत्त्वाची पुष्टी करतो.
8. शबरी – विशेष उल्लेख
शबरी एक शूद्र म्हणजेच भिल्ल स्त्री होती, जी रामायणात विशेष महत्त्वाची व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. ती एक गरीब आणि दरिद्री होती, पण तिच्या अतिथ्याला श्रीरामांनी मान दिला. शबरीचे जीवन दर्शविते की, जातिव्यवस्था आणि वर्गभेदापेक्षा महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीचा आदर्श, तिचा धर्म, आणि तिचे कार्य. शबरीने रामायणातील जातिव्यवस्थेला एक नवीन दृषटिकोन दिला.
9. होडी वल्हलावणारे नाविक
हॊडी हे नाव नदीतून प्रवाशांना नेण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे, हॊडी वल्हलावणारे म्हणजे नदीतून प्रवाशांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेण्याचे कार्य करणारे लोक. यांचे कार्य महत्त्वाचे होते,. श्रीरामाला वनवासात जाण्यासाठी शरयू, तामसा, गोदावरी, तुंगभद्रा अशा अनेक नद्या होडीतून पार करून पुढे जावे लागले.. यासाठी त्यांना स्थानिक नाविकांनी मदत केली. याचा अर्थ त्यावेळी नाविक हा वर्ग कार्यरत होता.
10. दासी
दासी किंवा सेविका वर्ग हे रामायणात एक महत्त्वाचे स्थान असलेले वर्ग होते. हे लोक राजवाड्यांमध्ये, घरांमध्ये सेवा देणारे होते. त्यांचे कार्य समाजाच्या कार्यविभाजनाचे एक महत्त्वपूर्ण घटक होते. यांचा स्थान आणि जीवनशैली कधीकधी तितकीच कडक होती, परंतु काही प्रसंगी त्यांना उच्च वर्गाच्या लोकांसोबत आदर आणि सन्मान दिला जात होता.
सामाजिक जीवनावर प्रभाव
रामायणातील जातिव्यवस्थेने त्यावेळच्या समाजाच्या कार्यविभाजनाला आकार दिला. प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य आणि स्थान आदर्शपणे निभावले, आणि त्याच्याद्वारे सामाजिक स्थिरता आणि सुव्यवस्था राखली गेली. त्यावेळी प्रत्येक वर्गाचे योगदान महत्त्वाचे होते, आणि ते समाजात आपापल्या कार्यक्षेत्रांमध्ये आदर्श होण्याची अपेक्षा ठेवत होते.
एकूणच रामायण काळात व्यवसायाचे रूपांतर जाती व्यवस्थे मध्ये होण्याची पहिली पायरी सुरु झाली होती.
-------------------------------------------------------------
रामायण काळातील ऋषीमुनी
विश्वामित्र
विश्वामित्र हे अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी ऋषी होते. ते पूर्वी एक राजा होते, परंतु वसिष्ठांशी झालेल्या संघर्षानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केले.
भगवान रामाला आणि लक्ष्मणाला त्यांनी अनेक दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले आणि ताटका राक्षसिणीचा वध करण्यासाठी मार्गदर्शन केले. श्रीरामाला 'बला' आणि 'अतिबला' हे मंत्र विश्वामित्रांनीच दिले होते.
वसिष्ठ
वसिष्ठ हे रघुवंशाचे (प्रभू रामांचे कुटुंब) कुलगुरू होते. ते अत्यंत ज्ञानी, शांत आणि धर्मनिष्ठ ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांनी रामाला आणि त्यांच्या बंधूंना राजधर्म, शस्त्रविद्या आणि वेद-वेदांगांचे शिक्षण दिले. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील संबंध हे ज्ञान आणि तपश्चर्येच्या श्रेष्ठत्वाचे प्रतीक मानले जाते.
अगस्त्य
अगस्त्य ऋषी हे दक्षिण भारतातून जाऊन संस्कृतीचा प्रसार करणारे महान ऋषी होते. त्यांनी विंध्य पर्वताला खाली वाकवले अशी आख्यायिका आहे. रावणाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी श्रीरामाला 'आदित्य हृदय स्तोत्र' दिले होते, ज्यामुळे रामाला रावणावर विजय मिळवण्यात मदत झाली.
शृंगी ऋषी
दशरथ राजाला पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी 'पुत्रकामेष्टी यज्ञ' करवला होता. त्यांच्या तपश्चर्येमुळे आणि यज्ञाच्या प्रभावाने दशरथांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र प्राप्त झाले.
भारद्वाज
भारद्वाज ऋषी हे अत्री ऋषींचे पुत्र आणि द्रोणाचार्य यांचे वडील होते. ते महान तपस्वी आणि ज्ञानी होते. वनवासात असताना श्रीराम आणि सीता त्यांच्या आश्रमात थांबले होते. त्यांनी रामाला विविध ठिकाणांची माहिती दिली आणि त्यांना चित्रकूटला जाण्याचा सल्ला दिला.
अत्री
अत्री ऋषी हे सप्तर्षींपैकी एक होते आणि अनसूया यांचे पती होते. ते महान तपस्वी आणि धर्मज्ञानी होते. चित्रकूट येथील त्यांचा आश्रम रामायण काळात महत्त्वाचे स्थान होते. भगवान राम आणि सीता यांनी त्यांच्या आश्रमाला भेट दिली होती.
शरभंग
शरभंग ऋषी हे दंडकारण्यात राहत होते. त्यांनी श्रीरामांना त्यांच्या तपस्येचे फल दिले आणि स्वर्गात गमन केले.
सुतीक्ष्ण
सुतीक्ष्ण ऋषी हे अगस्त्य ऋषींचे शिष्य होते. त्यांनी श्रीरामांना विविध ऋषींच्या आश्रमांबद्दल माहिती दिली आणि त्यांना राक्षसांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.
रामायण काळापूर्वीचे प्रमुख ऋषीमुनी (ज्यांचा प्रभाव रामायण काळातही होता)
ब्रह्मदेव (प्रजापती)
ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते मानले जातात आणि ते सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. अनेक ऋषीमुनींनी त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले.
अंगिरा
अंगिरा हे ब्रह्मादेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आणि महान वैदिक ऋषी होते. ते अग्निचे उपासक म्हणून ओळखले जातात आणि अनेक वैदिक सूक्ते त्यांच्याशी संबंधित आहेत.
भृगू
भृगू ऋषी हे ब्रह्मादेवांच्या मानसपुत्रांपैकी एक होते. ते ज्योतिष, आयुर्वेद आणि धर्मशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. भृगू संहिता हे त्यांचे प्रसिद्ध कार्य आहे.
कश्यप
कश्यप ऋषी हे प्रजापती दक्ष आणि अदितीचे पुत्र होते. अनेक देवता, राक्षस, मानव आणि इतर जीवसृष्टीचे ते जनक मानले जातात.
अथर्वन
अथर्वन ऋषी हे अथर्ववेदाचे प्रमुख रचनाकार मानले जातात. ते मंत्रविद्या आणि आयुर्वेद यांमध्ये निपुण होते.
च्यवन
च्यवन ऋषी हे भृगू ऋषींचे पुत्र होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना च्यवनप्राश या आयुर्वेदिक औषधाच्या शोधाचे श्रेय दिले जाते.
जमदग्नी
जमदग्नी ऋषी हे परशुरामांचे वडील होते आणि भृगू कुळातील एक महान ऋषी होते. ते कठोर तपस्या आणि ब्रह्मतेज यासाठी ओळखले जात होते.
दुर्वास
दुर्वास ऋषी हे अत्री आणि अनसूया यांचे पुत्र होते. ते त्यांच्या तीव्र स्वभावासाठी आणि शाप देण्याच्या शक्तीसाठी ओळखले जात होते, परंतु ते महान तपस्वी होते.
हे सर्व ऋषीमुनी त्यांच्या ज्ञान, तपश्चर्या, दूरदृष्टी आणि परोपकारी वृत्तीसाठी आजही स्मरणात आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती आणि धर्म यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
याचाच अर्थ असा होतो की रामायण पूर्वकाळात आणि रामायण काळात एवढे ऋषीमुनी होऊन गेले आणि त्यांचे श्रीरामा बरोबर कुठे ना कुठेतरी संबंध आलेले आहेत हे मूळ वाल्मिकी रामायण वाचताना लक्षात येते.
तर मग जर त्या काळात वर उल्लेख केलेले ऋषीमुनी जर होते आणि त्यांचा श्रीरामाशी संबंध देखील आला होता तर रामायण हे कपोलकल्पित आहे किंवा महाकाव्य आहे हे आपण कोणत्या आधारे सिद्ध करू शकतो?
तत्कालीन ऋषीमुनींचे श्रीरामाविषयी असलेले मत
आपण आजच्या काळात पाहतो कुणी ना कुणी भाविकतेने अनेक संत, महात्मे यांचे भक्त आहेत. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, श्रीदत्त अशा अनेक देवादिकांच्या पूजाअर्चा करतो नामस्मरण करतो.
श्रीराम हे इतके तेजपुंज आणि प्रसन्न चेहऱ्याचे आणि लोकप्रिय होते की त्या काळातील अतिशय श्रेष्ठ स्थान असलेल्या सर्व ऋषीमुनींचे देखील ते अत्यंत प्रिय झाले. त्यामुळेच त्यांना त्यावेळी देवत्वाचा दर्जा दिलेला असावा. जसे आताच्या काळात आपण स्वामी समर्थ, साईबाबा, संत महात्मे यांना देतो तसे.
आताच्या काळात काही लोक महापुरुषांना देखील देवाचा दर्जा देताना दिसून येतात.
त्या काळात सर्व ऋषीमुनी श्रीरामांचे अदरातिथ्य करत असल्याचे आपण वाल्मिकी रामायणामध्ये वाचले आहे. व या सर्व ऋषीमुनींनी श्रीरामांना दैवी अवतार असल्याचे वाल्मीकी रामायण मध्ये सांगितले आहे.
याचा अर्थ श्रीराम हे सर्वसामान्य माणूस नव्हते तर ते खरोखरच दैवी शक्ती असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी त्यांच्या तरुण वयात अनेक वाईट शक्ती असलेल्या व युद्धात पारंगत असलेल्या लोकांना नामोहरण केल्याचे पाहायला मिळते.
त्यांच्या या तेजपुंज आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन भविष्यात सुग्रीव, हनुमान, नळ, निळ, जांबवंत आणि अंगद असे मित्र मिळाले. शिवाय श्रीलंकेला श्रीरामाची कीर्ती ऐकून रावणाचा भाऊ बिभीषण सुद्धा श्रीरामांना येऊन मिळाला.
------------------------------------------------------------
महर्षी वाल्मीकि आणि रामायण
१. महर्षी वाल्मीकि परिचय
वाल्मीकि हे भारतीय परंपरेतील महान ऋषी,व आद्य कवी (पहिले कवी) म्हणून प्रसिद्ध आहेत.
प्रारंभिक जीवन
त्यांचे मूळ नाव रत्नाकर होते. सुरुवातीला ते दरोडेखोर होते. नारद यांच्या उपदेशामुळे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानुसार त्यांनी “राम” नावाचा जप करत कठोर तपस्या केली.
तपस्या करत असताना त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारूळ तयार झाले म्हणून पुढे त्यांचे नाव वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध पावले. असे मानले जाते.
वाल्मीकि यांनी पहिल्यांदा श्लोकबद्ध काव्य रचले.
अनुष्ठुप श्लोक छंदाचा जन्म त्यांच्या भावनेतून झाला.
म्हणून महर्षी वाल्मिकी यांना “आद्य कवी” म्हणतात.
रामायण – परिचय
रामायण हे जगातील सर्वात प्राचीन आणि महान ऐतिहासिक महाकाव्यांपैकी एक आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
भाषा: संस्कृत
रचनाकार: वाल्मीकि
श्लोक संख्या: सुमारे ९०००
कांड: ७ (बालकांड ते उत्तरकांड)
१. बालकांड
रामाचा जन्म, शिक्षण, सीतेशी विवाह
२. अयोध्याकांड
रामाला वनवास, भरताची भूमिका
३. अरण्यकांड
वनातील जीवन, सीतेचे अपहरण
४. किष्किंधाकांड
सुग्रीवाशी मैत्री, वाली वध
५. सुंदरकांड
हनुमान यांचा लंकेत जाऊन शेतीचा शोध.
६. युद्धकांड
रावण वध, राम विजय
७. उत्तरकांड
लव-कुश कथा, सीतेचा वनवास
रामायणाचा मुख्य संदेश
१. धर्म आणि कर्तव्य
श्रीराम हे आदर्श पुरुष (मर्यादा पुरुषोत्तम)
२. आदर्श नाती
राम–सीता → आदर्श दांपत्य
राम–लक्ष्मण-भरत → आदर्श भाऊ
३. सत्य आणि न्याय
अन्यायावर नेहमी सत्याचा विजय होतो
४. त्याग आणि संयम
प्रत्येक पात्राने कर्तव्यासाठी त्याग
५. वाल्मीकि आणि लव-कुश
सीता वनवासात वाल्मीकि आश्रमात राहिली
लव आणि कुश यांना वाल्मीकि यांनी शिक्षण दिले
त्यांनीच रामायणाचा इतिहास महाकाव्यद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला.
महर्षी वाल्मीकि आणि रामायण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत.
वाल्मीकि → ज्ञान, काव्य आणि साधना
रामायण → धर्म, आदर्श जीवन आणि नैतिक मूल्ये.
महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित सर्वात महत्त्वाचे आणि प्राचीन महाकाव्य आहे. या महाकाव्यामध्ये श्रीरामांच्या जन्माविषयी सविस्तर वर्णन आले आहे
महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात बदल झाले असावेत, असे अनेक संशोधक आणि अभ्यासक मानतात. या बदलांना प्रक्षिप्त भाग असे म्हटले जाते, म्हणजे जे अंश मूळ ग्रंथात नंतरच्या काळात जोडले गेले.
या बदलांची काही मुख्य कारणे आणि स्वरूपे खालीलप्रमाणे आहेत:
मौखिक परंपरा आणि हस्तलिखिते
रामायण हे सुरुवातीला मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले. या प्रक्रियेत आणि नंतर हस्तलिखितांच्या नकला करताना काही बदल, भर किंवा वगळणे झाले असण्याची शक्यता आहे.
उत्तरकांडाचा समावेश
अनेक विद्वानांच्या मते, रामायणाचे सातवे कांड, म्हणजेच उत्तरकांड, हे मूळ रामायणाचा भाग नव्हते. ते नंतरच्या काळात जोडले गेले आहे. उत्तरकांडातील काही कथा, विशेषतः सीतेचा त्याग आणि लव-कुश यांच्या कथा, मूळ रामायणातील रामाच्या चारित्र्याशी काही प्रमाणात विसंगत वाटतात, असे अभ्यासकांचे मत आहे.
धार्मिक आणि तात्विक भर
रामायणाला केवळ एक महाकाव्य म्हणून न पाहता, एक धर्मग्रंथ म्हणून महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यात धार्मिक उपदेश, तात्विक चर्चा आणि चमत्कारांची भर पडली असावी.
प्रादेशिक आणि सांस्कृतिक प्रभाव
भारताच्या विविध भागांमध्ये आणि इतर आशियाई देशांमध्ये रामायणाच्या अनेक स्थानिक आवृत्त्या विकसित झाल्या. या आवृत्त्यांमध्ये स्थानिक संस्कृती, चालीरीती आणि श्रद्धा यांचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे मूळ कथानकात बदल झाले.
आलोचनात्मक संस्करण
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI), पुणे यांनी वाल्मीकि रामायणाचे एक आलोचनात्मक संस्करण तयार केले आहे. या संशोधनात विविध हस्तलिखितांचा अभ्यास करून मूळ पाठ शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातून असे दिसून येते की, मूळ रामायणात नंतरच्या काळात अनेक भाग जोडले गेले आहेत.
यामुळे, आज आपल्याला जे वाल्मीकी रामायण उपलब्ध आहे, त्यात मूळ वाल्मीकिंनी लिहिलेला भाग आणि नंतरच्या काळात जोडले गेलेले अंश दोन्ही समाविष्ट आहेत.
मूळ वाल्मिकी रामायणामध्ये साधारण नऊ हजार श्लोक आहेत. परंतु आता आपण जे रामायण वाचतो त्यामध्ये २४००० श्लोक आहेत. म्हणजेच १५००० अतिरिक्त श्लोकांची मूळ रामायणा मध्ये भर पडल्यामुळे ते अतिरंजीत झाले आहे.
-------------------------------------------------------------
रामायणातील विस्तृत पात्रयादी
रामायण मधील प्रमुख + गौण पात्रांचा समावेश
१. अयोध्या व राजघराणे
दशरथ
कौसल्या
कैकेयी
सुमित्रा
श्रीराम
लक्ष्मण
भरत
शत्रुघ्न
मंत्री सुमंत्र
धृष्टि, जयंत, विजय (दरबारी)
२. मिथिला व जनककुल
जनक
सीता
उर्मिला
मांडवी
श्रुतकीर्ती
कुशध्वज
सुनयना
३. ऋषी-मुनी
वसिष्ठ
विश्वामित्र
वाल्मीकि
अत्रि
अनसूया
अगस्त्य
शरभंग
सुतीक्ष्ण
कश्यप
गौतम
भारद्वाज
जमदग्नी
दुर्वासा
४. वनातील पात्रे
शबरी
जटायू
संपाती
निषादराज गुह
कबंध
शुर्पनाखा
५. वानर सेना (किष्किंधा)
हनुमान
सुग्रीव
वाली
अंगद
नल
नील
जांबवान
तारा
रुमा
गवाक्ष
गंधमादन
मैन्द
द्विविद
शरभ
पनस
६. लंकेतील लोक
रावण
मंदोदरी
मेघनाद
कुंभकर्ण
शूर्पणखा
त्रिजटा
अक्षयकुमार
प्रहस्त
अतिकाय
देवांतक
नरांतक
महोदर
महापार्श्व
विरूपाक्ष
७. राक्षस (वनातील)
ताडका
मारीच
सुबाहू
खर
दूषण
त्रिशिरा
संभारी
८. इतर पात्रे
मंथरा
अहिरावण
कालनेमि
शत्रुघाती
धूम्राक्ष
शुक
सारण
धोबी
९. पुढील पिढी
लव
कुश
रामायण हे केवळ कथा नसून एक विशाल इतिहास/ आहे ज्यात राजे, ऋषी, देव, वानर, राक्षस व
समाजातील सर्व स्तरातील पात्रांचा समावेश आहे.
------------------------------------------------------------
श्रीरामचा जन्म कालावधी
वाल्मिकी रामायण हा भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित सर्वात महत्त्वाचा आणि प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रीरामांच्या जन्माविषयी सविस्तर वर्णन आले आहे. विशेषतः बालकांडातील १८ व्या सर्गात श्रीरामांच्या जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि तिथीचे वर्णन केले आहे.
ततो यज्ञे समाप्ते तु ऋतूनां षट् समत्ययुः | ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथौ || १-१८-८"
या श्लोकानुसार, पुत्रकामेष्टी यज्ञ समाप्त झाल्यानंतर सहा ऋतू उलटले आणि बाराव्या महिन्यात, म्हणजेच चैत्र महिन्यात, नवमी तिथीला श्रीरामांचा जन्म झाला.
याशिवाय, वाल्मिकींनी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत श्रीरामांचा जन्म झाल्याचे नमूद केले आहे. जन्माच्या वेळी पाच ग्रह उच्च स्थानी होते असेही सांगितले आहे.
मूळ वाल्मिकी रामायणानुसार, भगवान श्रीरामांच्या जन्मानंतर लवकरच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.
भरत यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर झाला. काही ठिकाणी हे श्रीरामांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी (दशमी) झाल्याचे नमूद आहे.
लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर (कर्क लग्न) झाला.
म्हणजेच,चारही भावांचा जन्म काही दिवसांच्या अंतराने झाला होता. श्रीराम ज्येष्ठ असून त्यानंतर भरत, आणि त्यानंतर लक्ष्मण व शत्रुघ्न (जुळे भाऊ) असे त्यांचा क्रम होता.
त्याशिवाय श्रीरामाच्या पत्नीचे नाव सीता भरताच्या पत्नीचे नाव गौतमी, लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव उर्मिला,आणि शत्रुघ्नच्या पत्नीचे नाव श्रुतीकीर्ती असे होते.
इतक्या अचूक माहितीचे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये नमूद केले आहे.
पुराणे आणि अन्य धर्मग्रंथ
स्कंद पुराण, पद्म पुराण, कालिका पुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्ये आणि अन्य धार्मिक ग्रंथांमध्ये श्रीरामांच्या जन्माचे वर्णन चैत्र शुद्ध नवमीला झाल्याचे सांगितले आहे. हे ग्रंथ शतकानुशतके या मान्यतेला पुष्टी देत आहेत.
ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
आधुनिक काळात अनेक संशोधकांनी वाल्मिकी रामायणातील ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या वर्णनाचा अभ्यास करून, श्रीरामांच्या जन्माची अचूक तारीख शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
जरी यामध्ये काही मतभेद असले तरी, चैत्र शुद्ध नवमी या तिथीलाच त्यांचा जन्म झाला होता, यावर बहुतांश ज्योतिषशास्त्रीय विश्लेषक सहमत आहेत.
थोडक्यात, वाल्मिकी रामायणातील स्पष्ट उल्लेख, रामनवमी उत्सवाची अखंड परंपरा आणि विविध धर्मग्रंथांमधील वर्णने या सर्वांच्या आधारे श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला असे सांगितले जाते.
रामायण काळ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन काळ मानला जातो. या काळात आणि त्यापूर्वी अनेक महान ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांनी समाजात ज्ञान, धर्म आणि नैतिकतेचा प्रसार केला. त्यांची तपश्चर्या, ज्ञान आणि दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे.
------------------------------------------------------------
रामायणामधील श्रीराम कसा होता?
आदर्श विद्यार्थी
श्रीराम व त्यांचे बंधू गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी श्रीरामाने आणि त्यांच्या बंधूंनी गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलात शिक्षण घेतले. शिवाय, याच काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींचे पारिपत्य देखील त्यांनी गुरूंच्या आज्ञेने केले.
आदर्श पुत्र
श्रीरामाला दुसऱ्याच दिवशी अयोध्येचा राजा करण्याचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले तेव्हा श्रीरामाच्या सावत्र आईने, म्हणजेच कैकेयीने, राजा दशरथाकडे श्रीरामाला १४ वर्षे वनवास व तिचा पुत्र भरत यास राजपद द्यावे अशा दोन मागण्या केल्या.
राजा दशरथाचे श्रीरामावर निस्सीम प्रेम असूनही वचनामध्ये अडकल्यामुळे राजा दशरथाची कोंडी झाली.
श्रीरामांना ह्या गोष्टी कळताच त्यांनी तात्काळ वनवासाला जाण्याची तयारी केली. यावरून श्रीरामाचे पितृप्रेम दिसून येते. म्हणजेच मुलगा कसा असावा तर श्रीरामासारखा पितृभक्त असावा
आदर्श बंधू
श्रीराम वनवासात निघून गेल्यावर आजोळी असलेल्या भरताला जेव्हा ही गोष्ट कळते, तेव्हा भरत हा श्रीरामाला तात्काळ भेटण्यासाठी अरण्यात जातो आणि परत अयोध्येला येण्याविषयी विनवणी करतो.
परंतु श्रीरामाने आपले पिताश्री राजे दशरथ हे वचनात अडकले असून त्यांचे वचन पूर्ण करणे कसे आवश्यक आहे, हे भरताला पटवून दिले.
यावर भरतानेही, “मी परत अयोध्येला जातो; परंतु श्रीरामा, तुझ्या चरणपादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करीन. व १४ वर्षांनी तू परत आल्यावर अयोध्येचे राज्य तुझ्या हवाली करीन,” असे सांगून भरत परत अयोध्येला आला.
यावरून एकमेकांचे बंधुप्रेम दिसून येते. म्हणजेच भाऊ कसे असावे तर श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांसारखे असावेत.
आदर्श मैत्री
श्रीराम जेव्हा सीतामाईच्या शोधात जात असतात, तेव्हा त्यांना हनुमान व सुग्रीव आणि त्यांचे मंत्री भेटतात. राजा सुग्रीव याला श्रीराम मदत करण्याचे वचन देतात आणि सुग्रीव देखील श्रीरामाला सीतामाईच्या शोधात मदत करण्याचे वचन देतात.
वचन दिल्याप्रमाणे श्रीराम हे सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून देण्यास मदत करतात आणि सुग्रीव देखील अखेरपर्यंत सीतामाईच्या शोधासाठी श्रीरामांना त्यांच्या सैन्यासह मदत करतात. ही मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवून राहते.
श्रीरामाच्या प्रेमळ, त्यागी वृत्तीने हनुमान प्रभावित होतात व शेवटपर्यंत व आजही श्रीरामाचे निस्सीम भक्त होतात.
त्याचप्रमाणे श्रीलंकेत रावणाचा भाऊ बिभीषण हे सुद्धा श्रीरामांना येऊन मिळतात व मैत्रीचा हात पुढे करतात आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतात. श्रीराम सुद्धा रावणानंतर बिभीषणाला श्रीलंकेचे राज्य देतात.
मैत्री कशी असावी तर श्रीराम, सुग्रीव, हनुमान व बिभीषण यांच्यासारखी.
आदर्श पती
वनवासात असताना ज्यावेळी सीतामाईचे हरण केले जाते आणि श्रीरामांना ही बाब समजते, त्यावेळी श्रीराम हे खूप व्याकुळ होतात व रडू लागतात. सीतामाईच्या आठवणीने ते झाडांना, वेलींना तसेच दगडांना आलिंगन देतात. इतके अतिव दुःख त्यांना होते.
नुसतेच दुःख करत न बसता ते सीतामाईच्या शोधार्थ जातात. पुढे हनुमान आणि सुग्रीवांच्या मदतीने महापराक्रमी अशा रावणाचा पराभव करून त्याचा वध करतात.
म्हणजेच पती कसा असावा तर श्रीरामासारखा.
त्यागी वृत्ती
श्रीराम हे राजपुत्र असूनही व दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे हे माहीत असूनही, १४ वर्षे राज्याचा त्याग करून वनवासात राहण्याचा निर्णय घेतात. त्याप्रमाणे अरण्यात राहून फळे आणि कंदमुळे खाऊन व वल्कले परिधान करून चरीतार्थ चालवतात.
हे श्रीरामांकडे असलेली मोठी त्यागी वृत्ती दर्शवते.
दयाळू वृत्ती
श्रीरामाने ज्यावेळी जटायू हा पक्षी रक्ताच्या थारोळ्यात व पंख कापलेल्या अवस्थेत पाहिला, त्यावेळी त्यांनी त्याची अवस्था कोणी केली असे विचारले. तेव्हा जटायूने सांगितले की, “आताच रावणाने एका स्त्रीचे हरण करून जाताना मी पाहिले. मी रावणाला पुष्कळ अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने माझे पंख छाटले.”
त्यावेळी श्रीरामाने मोठ्या प्रेमाने जटायूला मांडीवर घेतले. जटायूने श्रीरामाकडे पाणी मागितले. त्यावेळी श्रीरामाने जमिनीत बाण मारून पाणी बाहेर काढले व जटायूला पाजले. आणि त्यानंतर जटायूने श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडला.
त्यानंतर जटायूचे सर्व क्रियाकर्म श्रीरामाने पार पाडले. यावरून श्रीरामाची दयाळू वृत्ती दिसून येते.
प्रेमळ वृत्ती
पंचवटी येथे असताना मातंग ऋषी यांच्या आश्रमात राहत असलेल्या शबरी नावाच्या भिल्ल कन्येने श्रीरामाला मोठ्या प्रेमाने तिने खाल्लेली उष्टी बोरे दिली. आणि श्रीरामांनी देखील ती बोरे मोठ्या आवडीने खाल्ली.
यावरून श्रीरामाची प्रेमळ वृत्ती दिसून येते.
आदर्श व्यक्तिमत्व
श्रीराम हे आदर्श व्यक्तीपुरुष होते. ज्यावेळेस श्रीराम वनवासात होते, तेव्हा तेथील सर्व आश्रमातील ऋषीमुनींनी श्रीरामाचे अतिशय चांगल्या प्रकारे आगत-स्वागत केले व उत्तम मार्गदर्शन केले.
श्रीरामांनी सुद्धा त्यांना खूप मदत केली आणि त्यांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींचा बंदोबस्त केला.
त्यामुळे सर्व ऋषीमुनी त्यांना आदर्श व्यक्तीपुरुष तथा देवत्व बहाल केले. हेच श्रीरामाचे श्रेष्ठत्व होय.
त्यामुळेच श्रीरामांचे रामायण हे केवळ महाकाव्य नसून हिंदू धर्माचा पाया मानला जातो.
------------------------------------------------------------
रामायणातील भरत व्यक्तिचित्र
रामायणातील भरत हा केवळ राजा नव्हता, तर आदर्श बंधू, धर्मनिष्ठ पुरुष आणि त्यागाचे प्रतीक होता. त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी, सुसंस्कृत आणि आदर्शवादी होते.
१. ओळख आणि पार्श्वभूमी
भरत हा दशरथ आणि राणी कैकेयी यांचा पुत्र होता. तो श्रीराम याचा सावत्र भाऊ होता.
२. आदर्श बंधू
भरताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे रामावरील अपार प्रेम.
रामाला वनवास मिळाल्यावर त्याने राज्य स्वीकारण्यास नकार दिला.
त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून स्वतः राज्यकारभार केला. हे त्याच्या निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण आहे.
३. धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय
भरत नेहमी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालणारा होता.
त्याने आई कैकेयीच्या चुकीच्या मागणीचा कठोर निषेध केला.
त्याच्यासाठी सत्ता नव्हे, तर धर्म आणि कर्तव्य अधिक महत्त्वाचे होते.
४. त्याग आणि साधेपणा
भरताने राजवाड्यात राहण्याऐवजी नंदीग्राम येथे साध्या जीवनाचा स्वीकार केला.
भरत हा तपस्व्यासारखे जीवन जगत होता. हे त्याच्या त्यागाची पराकाष्ठा दर्शवते.
५. नेतृत्वगुण
भरताने रामाच्या अनुपस्थितीत अयोध्येचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळला.
तो एक कुशल, न्यायी आणि लोकहितकारी शासक होता.
६. भावनिक आणि संवेदनशील स्वभाव
भरत अत्यंत भावनिक होता.
रामाच्या वनवासाच्या बातमीने तो व्यथित झाला आणि त्याला परत आणण्यासाठी वनात गेला.
भरत हा रामायणातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी पपुरुष आहे.
सत्ता मिळवणे महत्त्वाचे नाही, तर योग्य मार्गाने वागणे महत्त्वाचे आहे. हे भारताकडून शिकायला मिळते.
नात्यांमध्ये प्रेम, निष्ठा आणि त्याग यांना सर्वोच्च स्थान असावे
म्हणूनच भरत हा “आदर्श बंधू” आणि “धर्माचा रक्षक” म्हणून ओळखला जातो.
रामायणातील लक्ष्मण – व्यक्तिचित्र
रामायणातील लक्ष्मण हा पराक्रम, निष्ठा आणि सेवाभाव यांचे जिवंत प्रतीक आहे. तो केवळ श्रीराम याचा भाऊ नव्हता, तर त्याचा सावलीसारखा सोबती होता.
१. ओळख आणि पार्श्वभूमी
लक्ष्मण हा दशरथ आणि राणी सुमित्रा यांचा पुत्र होता.
तो शत्रुघ्न याचा जुळा भाऊ होता.
२. आदर्श सेवक आणि बंधू
लक्ष्मणाने रामाच्या वनवासात १४ वर्षे त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
त्याने स्वतःच्या सुखाचा त्याग करून राम आणि सीता यांची सेवा केली.
तो रात्री झोप न घेता त्यांच्या सुरक्षेसाठी सतत जागा राहत असे.
३. पराक्रमी योद्धा
लक्ष्मण अत्यंत शूर आणि कुशल धनुर्धर होता.
त्याने मेघनाद (इंद्रजीत) याचा वध करून आपले शौर्य सिद्ध केले.
युद्धात त्याचा आत्मविश्वास आणि रणकौशल्य अतुलनीय होते.
४. तडक-भडक पण न्यायप्रिय स्वभाव
लक्ष्मणाचा स्वभाव थोडा उग्र होता, पण तो नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहत असे.
अन्याय सहन न करणारा, स्पष्टवक्ता आणि धाडसी व्यक्तिमत्त्व त्याचे होते.
५. लक्ष्मणरेषा – कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक
सीतेच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणाने काढलेली “लक्ष्मणरेषा” प्रसिद्ध आहे.
ही रेषा आजही मर्यादा, सुरक्षा आणि कर्तव्य यांचे प्रतीक मानली जाते.
६. त्याग आणि समर्पण
लक्ष्मणाने राजवैभव, आराम आणि वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून केवळ रामसेवा केली.
त्याच्यासाठी रामाची सेवा हाच जीवनाचा सर्वोच्च उद्देश होता.
लक्ष्मण हा रामायणातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि तेजस्वी पुरुष होता.
तो आपल्याला शिकवतो की
कर्तव्य आणि निष्ठा सर्वात मोठे असतात
खरे प्रेम म्हणजे त्याग आणि समर्पण
अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच खरे शौर्य आहे
म्हणूनच लक्ष्मण हा “आदर्श सेवक, योद्धा आणि बंधू” म्हणून ओळखला जातो.
-----------------------------------------------------------
राणी कैकेयी, दासी मंथरा आणि रामाचा वनवास.
राणी कैकेयी – व्यक्तिचित्र
कैकेयी ही दशरथ यांची तिसरी राणी आणि भरत याची आई होती.
स्वभाव आणि वैशिष्ट्ये
सुरुवातीला कैकेयी प्रेमळ, धाडसी आणि समजूतदार राणी होती
युद्धात तिने दशरथांचे प्राण वाचवले होते
त्यामुळे तिला राजा दशरथाकडून दोन वर मिळाले होते.
बदललेले व्यक्तिमत्त्व
दासी मंथरा च्या प्रभावामुळे तिच्या विचारांत बदल झाला
तिने स्वार्थी निर्णय घेत रामाला वनवास पाठवले
कैकेयीचे व्यक्तिमत्त्व हे “चांगल्या गुणांवर वाईट संगतीचा परिणाम” याचे उदाहरण आहे.
दासी मंथरा – व्यक्तिचित्र
मंथरा ही कैकेयीची वयोवृद्ध परंतु विश्वासू दासी होती.
स्वभाव आणि वैशिष्ट्ये
मंथरा ही अत्यंत चतुर, कपटी आणि दूरदृष्टी असलेली स्त्री होती.
तिच्या मनात रामाविषयी मत्सर आणि भरताविषयी पक्षपात होता.
भूमिका
तिने कैकेयीला भडकवून दोन वरदानांचा वापर करण्यास प्रवृत्त केले
रामाला वनवास आणि भरताला राज्य मिळावे असा सल्ला दिला.
मंथरा हे “वाईट सल्ला आणि नकारात्मक विचार” यांचे प्रतीक आहे.
रामाचा वनवास –
श्रीराम याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे वनवास.
वनवासाचे कारण
रामाची प्रतिक्रिया
श्रीरामाच्या वनवासाचे परिणाम
अयोध्येत दुःखाचे वातावरण निर्माण झाले.
श्रीरामाच्या दशरथांचा विरहामुळे मृत्यू झाला.
भरताने रामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार करण्याचा निर्णय घेतला.
कैकेयी → चांगली असूनही चुकीच्या प्रभावामुळे बदललेली व्यक्ती
मंथरा → नकारात्मक सल्ला देणारी व्यक्ती
रामाचा वनवास → कर्तव्य, त्याग आणि धर्माचे सर्वोच्च उदाहरण
या घटनेतून आपल्याला शिकायला मिळते की
चुकीची संगत आयुष्य बदलू शकते
सत्य आणि कर्तव्य नेहमी सर्वोच्च असतात.
रामायणातील सीता – व्यक्तिचित्र
रामायणातील सीता ही आदर्श स्त्रीत्व, पतिव्रता धर्म, सहनशीलता आणि त्याग यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ती श्रीराम यांची पत्नी आणि जनक यांची कन्या होती.
१. ओळख आणि जन्म
सीता ही मिथिला नगरीतील राजकन्या होती.
राजा जनकांना ती भूमीतून प्राप्त झाली होती, म्हणून तिला “भूमिपुत्री” असेही म्हटले जाते.
२. आदर्श पत्नी (पतिव्रता धर्म)
सीता ही पतिव्रतेचे सर्वोच्च उदाहरण मानली जाते.
रामाला वनवास मिळाल्यावर तिने कोणतीही तक्रार न करता त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सुख-दुःखात पतीसोबत राहणे हेच तिचे जीवनधर्म होते.
३. सहनशीलता आणि धैर्य
सीतेने अनेक कठीण प्रसंग धैर्याने सहन केले.
रावणाने तिचे अपहरण करून अशोकवाटिका येथे ठेवले, तरीही तिने आपला आत्मसन्मान आणि धैर्य कायम ठेवले.
ती कोणत्याही भीतीला न घाबरता सत्यावर ठाम राहिली.
४. स्वाभिमानी आणि शुद्ध चारित्र्य
सीतेचे चारित्र्य अत्यंत पवित्र आणि स्वाभिमानी होते.
तिने आपल्या पवित्रतेसाठी “अग्निपरीक्षा” दिली.
तिच्या जीवनातून स्त्रीच्या स्वाभिमानाचा आदर्श दिसून येतो.
५. त्याग आणि कर्तव्यनिष्ठा
सीतेने आपल्या आयुष्यात अनेक त्याग केले.
राजवाड्यातील सुख सोडून वनवास स्वीकारला
शेवटी लोकमतामुळे पुन्हा वनात जावे लागले
तरीही तिने कर्तव्य आणि धर्म यांचा त्याग केला नाही.
सीता ही रामायणातील सर्वात पूजनीय आणि प्रेरणादायी स्त्री पात्र आहे.
ती आपल्याला शिकवते
संकटातही धैर्य आणि संयम ठेवावा
नात्यांमध्ये निष्ठा आणि समर्पण असावे
स्वाभिमान आणि सत्य कधीही सोडू नये
म्हणूनच सीता ही “आदर्श स्त्री, पतिव्रता आणि शक्तीचे प्रतीक” म्हणून ओळखली जाते.
-------------------------------------------------------------
श्रीरामाचा सध्याच्या राज्यानुसार वनवास काळातील संपूर्ण प्रवास.
सरयू - उत्तर प्रदेश- अयोध्येचा उगम आणि अंत
गंगा - उत्तर प्रदेश, बिहार, इ. श्रृंगवेरपूर येथे ओलांडली
यमुना उत्तर प्रदेश चित्रकूट कडे जाताना ओलांडली
मंदाकिनी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश चित्रकूट निवास
नर्मदा मध्य प्रदेश, गुजरात दंडकारण्यातील प्रवास
गोदावरी महाराष्ट्र पंचवटी (नाशिक) निवास
तुंगभद्रा कर्नाटक किष्किंधा (हंपी) भाग
हा प्रवास केवळ धार्मिक नसून तो भारताची भौगोलिक एकात्मता दर्शवणारा एक ऐतिहासिक मार्ग मानला जातो.
वाल्मिकी रामायणातील संदर्भांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:
१. नद्यांचे स्पष्ट उल्लेख
वाल्मिकी रामायणात बालकांड, अयोध्याकांड आणि आरण्यकांडात नद्यांचे सविस्तर वर्णन आहे:
अयोध्याकांड
यामध्ये प्रभू राम अयोध्येतून निघाल्यावर तमसा, वेदश्रुती, गोमती, स्यंदिका आणि शेवटी गंगा नदीपर्यंत कसे पोहोचले, याचे क्रमाने वर्णन आहे.
गंगावतरण
बालकांडात गंगा नदी पृथ्वीवर कशी आली, याची संपूर्ण कथा (भगीरथाचा प्रयत्न) वाल्मिकींनी लिहिली आहे.
मंदाकिनी
अयोध्याकांडातील ९५ व्या सर्गात महर्षी वाल्मिकींनी 'मंदाकिनी' नदीचे अत्यंत विलोभनीय वर्णन केले आहे.
२. स्थानांचे आधुनिक राज्यांशी नाते
वाल्मिकींनी 'राज्य' असे उल्लेख केले नसले तरी, त्यांनी जनपद (प्रान्त/प्रदेश) आणि वनांची नावे दिली आहेत, जी आजच्या राज्यांशी जुळतात.
कोशल जनपद आजचा उत्तर प्रदेश.
चित्रकूट आणि दंडकारण्य आजचा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा काही भाग.
जनस्थान (पंचवटी) वाल्मिकींनी हे स्थान गोदावरीच्या काठी असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, जे आजचे नाशिक आहे.
किष्किंधा याच नावाने वाल्मिकींनी वानर साम्राज्याचे वर्णन केले आहे, जे आजच्या कर्नाटकातील हंपी परिसरात येते.
३. मूळ रामायण आणि प्रक्षिप्त (नंतर जोडलेले) भाग
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मूळ वाल्मिकी रामायणात सात कांडे आहेत. त्यातील नद्यांचे आणि प्रवासाचे वर्णन भौगोलिकदृष्ट्या खूप तंतोतंत आहे.
मात्र, काही उप-नद्यांची नावे किंवा अगदी सूक्ष्म स्थाने ही स्थानिक लोककथा किंवा 'रामचरितमानस' सारख्या नंतरच्या ग्रंथांतून अधिक प्रचलित झाली आहेत.
तरीही, मुख्य नद्या (गंगा, शरयू, यमुना, गोदावरी) आणि मुख्य थांबे (चित्रकूट, पंचवटी, किष्किंधा, रामेश्वरम) हे मूळ वाल्मिकी रामायणात भक्कम पुराव्यासह आहेत.
४. प्रवासाचा मार्ग
वाल्मिकी रामायणात प्रभू रामांनी दक्षिण दिशेला केलेल्या प्रवासाचा मार्ग हा त्या काळातील नैसर्गिक आणि व्यापारी मार्गांना अनुसरून आहे. विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे जाण्याचा त्यांचा मार्ग आजच्या आधुनिक ' राष्ट्रीय महामार्गाच्या ' किंवा रेल्वे मार्गांच्या साधारण समांतर जातो.
थोडक्यात सांगायचे तर नद्यांची नावे आणि भौगोलिक स्थळांची वर्णने १००% मूळ वाल्मिकी रामायणात आहेत; फक्त आपण आपल्या सोयीसाठी त्यांना आजच्या "राज्यांच्या" सीमांमध्ये विभागून पाहतो.
श्रीरामाच्या प्रवासाचा मार्ग. दीर्घ विश्लेषण
प्रभू श्रीरामांचा वनवास काळ हा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतच्या विशाल भूभागाला जोडणारा प्रवास आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेख आणि भौगोलिक स्थानांनुसार, हा प्रवास आजच्या भारतातील प्रमुख ६ ते ७ राज्यांमधून जातो.
या प्रवासाचे सविस्तर विवेचन खालीलप्रमाणे आहे:
१. उत्तर प्रदेश (प्रवासाची सुरुवात)
श्रीरामांचा जन्म आणि वनवासाची पहिली काही वर्षे या राज्यातून सुरू होतात.
अयोध्या
शरयू नदीच्या काठावर वसलेले शहर.
वनवासाला निघाल्यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सुमंत्राच्या रथातून अयोध्येतून निघाले. त्यांनी तमसा नदी पार केली.
२. मध्य प्रदेश
वनवासाचा सुरुवातीचा काळ आणि प्रवासाचा महत्त्वाचा भाग या राज्यातून जातो.
श्रृंगवेरपूर
यानंतर ते शृंगवेरपूर येथे पोहोचले, जिथे निषादराज गुहने त्यांना गंगा नदी पार करण्यास मदत केली.
प्रयागराज (त्रिवेणी संगम)
जेथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो. येथे त्यांनी भारद्वाज ऋषींची भेट घेतली होती.
२. मध्य प्रदेश
गंगा नदी पार करून ते प्रयागराज (आजचे अलाहाबाद) येथे पोहोचले, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो. येथे त्यांनी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केले.
भारद्वाज ऋषींच्या सल्ल्याने ते चित्रकूट पर्वताकडे निघाले. येथे त्यांनी काही काळ निवास केला.
चित्रकूट
हे ठिकाण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. येथे मंदाकिनी नदी वाहते. राम, लक्ष्मण आणि सीता येथे बराच काळ वास्तव्यास होते.
दंडकारण्य
चित्रकूटहून ते दंडकारण्याकडे निघाले. दंडकारण्य हे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पसरलेले एक विशाल आणि घनदाट जंगल होते.
या प्रवासात त्यांनी अनेक ऋषी-मुनींच्या आश्रमांना भेटी दिल्या. यामध्ये शिरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य यांसारख्या ऋषींचा समावेश होता. त्यांनी ऋषींकडून ज्ञान, उपदेश आणि आवश्यक शस्त्रे आणि अश्रे प्राप्त केली. या काळात त्यांनी राक्षसांचा संहार करून ऋषींना त्रासमुक्त केले.
३. छत्तीसगड
रामायणात छत्तीसगडला 'दक्षिण कोशल' म्हटले गेले आहे.
राम वनवासातील बराच काळ या भागातील घनदाट जंगलात (दंडकारण्य) फिरले. आजही छत्तीसगडमध्ये 'राम वनगमन पथ' नावाने पर्यटन मार्ग विकसित केला जात आहे.परंतू हा काळ त्यांच्या वाटचालीचा म्हणजेच प्रवासाचा होता.
४. महाराष्ट्र (पंचवटी आणि नाशिक)
प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाट्यमय टप्पा म्हणजे नाशिक.
दंडकारण्यातून प्रवास करत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पंचवटी येथे पोहोचले. आजचे नाशिक हेच पंचवटी मानले जाते.
येथे लक्ष्मणाने बांबू आणि इतर वनस्पतींपासून एक सुंदर कुटी (झोपडी) बांधली. पंचवटी हे ठिकाण पाच वटवृक्षांमुळे ओळखले जाते.
पंचवटी तेथे श्रीराम, लक्ष्मण व जानकी १३ वर्ष वास्तव्यास होते असे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नमूद आहे.
महत्त्वाच्या घटना
शूर्पणखेचे नाक कापले जाणे, खर-दूषण वध, सीतेचे अपहरण या घटना महत्त्वाच्या मानल्या जातात.
१३ वर्षे ते पंचवटी येथे राहिल्यावर रावणाने जानकीचे अपहरण केले. त्यानंतर जटायू वध, सुग्रीव, हनुमान भेट, बालीचा वध जानकीचा शोध, श्रीलंकेचा प्रवास, राम रावण युद्ध या घटना पुढील एक वर्षात घडल्या.
पंचवटीचे महत्त्व
पंचवटी हे ठिकाण रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखले जाते.
शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने येथेच कापले.
याच घटनेचा सूड घेण्यासाठी रावणाने मारीच राक्षसाच्या मदतीने सीतेचे हरण केले.
येथेच श्रीरामांची गिधाडराज जटायुशी भेट झाली होती, ज्याने सीतेचे हरण पाहिले होते आणि रावणाशी युद्ध केले होते.
थोडक्यात, श्रीरामांचा अयोध्या ते पंचवटी हा प्रवास वनवासाचा एक मोठा भाग होता, जो अनेक पवित्र स्थळे, ऋषींचे आश्रम आणि घनदाट जंगलातून झाला.
या प्रवासात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आणि अनेक महत्त्वाच्या घटना येथे घडल्या, ज्यामुळे पुढील रामायणाची कथा पुढे सरकली.
वाल्मिकी रामायणानुसार पंचवटी हे प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वनवासातील एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. दंडकारण्यात राहिल्यानंतर, अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद घेत आणि असुरांपासून त्यांचे संरक्षण करत.
पंचवटी येथील श्रीरामाचे वास्तव्य आणि इतिहासाच्या पाऊलखुणा
अगस्ती मुनींनीच त्यांना गोदावरी नदीच्या काठी असलेल्या पंचवटीत निवास करण्यास सांगितले.
सीतेचे हरण याच ठिकाणी झाले, त्यामुळे रामायणातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
अगस्ती ऋषींचा सल्ला
प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांनी अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून पंचवटीमध्ये वास्तव्य केले. अगस्ती मुनींनी श्रीरामांना त्यांची स्वतःच्या अग्निशाळेत निर्माण केलेली आयुधे आणि शस्त्रे भेट दिली, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे.
नैसर्गिक सौंदर्य
वाल्मिकी रामायणात पंचवटीचे रमणीय वर्णन आढळते. हे ठिकाण सुंदर आणि शांत होते, जे वनवासासाठी योग्य होते. येथे पाच वडांच्या झाडांचा समूह असल्याने या जागेला 'पंचवटी' असे नाव मिळाले असे मानले जाते.
रामकुंड
गोदावरी नदीच्या काठी असलेले हे पवित्र कुंड आहे. वनवासात प्रभू राम येथे स्नान करत असत अशी मान्यता आहे. येथेच दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
लक्ष्मण कुंड
रामकुंडाजवळच लक्ष्मण कुंड देखील आहे.
तापोवन
गोदावरी आणि कपिला नद्यांच्या संगमावर असलेले हे ठिकाण आहे. इथे अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत असत.
लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक याच ठिकाणी कापले होते.
थोडक्यात, वाल्मिकी रामायणानुसार, पंचवटी हे केवळ एक भौगोलिक स्थान नसून, प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे, ज्यात धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
शबरी
श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ल्याचे वाल्मिकी रामायणामध्ये आहे. ऋष्यमूक पर्वतावर असलेल्या मातंग ऋषीच्या आश्रमात शबरी राहत होती. शबरी ही भिल्ल होती.
ऋष्यमूक पर्वत हा कर्नाटक मधील हम्पी जवळील पंपा सरोवरा जवळ आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की कर्नाटकातील हम्पी जवळ भिल्ल समाजाचे कोणतेही लोक आजपावेतो राहत नाहीत. परंतु नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र भिल्ल समाज आजही विखुरलेला पाहायला मिळतो.
त्यामुळे शबरी ही कर्नाटक मधील हम्पी येथील नसून नाशिक जवळील दंडक अरण्यातील असली पाहिजे असे मानायला काहीच हरकत नाही.
-------------------------------------------------------------
सीता अपहरण
राम लक्ष्मण सीता हे नाशिक जवळील पंचवटी येथे वास्तव्यास असताना पंचवटी येथून रावणाने सीतेचे हरण केले. व लंकेला जात असताना टाकेद तालुका इगतपुरी येथे जटायू ने रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी प्रयत्न केला असे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लिहिले आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जवळील टाकेद
रावणाने जटायूची पंख कापल्यानंतर, जटायू जमिनीवर कोसळला आणि श्रीरामाची वाट पाहत राहिला.
जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधात त्या भागातून जात होते, तेव्हा त्यांना जटायूचा आवाज ऐकू आला. जटायूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून श्रीरामांनी त्याला विचारले की काय झाले ?
तेव्हा जटायूने श्रीरामांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. रावणाने सीतेला कसे पळवून नेले आणि त्याने रावणाशी कसे युद्ध केले, हे सर्व जटायूने सांगितले. जटायूने श्रीरामांना लंकेची दिशाही सांगितली.
जटायूने श्रीरामांच्या हातून पाणी मिळावे अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीरामांनी बाणाद्वारे भूगर्भातून पाणी काढले आणि ते पाणी जटायूला पाजले. पाणी प्यायल्यानंतर जटायूने श्रीरामांच्या मांडीवरच आपले प्राण सोडले.
श्रीरामांनी जटायूचे अंतिम संस्कार केले आणि त्याला मोक्ष दिला.
त्यामुळे टाकेद हे जटायू मोक्षस्थान म्हणून ओळखले जाते. आजही टाकेद येथे हे मोक्ष कुंड पहावयास मिळते. हा रामायणाचा पुरावाच नव्हे काय?
म्हणजेच जटायू किंवा तेथील स्थानिक लोकांना रावणाची चांगल्या प्रकारे ओळख असली पाहिजे. किंवा रावण कुठला आहे हेही माहीत असलं पाहिजे.
राम-लक्ष्मण जेव्हा सीतेचा शोध घेण्या साठी जात होते, तेव्हा सीतेला वाचवणाऱ्या जखमी जटायुने सीतेला रावणाने नेलं आहे. आणि रावण कुठे राहतो हे ठिकाण सांगितले होते. आणि त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधार्थ लंकेला निघाले.
हनुमानाचे जन्मस्थान
नाशिकमध्ये अंजनेरी (Anjaneri) हा पर्वत आहे, जो नाशिक-त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे.
अंजनेरी हे हनुमानजींचे जन्मस्थान मानले जाते, जिथे त्यांची आई अंजनी मातेने तपश्चर्या केली होती. याच कारणामुळे या किल्ल्याला 'अंजनेरी' हे नाव मिळाले आहे.
अंजनेरी पर्वताचे स्थान
हा पर्वत नाशिकपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आहे.
त्र्यंबकेश्वरपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर आहे.
या पर्वतावर अंजनी मातेचे मंदिर आणि हनुमानाचे बालरूप दाखवणारे मंदिर देखील आहे.
महत्त्वाचा निष्कर्ष
हनुमानजीचे जन्मस्थान जर नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर आहे तर नाशिक पासून दूर कर्नाटकातील हम्पी येथे असलेल्या किष्किंधा येथील सुग्रीवाकडे हनुमानजी कशासाठी गेले असावेत.?
हनुमानजीचे जन्मस्थान जर नाशिक येथील त्रिंबकेश्वर जवळील अंजनेरी येथे असेल तर किष्किंधा सुद्धा तेथेच आसपास कुठेतरी असली पाहिजे हा तार्किक मत आहे.
म्हणजेच इगतपुरी तालुक्यातील कुसेगावचा परिसर हाच किष्किंधा असला पाहिजे अशी शक्यता वाटते.
त्याचप्रमाणे अंजनेर, पंचवटी, टाकेद, ही ठिकाणे जर नाशिक जिल्ह्यातील असतील तर सीतेच्या शोधासाठी श्रीराम, लक्ष्मण प्रचंड दूर असलेल्या कर्नाटकातील हम्पी येथे असलेल्या किश्किंधेला कशासाठी जातील ?
परंतु दुसरा एक मतप्रवाह आहे जो की हम्पी जवळ असलेले अंजनेरी पर्वत हे देखील श्री हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.
शिवाय सुग्रीवाची किष्किंधा नगरी देखील हम्पीच्या आसपास मानले जाते.
त्यामुळे हनुमानाचे जन्मस्थान, जटायुवध आणि किष्किंधा नगरी ही स्थाने महाराष्ट्रातील नाशिक जवळील की कर्नाटकातील हम्पी जवळील याबाबत अनेक इतिहास तज्ञ आणि संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
पंचवटी आणि टाकेद ही दोनही स्थाने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अहेत आणि तिथून गुजरात जवळील बेट असलेले लंका हेही जवळ आहे. म्हणजेच रावणाची लंका ही गुजरात जवळील बेटावरच असली पाहिजे असाही इतिहास संशोधक आणि इतिहास तज्ञांचा मतप्रवाह आहे
-----------------------------------------------------------
कर्नाटक (किष्किंधा) राज्य
सीतेच्या शोधात प्रभू राम दक्षिणेकडे सरकले आणि आजच्या कर्नाटक राज्यात पोहोचले.
तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण वानरराज सुग्रीवाचे साम्राज्य होते.
महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये सुग्रीव याला त्याचा भाऊ बाली याने किष्किंधा येथून पळवून लावले होते. त्यामुळे सुग्रीव हा ऋष्यमूक या पर्वतावर राहत होता.
वाल्मिकी रामायणात किष्किंधा कांडाचे वर्णन
किष्किंधा कांड हे वाल्मिकी रामायणातील चौथे कांड आहे. हे कांड प्रामुख्याने श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीवर आणि त्यातून सीतेच्या शोधासाठी झालेल्या प्रयत्नांवर केंद्रित आहे.
या कांडातील प्रमुख घटना खालीलप्रमाणे आहेत:
राम आणि लक्ष्मणाचे ऋष्यमूक पर्वतावर आगमन
सीतेच्या विरहाने व्याकूळ झालेले राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत ऋष्यमूक पर्वताजवळ येतात. या पर्वतावर सुग्रीव आपल्या मंत्र्यांसोबत राहत असतो, कारण त्याला त्याचा भाऊ बालिपासून धोका असतो.
हनुमानाची राम-लक्ष्मणाशी भेट
सुग्रीवाला वाटते की बालिनेच या दोन वीरांना त्याला मारण्यासाठी पाठवले असावे. म्हणून तो हनुमानाला त्यांची माहिती घेण्यासाठी ब्राह्मण वेशात पाठवतो. हनुमान राम आणि लक्ष्मणाशी संवाद साधून त्यांची खरी ओळख पटवतो.
राम आणि सुग्रीव यांची मैत्री
हनुमानामुळे राम आणि सुग्रीव यांची भेट होते आणि त्यांच्यात मैत्री होते. सुग्रीव रामाला वचन देतो की तो सीतेला शोधण्यात मदत करेल.
बालिचा वध
सुग्रीव रामाला आपल्या दुःखद कथेबद्दल सांगतो. त्याचा मोठा भाऊ बालिने त्याला किष्किंधेच्या राज्याबाहेर काढले होते आणि त्याची पत्नीही हिसकावून घेतली होती. राम सुग्रीवाला बालिचा वध करून त्याला त्याचे राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतात.
त्यानंतर, राम बालिचा वध करतात आणि सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य मिळते, तसेच बालिचा पुत्र अंगदला युवराज बनवले जाते.
सुग्रीव
रामायणामध्ये सुग्रीवाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किष्किंधेचा वानरराज होता आणि त्याने श्रीरामांना त्यांची पत्नी सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप मदत केली.
वालीशी वैर आणि श्रीरामांची भेट
सुग्रीव हा त्याचा मोठा भाऊ वाली याच्यामुळे किष्किंधेतून हाकलून दिला गेला होता आणि वालीने त्याची पत्नी रुमा हिला आपल्या ताब्यात घेतले होते. याच काळात, सीतामाईच्या शोधात असलेले श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी त्याची भेट हनुमानामुळे झाली.
मैत्री आणि वचन
श्रीरामांनी सुग्रीवाला वालीला मारून त्याचे राज्य परत मिळवून देण्याचे वचन दिले. या बदल्यात सुग्रीवाने श्रीरामांना सीतामाईचा शोध घेण्यासाठी आणि तिला परत आणण्यासाठी मदत करण्याचे वचन दिले.
वाली (बाली) याचे व्यक्तिमत्त्व
वाली हा रामायणातील एक अत्यंत पराक्रमी, परंतु तितकाच गुंतागुंतीचा स्वभाव असलेला वानरराज होता. तो किष्किंधा राज्याचा राजा आणि सुग्रीवाचा मोठा भाऊ होता.
१. शारीरिक व युद्ध कौशल्य
वाली अत्यंत बलवान आणि अपराजित योद्धा होता.
त्याला अशी वरदान शक्ती होती की, जो त्याच्याशी लढेल त्याची अर्धी ताकद त्याच्यात येत असे
राक्षस, असुर यांच्यावर विजय मिळवण्यात तो प्रवीण होता.
त्याने मायावी राक्षसाचा वध करून आपली ताकद सिद्ध केली होती.
३. अहंकार आणि अन्याय
आपल्या शक्तीचा गर्व त्याला झाला.
त्याने आपल्या भावावर म्हणजेच सुग्रीवावर अन्याय केला. सुग्रीवाची पत्नी रुमा हिला स्वतःजवळ ठेवणे हे अधर्माचे कृत्य होते
येथे वालीचे व्यक्तिमत्त्व नकारात्मक बाजूकडे वळते.
५. श्रीरामाशी संघर्ष
वाली आणि सुग्रीव यांच्यात युद्ध चालू असताना श्रीराम झाडामागे लपून उभे होते.
योग्य क्षणी श्रीरामाने एक तीक्ष्ण बाण सोडला. तो बाण थेट वालीच्या छातीत लागला. त्यामुळे वाली जखमी होऊन खाली पडला. अशाप्रकारे सुग्रीवाच्या मदतीसाठी श्रीराम यांनी वालीचा वध केला.
वालीने जखमी अवस्थेत श्रीरामाला विचारले की, “समोरून न लढता मला लपून का मारले?”
श्रीरामांनी उत्तर दिले वालीने धर्माचे उल्लंघन केले. तु अधर्मी राजा झाला होता. म्हणून तुला शिक्षा देणे आवश्यक होते.
अधर्माशी लढाईची असेल तर केवळ धर्मांने लढून चालत नाही. हे खालील उदाहरणांनी समजून येते.
वालीने अधर्माने वागून त्याचा सख्खा भाऊ सुग्रीवाची पत्नी ताब्यात घेऊन सुग्रीवाला राज्याबाहेर घालवून दिले होते. शिवाय त्याला त्याच्या शौर्याचा गर्व झाला होता.
वाली हा अत्यंत शूर असल्यामुळे त्याला केवळ धर्माने वागून युद्ध करून पराभूत करणे कठीण होते. त्यासाठी श्रीरामाने झाडामागे लपून वालीच्या दिशेने बाण मारला.
दुसरे उदाहरण रावण हा सुद्धा शूर युद्ध होता. रावणाला मारणे हे सहजासहजी शक्य नव्हते. त्यामुळे केवळ धर्माने वागून किंवा युद्ध करून रावण सहजासहजी मारला गेला नसता.
बिभीषणाने रावणाचे मरण कशात आहे हे श्रीरामांना सांगितले. आणि त्या पद्धतीने बाण मारून रावणाला ठार मारले.
महाभारतात देखील ज्यावेळी अधर्माने कौरावांनी पांडवांकडून राज्य घेतले तेव्हा अशाच प्रकारे डावपेच करून कौरवांचा पराभव केला.
त्या काळात म्हणजेच इसवी सन पूर्व सातवे आणि सहाव्या शतकात नवीनच नवनवीन राज्य यांचा उदय होत होता. त्यासाठी सत्य,- असत्य, धर्म - अधर्म याला फार महत्त्व आले. आणि अनेक राजांनी धर्माने वागण्याची कास धरली.
मृत्यु आणि आत्मचिंतन
मृत्यूपूर्वी वालीने आपली चूक मान्य केली. त्याने आपल्या मुलाला अंगद रामांच्या स्वाधीन केले शेवटी तो धर्म समजून गेला.
वालीचा वध आणि राज्याभिषेक
श्रीरामांनी वालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले. यानंतर सुग्रीवाने आपले वचन पाळले.
सीतामाईचा शोध
राजा झाल्यावर सुग्रीवाने आपल्या वानरसेनेला सीतामाईचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना पाठवले. या शोधमोहिमेत हनुमानाने लंका गाठून सीतामाईचा ठावठिकाणा शोधला.
लंका युद्धात सहभाग
सीतामाई लंकेत आहे हे समजल्यावर, सुग्रीवाने आपल्या विशाल वानरसेनेसोबत श्रीरामांना लंका युद्धात सक्रिय सहभाग दिला. या युद्धात त्याने अनेक राक्षस योद्ध्यांना पराभूत केले आणि लंकेवर विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वचनबद्धता आणि निष्ठा
सुग्रीव हा श्रीरामांप्रती अत्यंत वचनबद्ध आणि निष्ठावान होता. त्याने श्रीरामांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आणि त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून उभा राहिला.
थोडक्यात, सुग्रीव हा केवळ एक वानरराज नव्हता, तर तो श्रीरामांचा एक महान मित्र, निष्ठावान सहकारी आणि सीतामाईच्या शोधातील व लंका विजयातील एक आधारस्तंभ होता.
अंगद
अंगद हा रामायणातील एक महत्त्वाचा आणि पराक्रमी वानर योद्धा होता. त्यांच्याबद्दल काही प्रमुख गोष्टी:
वालीचा पुत्र
अंगद हा किष्किंधेचा शक्तिशाली राजा वाली (किंवा बालि) आणि त्याची पत्नी तारा यांचा पुत्र होता.
सुग्रीवाचा पुतण्या
वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव हा अंगदचा काका (पुतण्या) होता.
किष्किंधेचा युवराज
वालीच्या मृत्यूनंतर, श्रीरामांनी सुग्रीवाला किष्किंधेचा राजा बनवले आणि अंगदाला युवराज (राजपुत्र) म्हणून घोषित केले.
बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धा
अंगद हा केवळ बलवानच नव्हता, तर तो अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी देखील होता. त्याला गुरु (बृहस्पति) चा आशीर्वाद प्राप्त होता आणि तो संभाषण कलेत निपुण होता.
श्रीरामांचा दूत
रामायणात, रावणाशी युद्ध सुरू करण्या पूर्वी श्रीरामांनी अंगदाला रावणाच्या दरबारात आपला दूत म्हणून पाठवले होते. रावणाला सीतेला सन्मानपूर्वक परत करण्याची शेवटची संधी देण्यासाठी ही शिष्टाई होती.
रावणाच्या दरबारात अंगदाने आपला पराक्रम आणि बुद्धिमत्ता दाखवली, जिथे त्याने आपला पाय इतका घट्ट रोवला की रावणासह कोणताही राक्षस त्याचा पाय हलू शकला नाही.
सीता शोधात महत्त्वाची भूमिका
सीता हरण झाल्यावर, श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी वानर सेना पाठवली होती. दक्षिण दिशेकडील सीता शोधाच्या चमूचे नेतृत्व अंगदनेच केले होते, ज्यात हनुमान आणि जांबुवंत सारखे महत्त्वाचे वीर होते.
युद्धात सहभाग
लंकेच्या युद्धात अंगदाने खूप पराक्रम गाजवला. त्याने रावणाच्या अनेक सेनापतींना आणि पुत्रांना (जसे की नरांतक) ठार केले.
थोडक्यात, अंगद हा केवळ वालीचा पुत्रच नव्हता, तर तो श्रीरामांच्या सैन्यातील एक महत्त्वाचा, पराक्रमी, बुद्धिमान आणि निष्ठावान योद्धा होता, ज्याने रामायणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.
सीतेच्या शोधासाठी वानरसेनेची तयारी
सुग्रीव राजा झाल्यावर, तो रामाच्या आज्ञेने सीतेचा शोध घेण्यासाठी वानरसेनेला सर्व दिशांना पाठवतो.
हनुमानाला बळ आठवून देणे
या शोधादरम्यान, सर्व वानर निराश होतात, पण जाम्बवंत हनुमानाला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देतात. हनुमान समुद्रावरून लंकेला जाण्यासाठी तयार होतो.
जांबवान – व्यक्तिचित्र (रामायण)
रामायणातील जांबवान (जांबवंत) हा वानरसेनेतील ज्येष्ठ, ज्ञानी आणि अनुभवी नेता मानला जातो. ते “ऋक्षराज” (अस्वलांचा राजा) म्हणून ओळखले जातात.
१. ओळख व उत्पत्ती
जांबवान हे अत्यंत प्राचीन आणि दीर्घायुषी पात्र आहे
काही कथांनुसार त्याची निर्मिती ब्रह्मा यांनी केली
ते अनेक युगांचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आणि ज्ञान होते.
जांबवान अत्यंत बुद्धिमान आणि संयमी होते.
युद्धातही ते विचारपूर्वक निर्णय घेत असत. वानरसेनेतील सर्वांत ज्येष्ठ व आदरणीय असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सर्वजण त्यांचा सल्ला मानत असत.
३. रामायणातील महत्त्वाची भूमिका
हनुमानाला प्रेरणा देणे
समुद्र ओलांडण्यापूर्वी हनुमान आपली शक्ती विसरला होता. जांबवानने त्याला त्याची शक्ती आठवून दिली. यामुळेच हनुमानाने लंकेत उडी मारली.
युद्धातील सहभाग
रावण विरुद्ध युद्धात सहभागी. रणनीती आणि सल्ला देण्यात महत्त्वाची भूमिका.
जांबवान हे रामायणातील “ज्ञान, संयम आणि मार्गदर्शन” यांचे प्रतीक आहे.
स्वतःपेक्षा इतरांना पुढे कसे आणावे. योग्य वेळी योग्य सल्ला किती महत्त्वाचा असतो म्हणूनच जांबवान हे " मार्गदर्शक” म्हणून ओळखले जातात.
थोडक्यात, किष्किंधा कांड हे मैत्री, वचनपूर्ती आणि सीतेच्या शोधासाठीच्या तयारीचे वर्णन करणारे एक महत्त्वाचे कांड आहे. या कांडाने रामायणातील पुढील घटनाक्रमासाठी, विशेषतः सुंदरकांड आणि युद्धकांडासाठी, मजबूत पाया घातला आहे.
पंपा सरोवर
हे क्षेत्रही याच परिसरात येते.
किष्किंधा ते रामेश्वर – रामायणातील महान प्रवास
हा प्रवास श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेनेने किष्किंधा येथून सुरू करून रामेश्वरम पर्यंत केलेला आहे..इथूनच सीतेच्या शोधासाठी वानरसेना पाठवली गेली.
------------------------------------------------------------
दक्षिणेकडे शोध मोहिम
वानरसेना अनेक गटांत विभागली गेली.
दक्षिणेकडे जाणाऱ्या गटात हनुमान,अंगद,जांबवान हे पराक्रमी वीर होते. त्यांनी दाट जंगल, पर्वत आणि नद्या पार केल्या.
दंडकारण्य व दक्षिण भारतातील प्रदेशा मध्ये दाट जंगल (दंडकारण्य) होते. काही ठिकाणी ऋषीमुनींचे विविध आश्रम, होते. अनेक पर्वत आणि वन्य प्रदेश पार करून पुढे जावे लागले.
या प्रदेशातून प्रवास करताना अनेक अडचणी, अन्न-पाण्याची कमतरता आणि अनिश्चितता होती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वानर सेनेला जटायूचा भाऊ जटायूचा भाऊ संपाती भेटतो. तो सांगतो की सीता लंकेत आहे. यामुळे मोहिमेला योग्य दिशा मिळते
महेंद्र पर्वत (समुद्र किनारा)
वानरसेना समुद्रकिनाऱ्यावर पोहोचते. पुढे विशाल समुद्र हे प्रवासाच्या दृष्टीने श्रीराम सेनेला सर्वात मोठे आव्हान असते.
परंतु श्रीराम सेनेचा सर्वात अनुभवी आणि वृद्ध असलेले जांभवान हनुमंताला आपल्या शक्तीची आठवण करून देतात. आणि श्री हनुमानाला लंकेत जाण्यासाठी प्रवृत्त करतात.येथे हनुमान समुद्र ओलांडण्याचा निर्णय घेतात.
श्री हनुमान श्रीलंकेत जाऊन सीतेचा शोध घेतात आणि परत ही बातमी सांगण्यासाठी श्रीरामाकडे येतात.
रामेश्वरमचे धार्मिक महत्त्व
रामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली. शिवपूजा करून लंकेच्या युद्धाची तयारी केली.
प्रवासाचा अंदाजे भौगोलिक विस्तार
किष्किंधा (कर्नाटक) → रामेश्वरम, धनुषकोडी (तामिळनाडू) अंदाजे अंतर: 1200–1500 किमी
धनुषकोडी (सेतू बांधणी)
येथूनच नळ आणि नील या वानरांच्या मदतीने 'रामसेतू'ची निर्मिती करण्यात आली, जो श्रीलंकेला जोडतो.
श्रीलंकेला जाण्याची मुख्य अडचण म्हणजे समुद्र पार करून जाणे. रामेश्वर ते श्रीलंका हे अंतर साधारण 48 किलोमीटर इतके आहे.
श्रीलंकेतील रामसेतू (Adam's Bridge) च्या भोवतालच्या भागात वैज्ञानिक संशोधन आणि कार्बन डेटिंग करण्यात आले आहे. या अभ्यासातून हा पूल साधारणपणे १८,४०० वर्षे जुना असावा, असे निष्कर्ष (उदा. चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाचे संशोधन) समोर आले आहेत. मात्र, हा पूल मानवनिर्मित की नैसर्गिक यावर विविध मते आहेत.
रामसेतूच्या वयाविषयीचे महत्त्वाचे मुद्दे
वैज्ञानिक अभ्यास: रामसेतू मन्नारच्या आखातात चुनखडीच्या बेटांची (Limestone Shoals) एक साखळी आहे, जी नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाली असावी, असे अनेक भूवैज्ञानिक मानतात.
कार्बन डेटिंग: काही अभ्यासांनुसार, हा भाग सुमारे १८,४०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. मन्नार बेटाच्या जवळच्या भागात झालेल्या संशोधनात तिथल्या चुनखडीच्या खडकांचे वय सुमारे १७,००० ते १८,००० वर्षे जुने असल्याचे आढळले आहे.
ऐतिहासिक मते: काहींच्या मते हा पूल १५ व्या शतकापर्यंत चालण्यायोग्य होता आणि तो रामायणातील पुलाशी निगडित आहे, असे मानले जाते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI): २००७ मध्ये भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, हा पूल रामाने बांधल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
थोडक्यात, रामसेतू ज्या नैसर्गिक चुनखडीच्या खडकांवर बनला आहे, त्याचे वय संशोधनात १८,००० वर्षांहून अधिक आढळले आहे.
या सर्व बाबींचे विवेचन केले असता एक लक्षात येते की रामसेतू मन्नारच्या आखातात चुनखडीच्या बेटांची (Limestone Shoals) एक उथळ साखळी आहे, जी पूर्वीच होती. परंतु तो भाग जाणे येण्यासाठी कदाचित योग्य नसेल. किंवा अडचणीचा सामना करावा लागत असेल.
त्यासाठी श्रीराम सेनेचे सैन्य लवकरात लवकर पोहोचण्यासाठी त्यामध्ये पूल दुरुस्ती करण्याची भर घातली असावी. आणि येणे जाण्यासाठी तो पूल मानवी पद्धतीने अधिक मजबूत बनवला असावा. यासाठी नळ आणि नील यांच्या नेतृत्वाखाली सेतू बांधला. जो श्रीलंकेला जोडतो.
-------------------------------------------------------------
रामायणकालीन श्रीलंका (लंका) – यथार्थ वर्णन
रामायणात वर्णन केलेली लंका ही रावण याची समृद्ध आणि अत्याधुनिक राजधानी होती. आजची श्रीलंका याच्याशी तिचा संबंध जोडला जातो. खालील मुद्द्यांवरून तिचे वास्तव स्वरूप समजते
सुवर्णनगरी लंका – वास्तुकला आणि नगररचना
लंका “सोन्याची नगरी” म्हणून वर्णिली आहे
भव्य राजवाडे, उंच किल्ले आणि सुंदर बागा
रस्ते, जलव्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था प्रगत होती
यावरून ती अत्यंत विकसित शहरी संस्कृती होती
भौगोलिक स्थान आणि समुद्री सामर्थ्य
लंका भारताच्या दक्षिणेला समुद्राने वेढलेली बेटराष्ट्र होती.
राम सेतु (आदम्स ब्रिज) हा भारत-लंका जोडणारा मार्ग मानला जातो
अर्थव्यवस्था आणि संपत्ती
लंका अत्यंत श्रीमंत आणि समृद्ध होती
सोने, रत्ने, मौल्यवान धातू विपुल प्रमाणात होते
व्यापार (विशेषतः समुद्री) प्रगत होता
ती त्या काळातील “आर्थिक महासत्ता” होती.
निसर्ग आणि जैवविविधता.
लंका हिरवळ, पर्वत, जंगल आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध होती.
हवामान उष्ण आणि आर्द्र
पर्यावरण समृद्ध आणि संतुलित होते
आजच्या श्रीलंकेत सिगिरिया – प्राचीन किल्ला आहे.
अनुराधापुरा – प्राचीन राजधानी
हे पुरातत्त्वीय स्थळे प्राचीन प्रगत संस्कृती दर्शवतात.
श्रीलंकेचे वर्णन करताना महर्षी वाल्मिकी यांनी अनेक प्रकारची अतर्किक काव्यरचना केली आहे. त्यामध्ये प्रकर्षाने मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीचा वापर केला आहे. हे नाकारून चालणार नाही.
परंतु ऐतिहासिक काव्य करताना काव्याला कुठेतरी गेय यावी व हे महाकाव्य अधिक सुरस आणि वाचनीय कसे होईल हेही महर्षी वाल्मिकी यांच्या विचाराधीन असेल. आणि म्हणूनच त्यांनी तशा प्रकारचे लेखन केले असावे जे तत्कालीन राज्यकर्ते, समाज, आणि वाचक यांना रुचेल आणि मान्य होईल.
पण रामायणातील लंकेचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे अद्याप निश्चित नाही.
दुसरा एक मुद्दा असा की, पूर्वी समुद्रामध्ये असलेल्या बेटाला लंका म्हणण्याची पद्धत होती. गुजरात जवळील समुद्रात अनेक बेटे आहेत.
गुजरातमधील द्वारकेजवळ बेट होतं ज्याला 'लंका' म्हटलं जायचं. हे बेट सध्याच्या गुजरातमधील द्वारकेजवळ होतं आणि हे 'बेट द्वारका' म्हणून ओळखलं जात होतं. पूर्वी हे बेट समुद्राने वेढलेले असल्यामुळे त्याला 'लंका' असं नाव मिळालं होतं. याचे कागदपत्रे पुरावे आजही सापडतात.
ऐतिहासिक संदर्भ
'लंका' या बेटाचा उल्लेख काही प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्यात आढळतो. हे बेट व्यापारी आणि नौदल हालचालींसाठी महत्त्वाचे केंद्र होते.
कच्छचं वाळवंट आणि अरबी समुद्राच्या सीमेवर असलेलं हे बेट, त्याकाळी एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं.
समुद्री व्यापार
या बंदराचा उपयोग व्यापारी जहाजांसाठी थांबा म्हणून केला जात होता, ज्यामुळे तेथील व्यापार आणि दळणवळण वाढले.
ऐतिहासिक महत्त्व
या बंदराचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो, ज्यामुळे त्यावेळच्या इतिहासाची माहिती मिळते.
भौगोलिक वैशिष्ट्ये
बेट समुद्राने वेढलेले असल्यामुळे त्याला 'लंका' असं संबोधलं जात होतं.
आज हे बेट मुख्य भूभागाशी जोडलेलं आहे आणि येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत.
म्हणजेच पूर्वीचे लंका हे नाव असलेल्या या बेटाचे पुढे द्वारका असे नामकरण करण्यात आले असावे. अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.
म्हणजेच पूर्वीची रावणाची लंका ही श्रीकृष्णाची द्वारका असू शकते. असेही काही इतिहासकार आणि तज्ञांचे मत आहे.
-----------------------------------------------------------रावण, कुंभकर्, मंदोदरी व मंदोदरी व्यक्तिचित्र
रावण व्यक्तिचित्र – सखोल विश्लेषण
रावण हा रामायणातील सर्वात प्रभावशाली, विद्वान आणि पराक्रमी पण तितकाच अहंकारी राक्षसराज होता. तो लंकेचा राजा आणि अनेक गुणांनी संपन्न व्यक्तिमत्त्व होता.
१. विद्वत्ता आणि ज्ञान
रावण अत्यंत विद्वान ब्राह्मण होता.त्याला चारही वेद आणि सहा शास्त्रांचे ज्ञान होते.तो ज्योतिष, आयुर्वेद आणि तंत्रविद्येत पारंगत होता.त्यामुळे त्याला “महापंडित” मानले जात असे.
२. शिवभक्त आणि कलावंत
रावण भगवान शिव यांचा महान भक्त होता. त्याने शिवतांडव स्तोत्र रचले. तो वीणा वादनातही निपुण होता.
त्याच्या व्यक्तिमत्त्वात आध्यात्मिकता आणि कला दोन्ही होत्या
३. पराक्रम आणि सत्ता
रावण अत्यंत शक्तिशाली योद्धा होता. त्याने देव, दानव आणि यक्ष यांवर विजय मिळवला. लंकेचे राज्य अत्यंत समृद्ध आणि सुव्यवस्थित होते.तो एक सक्षम आणि प्रभावी राजा होता
४. अहंकार आणि अधर्म
रावणाचा सर्वात मोठा दोष म्हणजे अहंकार.
त्याने केवळ अहंकाराने सीतामाईचे अपहरण केले. कारण तो सीता स्वयंवराच्या वेळी अत्यंत जड अशा शिव धनुष्याखाली चिरडला होता. त्याचा राग मनात असल्यामुळे त्याने सीतामाईचे अपहरण केले.
त्याने अनेक वेळा योग्य सल्ला (विभीषण, मंदोदरी) नाकारला. यामुळे त्याचा विनाश निश्चित झाला
५. कुटुंब आणि संबंध
त्याची पत्नी मंदोदरी अत्यंत बुद्धिमान आणि सती होती
भाऊ विभीषण धर्मनिष्ठ होता, पण रावणाने त्याला दूर केले.
भाऊ कुंभकर्ण बलवान पण साधा स्वभावाचा होता
कुटुंब असूनही रावणाने चुकीचे निर्णय घेतले.
६. श्रीरामाशी युद्ध
श्रीराम आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले. शेवटी श्रीरामांनी रावणाचा वध केला
हा धर्माचा अधर्मावर विजय मानला जातो
७. रावणाचे व्यक्तिमत्त्व – निष्कर्ष
महान विद्वान आणि शिवभक्त
पराक्रमी आणि सक्षम राजा
पण अहंकारी आणि अधर्मी
चुकीच्या निर्णयांमुळे पतन
रावण हा एक “गुण आणि दोष यांचा संगम” आहे.
त्याच्याकडे अपार ज्ञान आणि शक्ती होती, पण अहंकार आणि वासनेमुळे त्याचा नाश झाला.
कुंभकर्ण – सखोल व्यक्तिमत्त्व विश्लेषण
कुंभकर्ण हा रावण याचा भाऊ आणि रामायणातील एक अत्यंत वेगळा, प्रभावी आणि करुण व्यक्तिमत्त्व असलेला योद्धा होता.
कुंभकर्ण फक्त बलवान नव्हता, तर तो विवेकी आणि स्पष्टवक्ताही होता
त्याने रावणाला अनेकदा सांगितले की: “सीतेचे अपहरण चुकीचे आहे”
त्याने धर्म आणि अधर्म यातील फरक स्पष्ट ओळखला.
त्याला “निद्रासनाचा” आजार होता.
रामायणातील कथेनुसार, कुंभकर्णाला दीर्घकाळ झोपण्याचा एक अनोखा वरदान किंवा शाप होता, ज्यामुळे तो सहा महिने झोपायचा आणि फक्त एक दिवस जागा राहायचा.
आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून काही संशोधकांनी कुंभकर्णाच्या या झोपेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, त्याला Kleine-Levin Syndrome (KLS) किंवा Hypothalamic Syndrome सारखा दुर्मिळ झोपेचा विकार असू शकतो.
Kleine-Levin Syndrome (KLS) ची लक्षणे
या आजारात व्यक्तीला खूप दीर्घकाळ झोप येते.
जागे झाल्यावर प्रचंड भूक लागते.
असह्य राग किंवा मानसिक गोंधळ जाणवतो.
कुंभकर्णाच्या कथेत दिसणारी लक्षणे
जसे की दीर्घ झोप घेणे, फक्त भुकेमुळे जागे होणे आणि नंतर पुन्हा झोपेत जाणे - ही KLS च्या लक्षणांशी जुळतात असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
याचाच अर्थ त्या काळात सुद्धा Kleine-Levin Syndrome (KLS) हा आजार अस्तित्वात होता. याचा अर्थ कुंभकर्ण हा अस्तित्वात होता.
त्यामुळे तो शक्तिशाली असूनही नेहमी युद्धात सहभागी होऊ शकत नव्हता. परंतु ज्यावेळी त्यांनी युद्धात भाग घेतला तेव्हा युद्धात त्याने वानरसेनेचा मोठ्या प्रमाणावर नाश केला.तो रणांगणातील “महाविनाशक शक्ती” होता
त्याला माहिती होते की रावण चुकीचा आहे
तरीही त्याने आपल्या भावासाठी युद्धात भाग घेतला
“धर्म vs कुटुंब” या द्वंद्वात त्याने बंधुत्व निवडले
कुंभकर्णाचा वध श्रीराम यांनी केला
तो शेवटपर्यंत शूरपणे लढला
मृत्यूपर्यंत तो एक वीर आणि कर्तव्यनिष्ठ योद्धा राहिल
बलवान आणि पराक्रमी
विवेकी आणि सत्य जाणणारा
कुटुंबनिष्ठ आणि प्रामाणिक
पण चुकीच्या बाजूला उभा राहिल्यामुळे पतन झाले.
कुंभकर्ण हा रामायणातील एक (दुर्दैवी नायक)” आहे.
त्याला सत्य माहीत होते, पण कुटुंबनिष्ठेमुळे त्याने अधर्माच्या बाजूने लढा दिला.
विभीषण (बिभीषण) व्यक्तिचित्र – सखोल विश्लेषण
विभीषण हा रावण याचा भाऊ असून रामायणातील धर्मनिष्ठ, विवेकी आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो.
धर्मनिष्ठ आणि विवेकी स्वभाव
विभीषण हा राक्षसकुळात जन्मला असला तरी त्याचा स्वभाव सात्त्विक आणि शांत होता.
त्याला धर्म-अधर्म यातील स्पष्ट फरक कळत होता
तो नेहमी योग्य आणि न्याय्य गोष्टींचा आग्रह धरत असे
“परिस्थितीपेक्षा स्वभाव श्रेष्ठ” हे त्याच्यात दिसते
विभीषणाने रावणाला अनेक वेळा सांगितले: सीतेला परत करा, अन्यथा विनाश होईल. पण रावणाने त्याचा सल्ला नाकारला आणि त्याचा अपमान केला. शिवाय त्याला हाकलून दिले. त्यामुळे बिभीषण श्रीराम सेनेला येऊन मिळाले. येथे विभीषणाची दूरदृष्टी दिसून येते.
काहींना तो “विश्वासघात” वाटतो, पण तो धर्मासाठी घेतलेला योग्य निर्णय होता.
रामांनी त्याला स्वीकारले आणि संरक्षण दिले.
४. युद्धातील भूमिका
विभीषणाने रामांना लंकेबद्दल महत्त्वाची माहिती दिली
त्याने रावणाच्या शक्ती आणि कमजोरी श्रीरामांना सांगितल्या
युद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा होता
रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाला लंकेचा राजा बनवले गेले
त्याने न्याय आणि धर्माने राज्य केले
तो “आदर्श राजा” म्हणून ओळखला जातो
विभीषणाचे व्यक्तिमत्त्व – निष्कर्ष
धर्मनिष्ठ आणि सत्यप्रिय
बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेला
योग्य निर्णय घेणारा
पण काहींच्या दृष्टीने “भावाचा विश्वासघात करणारा”
विभीषण हा एक “धर्मासाठी कुटुंबाचा विरोध करणारा आदर्श व्यक्ती” आहे.
त्याने दाखवून दिले की सत्य आणि धर्म सर्वात मोठे असतात.
मंदोदरी व्यक्तिचित्र – सखोल विश्लेषण
मंदोदरी ही रावण याची पत्नी आणि लंकेची राणी होती. ती रामायणातील अत्यंत सुज्ञ, पतिव्रता आणि धर्मनिष्ठ स्त्री म्हणून ओळखली जाते.
मंदोदरी अत्यंत शहाणी आणि विचारशील होती
तिला राजकारण, धर्म आणि नैतिकता यांचे चांगले ज्ञान होते
तिने रावणाला अनेक वेळा योग्य सल्ला दिला. ती “सुज्ञ राणी” म्हणून ओळखली जाते
मंदोदरीने रावणाला स्पष्ट सांगितले: “सीतेला परत करा, अन्यथा विनाश होईल” पण रावणाने तिचा सल्ला ऐकला नाही. तिची दूरदृष्टी खरी ठरली.
मंदोदरी एक आदर्श पत्नी होती. रावण चुकीचा आहे हे माहिती असूनही तिने त्याचा त्याग केला नाही. तिने आपल्या कुटुंब आणि राज्यासाठी कर्तव्य निभावले. रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरी खूप दुःखी झाली. तिच्या विलापातून तिचे प्रेम आणि दुःख दिसून येते. तिच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि भावना भरपूर होत्य
ती फक्त राणी नव्हती, तर राज्यकारभारातही सहभागी होती. तिच्या सल्ल्यामुळे लंकेतील अनेक निर्णय योग्य घेतले जात.
मंदोदरीचे व्यक्तिमत्त्व
मंदोदरी ही लंकेचा राजा रावणाची पत्नी होती. ती असुर राजा मायासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती.
मंदोदरीला रामायणात एक सुंदर, धार्मिक आणि नीतिमान स्त्री म्हणून वर्णन केले आहे. तिला पंचकन्यांपैकी एक मानले जाते, ज्यांच्या नावाचे पठण केल्याने पाप दूर होते असे मानले जाते.
रावणाने सीतेचे हरण केल्यावर मंदोदरीने रावणाला अनेकदा सीतेला परत पाठवण्याचा आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला, परंतु रावणाने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.
मंदोदरी आणि रावणाला मेघनाद (इंद्रजित), अतिकाया आणि अक्षयकुमार हे तीन पुत्र होते.
पौराणिक कथेनुसार, मंदोदरीचे वडील मायासुर हे त्रिपुरा नावाच्या तीन शहरांचे शासक होते, जे त्यांनी स्वतः आपल्या स्थापत्यकलेने निर्माण केले होते. हे शहर इतके भव्य आणि शक्तिशाली होते की देवतांनाही त्याची भीती वाटत होती.
याव्यतिरिक्त, मायासुर हे मेरठ (आजचे मेरठ शहर, उत्तर प्रदेश, भारत) या प्राचीन "माया राष्ट्र" चे शासक मानले जातात, जिथे मंदोदरीचा जन्म झाला असे म्हटले जाते.
रावणाची सासरवाडी जर मेरठ असेल म्हणजेच आजचा उत्तर प्रदेश. त्यावेळेस प्रवासाची कोणती वाहने उपलब्ध नव्हती. तर मग मंदोदरीचे वडील मयासूर यांनी त्यांची मुलगी अत्यंत दूर असलेल्या श्रीलंके मध्ये कशी दिली असेल?
हाही एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचा अर्थ रावणाची लंका तिथल्याच जवळपास असलेल्या प्रदेशात असू शकते. असे अनेक इतिहासकार आणि संशोधकांचे म्हणणे आहे.
कारण भारतामध्ये एकाच नावाची अनेक गावे आणि शहरे आपणास पहावयास मिळतात. त्याचप्रमाणे श्रीलंका नावाची दोन नगरे असू शकतात.
मंदोदरी ही एक “सत्य जाणणारी पण परिस्थितीसमोर असहाय असलेली आदर्श स्त्री” आहे. तिने दाखवून दिले की ज्ञान आणि सद्गुण असूनही, चुकीच्या निर्णयामुळे विनाश टाळता येत नाही.
बुद्धिमान आणि दूरदर्शी,पतिव्रता आणि कर्तव्यनिष्ठ करुणामय आणि संवेदनशील असलेल्या मंदोदरीने रावणाला योग्य सल्ला दिला तरी तो त्याला मान्य झाला नाही. याचे पर्यावसन विनशामध्ये झाले.
इंद्रजीत (मेघनाद) व्यक्तिचित्र – सखोल विश्लेषण
इंद्रजीत (मेघनाद) हा रावण याचा पराक्रमी पुत्र आणि लंकेतील सर्वात शक्तिशाली योद्धा मानला जातो.
त्याचे मूळ नाव मेघनाद
त्याने इंद्र देवाला पराभूत केले म्हणून त्याला “इंद्रजीत” (इंद्राला जिंकणारा) हे नाव मिळाले. होते.
युद्धकौशल्य आणि शक्ती
इंद्रजीत अत्यंत कुशल आणि मायावी योद्धा होता
त्याला अदृश्य होऊन लढण्याची कला किंवा युद्धतंत्र अवगत होते.
त्याने ब्रह्मास्त्रासारख्या दिव्य अस्त्रांचा वापर केला
राम-लक्ष्मणाशी युद्ध
त्याने युद्धात लक्ष्मण आणि रामांना अनेक वेळा अडचणीत आणले. त्याने नागपाश वापरून त्यांना बांधले. युद्धातील विशिष्ट तंत्र वापरून अदृश्य जागी जाऊन लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव केला आणि लक्ष्मणाला घायाळ केले.
शेवटी लक्ष्मणाने त्याचा वध केला. हा युद्धातील एक निर्णायक टप्पा होता
इंद्रजीत आपल्या वडिलांप्रती अत्यंत निष्ठावान होता.
त्याला रावण चुकीचा आहे हे कळत असले तरी तो त्याच्या बाजूने लढला. “कर्तव्य vs धर्म” यातील संघर्ष त्याच्यात दिसतो.
अत्यंत पराक्रमी आणि कुशल योद्धा, तपस्वी आणि शक्तिशाली कुटुंबनिष्ठ, पण अधर्माच्या बाजूने उभा राहिला.
इंद्रजीत हा एक “पराक्रम आणि मायाशक्ती यांचा संगम” आहे.
त्याच्याकडे अपार शक्ती होती, पण चुकीच्या बाजूला उभा राहिल्यामुळे त्याचा पराभव झाला.
इंद्रजीत आणि लक्ष्मण यांचे ज्यावेळी युद्ध झाले त्यावेळी इंद्रजीताने आकाशात जाऊन ढगांच्या आडून लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव केला असे म्हटले आहे.
परंतु युद्धाच्या एका तंत्रानुसार इंद्रजीताच्या सैन्याने तेथे प्रचंड मोठा धूर करून धुराचे लोट आकाशात भिडल्यावर त्या धुरांच्या लोटांच्या आडून लक्ष्मणावर बाणांचा वर्षाव केला असावा.
-----------------------------------------------------------
सुशेन व्यक्तिचित्र आणि तत्कालीन भारतीय आयुर्वेद सखोल माहिती.
सुशेन हा रामायणातील एक अत्यंत महत्त्वाचा पण तुलनेने कमी चर्चेत असलेला पात्र आहे. तो वानरवैद्य (वैद्यराज) म्हणून ओळखला जातो.
ओळख आणि भूमिका
सुशेन हा वानरसेनेतील प्रमुख वैद्य होता. तो हनुमान आणि सुग्रीव यांचा विश्वासू सहकारी होता. युद्धात जखमी झालेल्या योद्ध्यांना उपचार देणे हे त्याचे मुख्य काम होते.
वैद्यकशास्त्रातील प्राविण्य
सुशेनाला औषधी वनस्पतींचे अत्यंत सखोल ज्ञान होते
तो जखम, विष आणि गंभीर अवस्थांवर उपचार करण्यात निपुण होता
त्यामुळे तो युद्धातील “जीवनदाता” मानला जातो
संजीवनी प्रसंग (महत्त्वपूर्ण घटना)
युद्धात लक्ष्मण बाण लागून मूर्च्छित झाले.
तेव्हा सुशेनाने सांगितले: “ संजीवनी बूटी आणली तर लक्ष्मण वाचतील” मग हनुमान संजीवनी बुटी घेऊन आले. या प्रसंगामुळे सुशेनाचे महत्त्व अत्यंत वाढते. सुशेन यांचा शांत आणि कर्तव्यनिष्ठ स्वभाव होता. सुशेन युद्धात थेट लढत नव्हता, पण त्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. तो शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ होता.
सुशेनाचे व्यक्तिमत्त्व – निष्कर्ष
कुशल वैद्य आणि ज्ञानी
शांत आणि संयमी
कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी
युद्धात अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाची भूमिका
सुशेन हा रामायणातील “जीवन वाचवणारा आयुर्वेदाचार्य आहे.
तो दाखवतो की युद्ध जिंकण्यासाठी फक्त शस्त्र नाही, तर ज्ञान आणि सेवा देखील तितकीच महत्त्वाची असते.
तत्कालीन भारतीय वनस्पतीशास्त्र – सखोल विवेचन
रामायण–महाभारत काळातील भारतात वनस्पतीशास्त्र (Botany) अत्यंत विकसित आणि व्यवहाराधारित होते. सुशेन सारख्या वैद्यांच्या ज्ञानावरून हे स्पष्ट होते की त्या काळात वनस्पतींचे वर्गीकरण, उपयोग, संवर्धन आणि औषधी गुणधर्म यांचे सखोल ज्ञान अस्तित्वात होते.
वनस्पतीशास्त्राचा पाया
भारतीय परंपरेत वनस्पतीशास्त्र हे आयुर्वेद आणि निसर्गशास्त्राशी जोडलेले होते.
मुख्य वैशिष्ट्ये:
वनस्पतींना जीवंत सजीव मानले जात असे
वर्गीकरण प्रणाली (Classification)
प्राचीन ग्रंथांमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण केले गेले होते.
औषधी – जसे संजीवनी, अश्वगंधा
फलदायी – जसे फळझाडे
वृक्ष – जसे वड, पिंपळ आणि तत्सम
लता – वेलवर्गीय वनस्पती
कंदमुळे
हे वर्गीकरण आजच्या वैज्ञानिक वर्गीकरणाशी साधर्म्य दाखवते.
त्यावेळी औषधी वनस्पतींचे ज्ञान आणि हजारो वनस्पतींचे औषधी गुणधर्म माहित होते.
रामायणामध्ये संजीवनी बूटी सारख्या जीवनदायी वनस्पतींचा उल्लेख आढळतो.
ताप, जखम, विषबाधा, हाडे इ. उपचारांसाठी विशिष्ट वनस्पती वापरल्या जात.
भौगोलिक वितरण आणि पर्यावरण
कोणती वनस्पती कुठे आढळते याचे ज्ञान होते.
हिमालय → दुर्मिळ औषधी
जंगल → दुर्मिळ तसेच सामान्य औषधी.
म्हणजेच आयुर्वेदाचे ज्ञान अस्तित्वात होते.
कृषी आणि वनस्पती संवर्धन
शेतीत विविध पिकांचे ज्ञान
ऋतूनुसार लागवड आणि कापणी
नैसर्गिक खतांचा वापर
“सस्टेनेबल अॅग्रीकल्चर”ची संकल्पना त्या काळात होती
वैज्ञानिक दृष्टिकोन
प्राचीन भारतात पुढे काही ग्रंथांमध्ये वनस्पतीशास्त्र अधिक विकसित झाले:
चरक संहिता – औषधी वनस्पतींचे वर्णन
सुश्रुत संहिता – औषधोपचारातील उपयोग
प्रयोग, निरीक्षण आणि अनुभव यावर आधारित ज्ञान
नैतिकता आणि संवर्धन
निसर्गाचा आदर करण्याची परंपरा.
औषधी वनस्पती तोडताना नियम पाळले जात असत.
रामायणकालीन भारतात वनस्पतीशास्त्र हे केवळ झाडांची माहिती नव्हते, तर मानव–निसर्ग–आरोग्य यांचा समन्वय साधणारे समग्र विज्ञान होते.
त्या काळातील भारतीय वनस्पतीशास्त्र:
आयुर्वेदाशी जोडलेले व अत्यंत प्रगत आणि उपयोगी तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत होते. त्यामुळे भारताला प्राचीन वनस्पतीशास्त्राचा अग्रदूत मानले जाते.
रामायण हे केवळ राम रावण युद्ध नव्हते तर तत्कालीन राज्य आणि राज्यकारभार, तत्कालीन समाज व्यवस्था, धर्म आणि अधर्म, वैद्यकशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र प्रेम, आपुलकी, परोपकार, मदतीची भावना, राजाचे प्रजेशी असलेले नाते याचे महर्षी वाल्मिकी यांनी सविस्तर वर्णन केले आहे. यावरून तत्कालीन समाज जीवनाची प्रचिती येते.
म्हणूनच रामायण हे हडप्पा संस्कृतीनंतर घडले असावे असा निष्कर्ष काढता येतो. हडप्पा संस्कृती नंतरचा काळ भारतीय उत्कर्षाचा काळ म्हणून ओळखला जातो.
-------------------------------------------------------------
रामायणकालीन श्रीलंका (लंका) – यथार्थ वर्णन
रामायणात वर्णन केलेली लंका ही रावण याची समृद्ध आणि अत्याधुनिक राजधानी होती. आजची श्रीलंका याच्याशी तिचा संबंध जोडला जातो. खालील मुद्द्यांवरून तिचे वास्तव स्वरूप समजते
सुवर्णनगरी लंका – वास्तुकला आणि नगररचना
लंका “सोन्याची नगरी” म्हणून वर्णिली आहे
भव्य राजवाडे, उंच किल्ले आणि सुंदर बागा
रस्ते, जलव्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था प्रगत होती
यावरून ती अत्यंत विकसित शहरी संस्कृती होती
भौगोलिक स्थान आणि समुद्री सामर्थ्य
लंका भारताच्या दक्षिणेला समुद्राने वेढलेली बेटराष्ट्र होती.
राम सेतु (आदम्स ब्रिज) हा भारत-लंका जोडणारा मार्ग मानला जातो
अर्थव्यवस्था आणि संपत्ती
लंका अत्यंत श्रीमंत आणि समृद्ध होती
सोने, रत्ने, मौल्यवान धातू विपुल प्रमाणात होते
व्यापार (विशेषतः समुद्री) प्रगत होता
ती त्या काळातील “आर्थिक महासत्ता” होती.
निसर्ग आणि जैवविविधता.
लंका हिरवळ, पर्वत, जंगल आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध होती.
हवामान उष्ण आणि आर्द्र
पर्यावरण समृद्ध आणि संतुलित होते
आजच्या श्रीलंकेत सिगिरिया – प्राचीन किल्ला आहे.
अनुराधापुरा – प्राचीन राजधानी
हे पुरातत्त्वीय स्थळे प्राचीन प्रगत संस्कृती दर्शवतात.
पण रामायणातील लंकेचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे अद्याप निश्चित नाही.
------------------------------------------------------------
वाल्मीकी रामायणातील अतिशयोक्ती
वाल्मीकी रामायण हे एक महाकाव्य असून, त्यात कवीने विविध अलंकारांचा आणि साहित्यिक तंत्रांचा वापर केला आहे, ज्यात अतिशयोक्ती (Hyperbole) हा एक महत्त्वाचा भाग आहे. अतिशयोक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचे वर्णन इतके वाढवून सांगणे की ती अशक्य किंवा अविश्वसनीय वाटावी, परंतु तिचा उद्देश कथेतील घटनांचे महत्त्व, पात्रांचे सामर्थ्य किंवा भावनिक तीव्रतेवर भर देणे हा असतो.
रामायणात अतिशयोक्तीची अनेक उदाहरणे आढळतात. येथे काही प्रमुख उदाहरणे दिली आहेत:
हनुमानाचे सामर्थ्य
हनुमानाचे सामर्थ्य आणि पराक्रम वर्णन करताना अनेक ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर केला आहे.
समुद्र लंघन
हनुमानाने एका झेपेत शंभर योजनांचा (सुमारे ८०० मैल) विशाल समुद्र ओलांडला. हे वाचताना अविश्वसनीय वाटत असले तरी, ते हनुमानाची प्रचंड शक्ती आणि दृढनिश्चय दर्शवते.
संजीवनी पर्वत उचलणे
लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमान संपूर्ण संजीवनी पर्वतच उचलून आणतो. हे देखील त्यांच्या अफाट सामर्थ्याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे, जे त्यांच्या भक्ती आणि कर्तव्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवते.
लंका दहन
हनुमानाने आपल्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली, असे वर्णन आहे. जरी एका व्यक्तीने पूर्ण शहर जाळणे शक्य नसले तरी, हे रावणाच्या साम्राज्याला हनुमानाने पोहोचवलेले मोठे नुकसान आणि त्याची प्रचंड शक्ती अधोरेखित करते.
युद्धाचे वर्णन
रामायण युद्धात अनेक प्रसंगी अतिशयोक्तीचा वापर केला आहे, ज्यामुळे युद्धाची भीषणता आणि योद्ध्यांचा पराक्रम अधिक प्रभावीपणे समोर येतो.
बाणांचा वर्षाव
युद्धात एकाच वेळी हजारो बाणांचा वर्षाव झाल्याचे वर्णन असते, ज्यामुळे आकाश अंधारून जाते किंवा बाणांचे ढिगारे साचतात. हे युद्धाची तीव्रता आणि प्रचंड मनुष्यबळाचे प्रतीक आहे.
राक्षसांचे विशाल रूप
काही राक्षसांचे वर्णन इतके विशाल आणि भयानक केले आहे की ते पर्वत किंवा ढगांसारखे दिसतात. हे त्यांच्या ताकदीवर आणि भीतिदायक स्वरूपावर भर देते.
दुःख आणि भावनांची तीव्रता
पात्रांच्या भावनांची, विशेषतः दुःखाची किंवा क्रोधाची तीव्रता दर्शवण्यासाठी अतिशयोक्तीचा वापर केला जातो.
सीतेचा विरह
रामाचा सीतेच्या विरहातील शोक इतका तीव्र होता की जणू पृथ्वी आणि आकाशही त्याच्या दुःखात सहभागी झाले होते. हे रामाच्या सीतेवरील असीम प्रेमाची खोली दर्शवते.
अतिशयोक्तीचा उद्देश
रामायणातील अतिशयोक्तीचा मुख्य उद्देश केवळ वाचकांना आश्चर्यचकित करणे हा नाही, तर कथेतील नैतिकता, शौर्य, भक्ती आणि धर्म या मूल्यांना अधिक प्रभावीपणे मांडणे हा आहे. यामुळे पात्रांची भव्यता आणि अलौकिक शक्ती दर्शवली जाते, ज्यामुळे त्यांना आदर्श म्हणून पाहिले जाते आणि त्यांची कृत्ये चिरस्मरणीय बनतात.
विश्लेषण
वरील सर्व बाबींचे विवेचन केले असता रामायण हे खरंच घडले आहे हे सिद्ध होते. मूळ वाल्मिकीने जे रामायण लिहिले ते रामायण घडून गेल्यानंतर अनेक शतकानंतर ऐकीव माहितीच्या आधारे लिहिले असावे.
इसवी सन पूर्व आठव्या शतकानंतर मौर्यकालीन राजे, गुप्तकालीन राजे यांच्या काळात कालिदासांसारखे अनेक कवी नावारूपाला आले. त्या काळात भारतामध्ये विविध प्रदेशांमध्ये अनेक राजेशाह्या अस्तित्वात आल्या. त्यांची छोटी मोठी राज्य होती.
त्या काळात तेथील प्रादेशिक कवींनी मूळ त्यांच्या प्रदेशातील चालीरीती, कथा, वाल्मिकीनी लिहिलेल्या मूळ रामायणामध्ये घुसडल्या गेल्या. त्यामुळे आता आपण जे रामायण वाचतो त्यामध्ये अनेक काल्पनिक व आतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी नमूद आहेत.
मूळ वाल्मीकी रामायणामध्ये सीतेच्या स्वयंवरापासून ते लंकेच्या रावणाला मारून व वनवासाचा शेवट करून श्रीराम अयोध्येला परत येतात व राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतात. एवढेच वाल्मिकी रामायणामध्ये लिहिले आहे.
परंतु आपण आज जे रामायण वाचतो त्यामध्ये बालकांड आणि उत्तरकांड याचा प्रभावी वापर केला आहे जे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही.
वाल्मिकी रामायणामध्ये श्रीराम हे महाविष्णूचा अवतार असल्याचे ऋषीमुनींनी नमूद केले आहे. कारण भारताला ऋषीमुनींची फार मोठी परंपरा लाभलेली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
त्यामुळे रामायणात उल्लेख केलेल्या सर्व ऋषीमुनींनी श्रीरामाचा आदरपूर्वक सन्मान केलेला आहे. व वेगवेगळ्या स्वरूपात मदत देखील केली आहे.
श्रीराम हा जर सर्वसाधारण माणूस असता तर वनवासासाठी इतक्या दूर आलेल्या माणसाला इतक्या ऋषीमुनींनी इतका मानसन्मान दिला नसता.
अनेक ऋषीमुनी हे त्यावेळी अरण्यात राहत असत व ज्ञानार्जनाचे कार्य करत असत. त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे अचूक ज्ञान होते. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते.
नैसर्गिक शक्ती आपल्याला पुढील घडणाऱ्या घटनांची जाणीव करून देतात. म्हणजेच निसर्गात एक प्रकारची अज्ञात शक्ती कार्यरत आहे याची आपल्याला प्रचिती येते. परंतु आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राहतो.
-------------------------------------------------------------
रामायण घडल्याचे पुरावे
रामायण हे आज पासून 2800 वर्षापूर्वी घडले आहे. ज्यावेळेस रामायण घडले त्यावेळेस मंदिरे बांधण्याची कला विकसित झाली नव्हती.
आज जी मंदिरे आहेत त्यांची संकल्पना इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सुरू होते. आणि रामायण इसवी सन पूर्व आठव्या शतकात घडले होते. त्यामुळे मंदिरे, शिलालेख इत्यादी मिळणे कठीण आहे.
श्रीरामाच्या वनवासाच्या काळात ते पंचवटी या ठिकाणी अरण्यामध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर राहत होते. ते झाडांपासून बनवलेल्या पर्णकुटी मध्ये राहत होते.
त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य जवळजवळ तेरा वर्षे होते. ते वनवासात पर्णकुटी मध्ये राहत होते. त्यामुळे ते राहत असल्याच्या पाऊलखुणांचा पुरावा इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राहू शकत नाही.
परंतु पंचवटी येथील रामकुंड, लक्ष्मण कुंड ज्या ठिकाणी राम, लक्ष्मण स्नान करीत असत. ती ठिकाणे आजही पंचवटी जवळ आहेत.
ज्या ठिकाणी रावण आणि जटायूंचे युद्ध झाले. आणि रावणाने जटायूचे पंख कापून रक्तबंबाळ केले. त्या ठिकाणी जटायूला पाणी पाजण्यासाठी श्रीरामाने जमिनीत बाण मारून पाणी काढले व जटायूला पाजले. ते कुंड अजूनही टाकेद जि. नाशिक येथे पाहायला मिळते.
हनुमानाचा जन्म झालेले अंजनेर हे ठिकाणही नाशिक येथे आहे. मूळ वाल्मिकी रामायणा मध्ये वर्णन केल्या प्रमाणे हे ठिकाण तंतोतंत असल्याची खात्री पटते.
अयोध्येतील रामजन्मभूमी ठिकाणी पुरातत्व खात्याला (Archaeological Survey of India - ASI) उत्खननादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, जे येथे पूर्वी एक मोठे हिंदू मंदिर होते या दाव्याला पुष्टी देतात.
विष्णू-हरी शिलालेख
बाबरी मशीदीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला एक संस्कृत शिलालेख हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या शिलालेखात बालीचा वध करणारा आणि दहा तोंडांचा (रावण) वध करणारा विष्णू' यांना समर्पित असलेल्या मंदिराचा उल्लेख आहे,
ज्याचा अर्थ प्रभू राम असा लावला जातो. अनेक इतिहासकारांनी या शिलालेखाची सत्यता आणि पूर्वी मंदिराचे अस्तित्व असल्याचे समर्थन केले आहे.
खांबांचे अवशेष आणि पाया
उत्खननात 12 व्या शतकातील एका मोठ्या मंदिराच्या रचनेचे संकेत देणारे 50 हून अधिक खांब सापडले आहेत. बाबरी मशीद ज्या ठिकाणी होती, तेथे मंदिराचे खांब वापरले गेले होते, असेही काही पुराव्यांवरून दिसून आले आहे. या खांबांवर हिंदू देवतांची चित्रे आणि नक्षीकाम होते.
टेराकोटा मूर्ती आणि वास्तू अवशेष
उत्खननादरम्यान 263 टेराकोटा मूर्ती सापडल्या आहेत, ज्यात देवता, मानवी आकृत्या आणि प्राणी यांचा समावेश आहे. हे अवशेष प्राचीन हिंदू मंदिरांच्या कलाशैलीशी सुसंगत आहेत.
तसेच, मंदिराच्या छताचे आणि शिखराचे काही अवशेषही सापडले आहेत, ज्यामुळे येथे पूर्वी एक हिंदू मंदिर होते या सिद्धांताला बळकटी मिळते.
पुरातन वसाहतीचे पुरावे
उत्खननात असेही दिसून आले आहे की, या ठिकाणी इसवी सन पूर्व 9 व्या शतकापासून वसाहत होती, म्हणजेच सुमारे 3000 वर्षांपासून येथे मानवी वस्ती होती.
मंदिरासारखी रचना
ASI च्या अहवालानुसार, उत्खननात मिळालेले पुरावे हे स्पष्टपणे मशीदीपेक्षा वेगळ्या, मोठ्या इमारतीचे संकेत देतात आणि त्यात खांबांचे पाय नक्षीदार विटा आणि कोरीव वास्तुशिल्पाचे तुकडे' सापडले आहेत, जे मंदिराच्या अस्तित्वाकडे निर्देश करतात.
या पुराव्यांवरून पुरातत्व खात्याने (ASI) असा निष्कर्ष काढला आहे की, वादग्रस्त जागेवर बाबरी मशीद बांधण्यापूर्वी एक मोठी हिंदू वास्तू, कदाचित एक मंदिर, अस्तित्वात होते.
------------------------------------------------------------
रामायण काळातील शस्त्रे आणि अस्त्रे
रामायण काळात अनेक प्रकारची शस्त्रे आणि अस्त्रे वापरली जात होती. ही शस्त्रे केवळ सर्वसामान्य नसून, मंत्रशक्तीने प्रेरित केलेली "अस्त्रे" देखील होती, ज्यांना देवांचे सामर्थ्य प्राप्त होते.
प्रमुख शस्त्रे
धनुष्यबाण
रामायणातील सर्वात प्रमुख शस्त्र. श्रीराम स्वतः 'कोदंड' नावाचे धनुष्य वापरत होते. हे बांबूपासून बनलेले असले तरी अत्यंत प्रभावी होते.
गदा
रामायण आणि महाभारतातही गदेचा उल्लेख आढळतो. हनुमान गदा वापरण्यासाठी प्रसिद्ध होते.
तलवार
विविध प्रकारच्या तलवारी वापरल्या जात असत. रावणाकडे 'चंद्रहास' नावाची शिवशंकरांनी दिलेली दिव्य तलवार होती.
त्रिशूळ
भगवान शंकराचे शस्त्र, जे काही प्रसंगी इतर देवांनी किंवा राक्षसांनीही वापरले.
भाला/शूळ
लढाईत वापरले जाणारे आणखी एक सामान्य शस्त्र.
चक्र
विष्णूचे सुदर्शन चक्र हे एक अत्यंत शक्तिशाली अस्त्र होते.
प्रमुख अस्त्रे
अस्त्रे ही मंत्रांनी सक्रिय केली जाणारी किंवा विशिष्ट देवतांच्या शक्तीने युक्त असलेली शस्त्रे होती. त्यांचे परिणाम अत्यंत विनाशकारी असू शकत होते.
ब्रह्मास्त्र
हे ब्रह्मदेवाचे अस्त्र होते आणि ते अत्यंत शक्तिशाली मानले जात असे. याचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर विनाश होत असे. इंद्राजितने याचा वापर हनुमानावर केला होता, परंतु हनुमानाला मिळालेल्या वरदानामुळे ते निष्प्रभ ठरले. श्रीरामानेही जयंतावर आणि रावणावर याचा वापर केला होता.
ब्रह्मशीर्ष अस्त्र
हे ब्रह्मास्त्रापेक्षाही चारपट अधिक शक्तिशाली मानले जाते. ज्या ठिकाणी याचा वापर केला जात असे, ती जागा 200 वर्षांपर्यंत ओसाड होत असे. तिथे काहीच झाड अथवा गवत उगवत नसे.
नारायणास्त्र
हे भगवान विष्णूचे अस्त्र होते. एकदा वापरले की ते एकाच वेळी अनेक शत्रूंना लक्ष्य करू शकत असे.
पशुपतास्त्र
हे भगवान शिवाने दिलेले एक शक्तिशाली अस्त्र होते.
आग्नेयास्त्र
अग्नी देवाशी संबंधित हे अस्त्र भयंकर आग निर्माण करत असे. लंकेला जाळण्यासाठी हनुमानाने याचा उपयोग केला होता असे काही ठिकाणी सांगितले जाते (तरी मुख्यत्वे हनुमानाने स्वतःच्या शेपटीला आग लावली होती).
वायव्यास्त्र
वायू देवाशी संबंधित हे अस्त्र भयानक वादळे आणि वायू निर्माण करत असे.
वरुणास्त्र
वरुण देवाशी संबंधित हे अस्त्र प्रचंड प्रमाणात पाणी निर्माण करत असे आणि आग्नेयास्त्राचा प्रभाव कमी करण्यासाठी याचा वापर केला जात असे.
नागास्त्र
हे अस्त्र सापाचे रूप घेऊन शत्रूंना लक्ष्य करत असे. इंद्राजितने रामा-लक्ष्मणावर याचा प्रयोग केला होता, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले होते.
नागपाश
याचा वापर केल्यास शत्रू सापांच्या वेटोळ्यात बांधले जात असे. इंद्राजितने रामा-लक्ष्मणांना बांधण्यासाठी याचा वापर केला होता.
ऐन्द्रास्त्र
इंद्र देवाचे हे अस्त्र बाणांचा वर्षाव करत असे.
वज्रास्त्र
हे इंद्रदेवाच्या वज्रासारखे होते आणि विजेचा धक्का देत असे.
मोहिनी अस्त्र
हे अस्त्र शत्रूंना मोहित करून गोंधळात पाडत असे.
भार्गवास्त्र
परशुरामाचे हे अस्त्र अत्यंत शक्तिशाली शस्त्रांचा वर्षाव करत असे.
धर्मास्त्र, कालास्त्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र अशी अनेक अन्य अस्त्रे आणि चक्रे यांचाही उल्लेख रामायणात आढळतो.
रामायणातील युद्ध केवळ शारीरिक सामर्थ्यावर आधारित नसून, या दिव्य शस्त्रे आणि अस्त्रांच्या वापरावरही अवलंबून होते, ज्यामुळे त्यांची भीषणता आणि परिणाम प्रचंड होते.
-------------------------------------------------------------
रामायणाचा इतर धर्मात असलेला प्रभाव
रामायणाचे अनेक भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये भाषांतर झाले आहे. हे केवळ एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, त्याचा प्रभाव विविध संस्कृती आणि धार्मिक परंपरांवर दिसून येतो.
मुख्यतः, रामायणाचे खालील धर्मांमध्ये भाषांतर झाले आहे किंवा त्या धर्मांच्या ग्रंथांमध्ये रामायणासारख्या कथा आढळतात.
हिंदू धर्म
मूळ वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये आहे आणि हिंदू धर्माचा तो एक महत्त्वाचा आधारग्रंथ आहे. याशिवाय, भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये (उदा. हिंदीमध्ये तुलसीदासांचे रामचरितमानस, मराठीत श्रीधरपंतांचे रामायण, कन्नडमध्ये तोरवे रामायण, बंगाली, ओडिया, मणिपुरी, असमिया इत्यादी) रामायणाची अनेक रूपे आहेत.
जैन धर्म
जैन धर्मातही रामायणाच्या अनेक कथा आढळतात. त्यांना "पउमचरिउ" (पद्म चरित) असे म्हणतात. प्राकृत भाषेत लिहिलेली विमलसूरिची "पउमचरिउ" ही सर्वात जुनी जैन रामायण मानली जाते. जैन रामायणात हिंदू रामायणापेक्षा काही प्रमाणात फरक आढळतात, उदा. रावणाला एक सुंदर आणि गुणवान व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे आणि रावणाचा वध लक्ष्मणाने केल्याचे दाखवले आहे.
बौद्ध धर्म
बौद्ध धर्मातही रामायणाशी संबंधित कथा आहेत, ज्यांना "दशरथ जातक" या नावाने ओळखले जाते. या जातकांतही रामायणाच्या मूळ कथेमध्ये काही बदल दिसून येतात. उदा. यात सीता ही रामाची बहीण असल्याचे दर्शवले आहे आणि त्यांचे लग्न झाल्याचेही काही कथांमध्ये आढळते. तसेच, रावणाचा उल्लेख किंवा लंकेचा उल्लेख नसतो.
शीख धर्म
शीख धर्मामध्येही प्रभू रामांना एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व आणि अवतार म्हणून मान्यता आहे. जरी त्यांचा स्वतंत्र रामायण ग्रंथ नसला तरी, शीख धर्माच्या शिकवणींमध्ये रामाचा आदर केला जातो.
याशिवाय, रामायणाचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून, आग्नेय आशियातील अनेक देशांवर म्हणजेच इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया, जपान, म्यानमार इत्यादी तो दिसून येतो. या देशांमध्येही त्यांच्या संस्कृतीनुसार रामायणाची विविध रूपांतरे आणि कथा प्रचलित आहेत.
थोडक्यात, रामायणाचे केवळ भाषांतरच नव्हे, तर विविध धर्मांच्या आणि संस्कृतींच्या दृष्टिकोनातून त्याचे अनेक रूपांतरे आणि आवृत्त्या जगभरात आढळतात.
सम्राट अकबर आणि रामायणाचा प्रभाव
मुघल सम्राट अकबराच्या 'दीन-ए-इलाही' या सर्वधर्मसमभाव संकल्पनेमागे भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव होता.
अकबराने रामायणाचे पर्शियन भाषेत भाषांतर करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू केला होता. त्याला वाटायचे की, प्रजेवर राज्य करण्यासाठी रामासारखे 'आदर्श' समोर ठेवणे आवश्यक आहे.
राम-सिया नाणी
अकबराने सोन्याची आणि चांदीची नाणी पाडली होती, ज्यावर 'राम' आणि 'सीता' यांच्या प्रतिमा होत्या आणि देवनागरी लिपीत 'रामसिया' असे कोरलेले होते. ही नाणी आजही संग्रहालयात पाहायला मिळतात.
अकबराच्या 'अल्ला-हू-अकबर' या घोषणेचा अर्थ 'देव थोर आहे' असा होतो, परंतु त्या काळातील काही टीकाकारांच्या मते त्याने स्वतःला देवाच्या स्थानी बसवण्याचा (काहीसा रामासारखा देवतुल्य राजा होण्याचा) प्रयत्न केला होता. श्रीराम हे केवळ एका धर्माचे दैवत नसून ते भारतीय मूल्यांचे (Values) प्रतीक आहेत. म्हणूनच अकबरासारख्या परकीय वंशाच्या राजालाही त्यांच्या 'राजधर्माचा' मोह पडला.
-------------------------------------------------------------
श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरे
श्रीरामाची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेक मंदिरे उभारली गेले आहेत. त्यातील काही प्रमुख मंदिरे खालील प्रमाणे.
उत्तर प्रदेश
अयोध्या राम मंदिर
हे श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते आणि शरयू नदीच्या काठी वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. अलीकडेच या भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
कनक भवन, अयोध्या
हे मंदिर भगवान राम आणि सीतेला समर्पित आहे.
महाराष्ट्र
काळाराम मंदिर, नाशिक
पंचवटी परिसरात असलेले हे मंदिर त्याच्या काळ्या पाषाणातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. वनवासाच्या काळात भगवान रामाने काही काळ येथे वास्तव्य केले होते.
रामराजा मंदिर, रामटेक (नागपूर)
हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध राम मंदिर आहे.
चाफळचे राम मंदिर (सातारा)
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे एक महत्त्वाचे राम मंदिर आहे.
श्रीराम मंदिर, पंढरपूर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी चंद्रभागा घाटावर स्थापित केलेले हे राम मंदिर आहे.
तुळशीबाग श्रीराम मंदिर, पुणे
पुण्यात असलेले हे मंदिर देखील प्रसिद्ध आहे.
श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, नागपूर
हे मंदिर देखील नागपूरमधील एक महत्त्वाचे राम मंदिर आहे.
मध्य प्रदेश
राम राजा मंदिर, ओरछा
हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे श्रीरामाची पूजा राजा म्हणून केली जाते आणि त्यांना रोज गार्ड ऑफ ऑनर दिला जातो.
तेलंगणा
सीता रामचंद्रस्वामी मंदिर, भद्राचलम
गोदावरी नदीच्या काठी असलेले हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
तामिळनाडू
रामास्वामी मंदिर, कुंभकोणम
हे सुमारे 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी बांधले होते आणि या मंदिरात रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
कोठंडारामस्वामी मंदिर, रामेश्वरम
रामेश्वरममधील हे मंदिरही प्रसिद्ध आहे.
केरळ
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, त्रिशूर
या मंदिरात भगवान श्रीकृष्ण एकेकाळी ज्या मूर्तीची पूजा करत होते, ती मूर्ती स्थापित केली आहे असे मानले जाते.
कर्नाटक
कोदंडराम मंदिर, हिरेमागळूर
या मंदिरात भगवान राम आणि लक्ष्मण धनुष्यबाणासह दाखवले आहेत.
ओडिशा
राम मंदिर, भुवनेश्वर
हे भुवनेश्वरच्या मध्यभागी असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे.
जम्मू आणि काश्मीर
रघुनाथ मंदिर, जम्मू
हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे.
पंजाब
श्रीराम तीरथ मंदिर, अमृतसर
हे ते ठिकाण आहे जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता आणि लव-कुश यांचा जन्म झाला होता. असे मानले जाते.
याव्यतिरिक्त, भारताच्या विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये अनेक लहान-मोठी राम मंदिरे आहेत, जी स्थानिक पातळीवर पूजनीय आहेत.
परदेशात अनेक देशांमध्ये श्रीरामाची मंदिरे आहेत, विशेषतः जिथे भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.
प्रमुख देशांमधील श्रीराम मंदिरे
नेपाळ
नेपाळमध्ये, विशेषतः जनकपूर धाममध्ये, माता सीतेचे एक महत्त्वाचे मंदिर आहे, ज्याला जानकी मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर भगवान राम आणि सीतेच्या विवाहाशी संबंधित मानले जाते.
मॉरिशस
पोर्ट लुईसमध्ये एक प्रसिद्ध राम मंदिर आहे, जे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे केंद्र आहे.
फ्रान्स
पॅरिसमध्ये राम मंदिर आहे, जे राम नवमी, दसरा आणि दिवाळीसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करते.
कॅनडा
टोरंटोमध्ये राम मंदिर आहे, जे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
अमेरिका (USA)
न्यूयॉर्कमधील फ्लशिंग, क्वीन्समध्ये राम मंदिर आहे. अमेरिकेच्या इतर राज्यांमध्येही (उदा. कॅलिफोर्निया, इलिनॉय) अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यात श्रीरामाची पूजा केली जाते.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्येही राम मंदिराच्या निर्मितीची माहिती समोर आली आहे.
थायलंड
थायलंडचा रामायणाशी (रामकियन) ऐतिहासिक संबंध आहे आणि तिथेही रामाची श्रद्धा आहे, त्यामुळे तिथेही काही मंदिरे असू शकतात.
याव्यतिरिक्त, फिजी, गयाना, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांसारख्या देशांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या आहे, तिथेही हिंदू मंदिरे आहेत आणि त्यापैकी अनेकांमध्ये भगवान श्रीरामाची मूर्ती आणि पूजा केली जाते.
-------------------------------------------------------------
काही प्रमुख रामायण आणि त्यांचे लेखक
तुलसीदास
यांनी हिंदी भाषेत 'रामचरितमानस' लिहिले, जे उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे.
कंबन
यांनी १२ व्या शतकात तमिळ भाषेत 'रामावतारम्' किंवा 'कंब रामायण' लिहिले.
कुमार वाल्मीकी
यांनी १४-१५ व्या शतकात कानडीत 'तोरवे रामायण' नावाने रूपांतर केले.
एकनाथ
यांनी मराठी भाषेत 'भावार्थ रामायण' हा काव्यग्रंथ लिहिला.
श्रीधरपंत
यांनी १८ व्या शतकात मराठी भाषेत रामायण रचले.
कुवेंपु
यांनी कानडीत 'श्री रामायण दर्शनम्' लिहिले.
रंगनाथ शर्मा
यांनी कानडीत 'कन्नड वाल्मीकि रामायण' लिहिले.
कृत्तिवास ओझा
यांनी १४ व्या शतकात बंगाली भाषेत 'कृत्तिवासी रामायण' लिहिले.
बलराम दास
यांनी १६ व्या शतकात उडिया भाषेत रामायण लिहिले.
गोविंदसिंग (शिखांचे दहावे गुरू)
यांनी 'रामावतार' नावाने एक रामायण लिहिले.
याव्यतिरिक्त, मंजुळ रामायण (सुतीक्ष्ण ऋषी), सौपद्य रामायण (अत्री ऋषी), महामाली रामायण (शिव-पार्वती संवाद), सौहाद्र् रामायण (शरभंग ऋषी), मणिरत्न रामायण (वसिष्ठ-अरुंधती संवाद), सौय्य रामायण (हनुमान आणि सूर्य) यांसारखी अनेक रामायणे अस्तित्वात आहेत.
थोडक्यात, मूळ रामायण महर्षी वाल्मीकी यांनी लिहिले असले तरी, रामकथेच्या लोकप्रियतेमुळे आणि सांस्कृतिक प्रभावामुळे अनेक कवी आणि लेखकांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनातून रामायणावर आधारित रचना केल्या आहेत.
परंतु रामायण हे खरेच घडले आहे. श्रीरामाच्या पाऊलखुणा आजही ठिकठिकाणी दिसून येतात. हेच या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा